অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उर्जा स्वयंपूर्णतेकडे सुलाचे उल्लेखनीय पाउल

प्रस्तावना

वीजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील उर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेतीपाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे. त्यातच उर्जा स्वयंपूर्णतेकडे अधिकाधिक वाटचाल व्हावी म्हणून सरकारने उचललेले पाऊल महत्वाचे आहे.

नेट मिटरींग प्रणाली

नेट मिटरींग प्रणाली कार्यरत करून सरकारने एका नाविन्यपूर्ण आणि क्रांतिकारी योजनेची ओळख आपल्याला करून दिली आहे. या योजनेच्या प्रसिद्धी करता केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले असून राज्य सरकार देखील याच्या अंमलबजावणी करता अनेक प्रकारे पुढाकार घेत आहे.

सुलाच्या या प्रकल्पाविषयी

स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांकडून घेतल्या गेलेल्या अनेक प्रयत्नांच्या फलीतांपैकी एक म्हणजे-विज निर्मितीकरिता सुलाने उभारलेले सोलर पॅनल्स व यामुळे प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात होत असलेली आर्थिक बचत. आपल्या अनेक शाश्वत कार्यपद्धतींसोबत सोलर नेट मीटरिंग पद्धत अवलंबत शाश्वततेकडे आणखी एक उल्लेखनीय पाउल सुलाने उचलले आहे. महावितरण अधिकार्यांनी ही पद्धत नाशिक मध्ये रुजवण्यास अथक प्रयत्न घेतले असून आता हि प्रणाली योग्य आणि यशस्वी रित्या राबवण्यात महावितरण आणि कंपन्यांना यश आले आहे.

आपल्या आधीच्या यंत्रणेलाच गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे सौर उर्जा उपक्रमात छतावर सौर फोटो व्होल्टेक यंत्रणा बसवण्याच्या महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या धोरणाअंतर्गत नाशिक विभागातील सुला विनयार्ड्सचा हा प्रकल्प नाशिकचा आजपर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे.

भारत सरकारच्या अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरावर प्राधान्य देण्याच्या धोरणावर पाऊल ठेवत अनेक तांत्रिक आणि आर्थिक समस्यांवर मात करून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवणारी सुला हि पर्यावरणवादी कंपनी असून, कंपनीच्या आस्थापानेपासुंच अनेक शाश्वत उपक्रम राबवत आली आहे.

नेट मीटर पॉलिसी – या धोरणात ग्राहक सौर विद्युत निर्मिती करून त्याचा वापर स्वत: करता करून अतिरिक्त उर्जा महावितरणाकडे पाठवू शकतो. खास याकरता बसवण्यात येणाऱ्या नेट-मीटर मध्ये ग्राहकाने जमवलेल्या विजेच्या निर्यात व आयात मापनाची व्यवस्था असल्यामुळे ग्राहकाचे मासिक विद्युत देयक आयात-निर्यातीचे समायोजन करूनच येते. कंपन्या व वैयक्तिक सौर उर्जा वापरास आणि विद्युत निर्मिती करण्यास मोठी चालना मिळाली आहे.

या प्रकल्पाचे फायदे

  • हे नेट मीटर आयात व निर्यातीचा हिशोब स्वत:च ठेवून कार्य करत असल्याने ग्राहक आपण तयार केलेल्या विजेचा संपूर्ण वापर करून घेऊ शकतो.
  • विज तयार होऊन महावितरणाकडे जात असल्याने आपण बनवलेली विज साठवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या बॅटरी किंवा इतर सर्व पायाभूत सुविधा उभ्या करून त्यांना लागणारी जागा, वापर व देखभालीचा खर्च वाचतो.
  • या उपक्रमामुळे ग्राहक उपलब्ध जागेचा वापर करून अधिकाधिक उर्जा निर्माण करून स्वयंपूर्ण होतानाच महावितरणाच्या देखील कार्यभागाचा काही वाटा स्वत:च वाटून घेईल. यासोबतच अपारंपरिक उर्जास्त्रोताचा वापर करून आपोआपच पर्यावरणाला मोठा हातभार लावेल.

अशा उपक्रमांमुळे महावितरणाची देखील विज बचत होईल. शिवाय ग्राहक स्वताच्या जागेत वीजनिर्मिती करत असल्याने विद्युत वाहन करताना होणारी प्रचंड विज घट देखील टळेल. आता सुला आपल्या स्वत:च्या वापरकरता आपल्या एकूण वापरापैकी ५०% विज स्वत: तयार करते. या नेट मिटरींग प्रकल्पामुळे कंपनीची विज बिलाची आणखी १०-१५% बचत होऊ शकते असे सुलाच्या महाव्यवस्थापक (प्रकल्प) श्री. त्रंबक ओतूरकर यांनी सांगितले. थोड्याच कालावधीत सुलाचे संपूर्ण हॉस्पिॅटलिटी युनीटच १००% अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालवण्याचा मानस श्री ओतूरकर यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला जरी हि प्रणाली समजावून घेण्यास वेळ लागला, तरीही राज्य सरकार आणि स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकार घेऊन केलेल्या मदतीमुळे आम्ही शाश्वत ऊर्जेकडे आणखी एक यशस्वी पाउल उचलू शकलो, डॉक्टर नीरज अग्रवाल यांनी सांगितले.

शेतीमालावर अवलंबून असलेल्या सुला विनयार्ड्स कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरउर्जेची निर्मिती केली जात आहे. यातून २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण विज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्रमातून साधली जात आहे. इतरही कृषी जोडधंदे किंवा कृषी पूरक उद्योगांनी अशा उर्जेची निर्मिती करावी व बचत साधावी याकरता आदर्श ठेवला आहे.

कोळसा व खनिजतेल या पारंपारिक उर्जास्त्रोतांच्या वापरामध्ये कमी आल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले सुलाचे हे पाउल उल्लेखनीय आहे, यात शंका नाही.

 

स्रोत : सुला विनयार्डस सीएसआर

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate