करंजाच्या तेलाचे स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने आपले कित्येक दशलक्ष डॉलर्सचे परकीय चलन वाचू शकेल आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अशा लागवडींमधून भूमिहीन लोकांना, छोट्या शेतकर्यांना तसेच आदिवासींना रोजगार मिळू शकेल - विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या स्व-मदत गटांना ह्यामधून जास्तीचे उत्पन्न मिळू शकेल कारण त्यांना करंजाच्या तेलाबरोबरच तेल काढल्यानंतर उरणार्या चोथ्याची म्हणजे प्रेस-केकची देखील विक्री करता येईल.
पॉवरगुडा ह्या आदिवासींच्या खेड्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि साधनसंपत्तीच्या बाबतीत भरपूर समस्या होत्या. शेतजमिनींमधून फारसे उत्पन्न निघत नसल्याने तेथील लोक रोजगाराच्या शोधात आसपासच्या शहरांकडे निघून जात.
पण आता परिस्थिती बदलली आहे. ह्या खेड्यात पाणीव्यवस्थापनाचा एकात्मिक कार्यक्रम राबवल्यामुळे उत्पन्नवाढीसाठी करंज वृक्षांची रोपवाटिका बनवणे शक्य झाले. करंजाचे तेल काढणारे ३७५,००० रुपये किंमतीचे यंत्र बसवून अधिक पैसे मिळवण्याच्या कामाला वेग दिला गेला. ह्या यंत्राच्या उपयोगाने करंज, कडुनिंब तसेच इतर बियांचे तेल काढून ते बाजारात विकणे शक्य झाले.
ह्या तेल-गिरणीमुळे गावकर्यांना पैसे मिळवण्याचा एक महत्वाचा मार्ग सापडला आहे. ह्या यंत्रावर दळलेल्या करंजाच्या दर एक किलो बियांमागे येथील महिलेस २ रु. मिळतात. ताशी ५० किलो बिया दळण्याची ह्या गिरणीची क्षमता आहे. करंजाची रोपे लावून पर्यावरण जपण्याचे काम करणारे पॉवरगुडा हे पहिले असे गाव आहे. प्रदूषण कमी करण्याच्या जागतिक बँकेच्या योजनेनुसार पॉवरगुडाने तिला पडताळणीकृत प्रदूषण कपातीद्वारे १४७ टन कार्बनडायॉक्साइडच्या समकक्ष विक्री केली आहे. १९ -२१ ऑक्टोबर २००३ मध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेल्यांच्या विमान- आणि स्थानिक प्रवास साधनांमुळे हवेत सोडल्या गेलेल्या धुराचे प्रमाण शून्यावर आणण्यासंबंधातील एक पाऊल म्हणून जागतिक बँकेने पॉवरगुडामधील महिलांच्या स्व-मदत गटांना ६४५ अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे ३०,००० रुपये दिले आहेत. पर्यावरणविषयक सेवा निर्यात करण्याबद्दल जागतिक बँकेकडून थेट रक्कम मिळवणारे पॉवरगुडा हे भारतातील पहिलेच खेडे ठरले आहे.
पॉवरगुडा हे खेडे जगाच्या नकाशावर झळकल्याचा तेथील रहिवाशांना अभिमान आहे. जागतिक बँकेकडून मिळालेले ३०,००० रु. करंजाच्या रोपवाटिकेमध्येच गुंतवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार तयार केलेल्या २०,००० रोपांपैकी १०,००० रोपे सार्वजनिक जागांवर लावून उरलेली आसपासच्या खेड्यांत आणि वनविभागाला विकली आहेत.
खेड्यामध्ये वनसंरक्षक समिती स्थापन झाल्याने करंजाची रोपे वनविभागाकडून खरेदी केली जातील असे दिसते. तेल काढल्यानंतर उरणार्या चोथ्यामध्ये (ह्याला 'प्रेस-केक' असे म्हणतात) सेंद्रीय पदार्थ भरपूर असतात आणि त्यामुळे त्याचा वापर जमिनीचा कस वाढवण्यासाठी करता येतो. ह्यामध्ये ४% नायट्रोजन, १% फॉस्फरस, १% पोटॅशिअम असल्याने शेतकरी हे केक तेल-गिरणी चालवणार्या महिला स्व-मदत गटांकडून ५ रुपये किलो ह्या दराने विकत घेतात.
हा प्रकल्प आदिलाबाद जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास संस्था उर्फ आयटीडीए तर्फे ऑक्टोबर २००३ मध्ये सुरू करण्यात आला. ह्याला आयएफएडीद्वारे पुरस्कृत आंध्र प्रदेश सहभागी आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आर्थिक मदत दिली गेली असून इक्रिसॅट (ICRISAT) चे तांत्रिक सहाय्य मिळाले आहे.
स्त्रोत - http://www.icrisat.org
अंतिम सुधारित : 1/30/2020
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय जैव ...