आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. उर्जेच्या पारंपारिक आणि अपारंपरिक साधनांचा समन्वयीत, यथोचित व काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या उर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. उर्जेचे योग्य व्यवस्थापन, संयोजन, संवर्धन व नियमन केल्यास शेतकऱ्यांचे राहणीमान सुद्धा वाढेल. आजकाल अपारंपरिक उर्जचलित उपकरणे व योजना जसे सुर्यचुल, सौर उष्णजल संयत्र, सौर पथदीप, सौर फवारणी संच, सौर सिंचन व्यवस्था, सौर गृह प्रकाश प्रणाली, विजेरी प्रभारण, पवन चक्की, जैववायू संयत्र, कृषी अवशेषापासून विद्दुत निर्मिती प्रकल्प इत्यादी वापरत आहेत.
डॉं. पं.दे.कृ.वि. निर्मित १ मी. * २ मी. क्षेत्रफळाच्या जलशुद्धीकरण (निर्लवणीकरण ) यंत्रापासून साधारणतः ३ ते ४ लिटर पाणी दिवसागणिक शुद्ध केले जाते. या संयात्रापासून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपयोग मुख्यतः पिण्यासाठी त्याच बरोबर आरोग्य केंद्र, विजेरी प्रभारण व कार्यशाळा येथे केला जाऊ शकतो.
विद्दुत प्रदाय किंवा सौर फोटो व्होल्टाइक पेंनेलद्वारे विजेरी (विद्दुत घट) प्रभारित केली जाते. हि दिष्टधारा नियंत्रक व कंपन/ स्पंदन उर्जा देयक मधून तार कुंपणास जोडली जाते. नियंत्रकामुळे अतिभार, विजेरीचे अतिप्रभारण स्पंदन/ तरंगाचे अंतरायिक उच्च व्होल्टता निर्माण , इत्यादीचे नियमन होते. विद्दुत कुंपण हे पाळीव किंवा रानटी जनावरे, घुसखोर इत्यादींना अटकाव करते. जवळ जवळ एक सेकंद कालांतराने उच्च विद्दुत विभव (४ किलोव्होल्ट ते १० किलोव्होल्ट )कंपने फक्त १/३०० सेकंद इतका वेळ टिकतात व त्यामुळे प्राण्यांना विजेचा झटका जोरात बसला तरी अगदी सुरक्षित असतो. विद्दुत कुंपण हे काटेरी ताऱ्याच्या कुंपणापेक्षा अधिक परिणामकारक व स्वस्त आहे. साधारणतः एक किलोमीटर अंतरासाठी रु. १.२५ लाख विद्दुत कुंपण उभारण्यासाठी खर्च येतो.
सौरउर्जेचा वापर करून अन्न शिजविता येते. भात, भाजी, वरण, बटाटे, रताळी इत्यादी उकडता येतात तसेच बिस्कीट, केक, शेंगदाणे, मिरची इत्यादी भाजता येतात. उपकेंद्रित सौर शेगडीमध्ये पोळ्या व तळणाचे पदार्थ उत्तमपणे करता येतात.
उर्जा संवर्धन म्हणजेच जणू काय उर्जा निर्मिती होय. उर्जेची बचत खाली दिलेल्या सुचनांचे पालन केल्याने होऊ शकते व त्यामुळे खर्च वाचतो.
खेड्यामध्ये स्वयंपाकासाठी मुख्यतः पारंपारिक दोन वैलीच्या चुलीचा वापर केल्या जातो. या चुलींची औष्णिक क्षमता फक्त ९-१० टक्के असते. या चुलीचा धूर स्वयंपाकात साठतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ व फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. गत काही वर्षात विविध प्रकारच्या सुधारित चुलीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मागील काही वर्षात विकसित झालेल्या आणि पारंपारिक चुलीशी साम्य असलेल्या चुलीमध्ये डॉं. पं.दे.कृ.वि. उर्ध्वझोत चूल, सुधारित जलनिगम व सुधारित टिकाऊ टीएनएयु चूल विदर्भात वापरण्यायोग्य आहेत. या चुलीच्या वापरमुळे ३० टक्के इंधन बचत, वेळेची बचत आणि प्रदुषनातही लक्षणीय घट आढळून आली आहे.
पं.दे.कृ.वि. उर्ध्वझोत चूल हि एक वैलीची धातूची हातवाही चूल आहे. या चुलीची औष्णिक क्षमता २०% आहे. या चुलीची किंमत १,०००/- रु. आहे. अकोला केंद्राने अशा चुली अकोला/वाशीम जिल्ह्यात वितरीत केल्या आहेत.
सुधारित टिकाऊ टीएनएयु चूल हि दोन वैलीची धुरांडे असलेली सिमेंटची चूल आहे. या चुलीची औष्णिक क्षमता २२% आहे. या चुलीची किंमत रु. अंदाजे ४५०/- आहे. अकोला केंद्राने अशा चुली माणकी, जि. अकोला येथे स्थापल्या आहेत.
स्त्रोत : अग्रो विदर्भ,
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 6/27/2020
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
ऊर्जे विषयीच्या बातम्या