भारताच्या गुजरात राज्यातील इश्वरिया हे खेडे अमरेलीपासून 8 किलोमीटरवर, डोंगरा भागात, आहे. खेड्याची लोकसंख्या आहे १९५७. तेथील साक्षरतेचे प्रमाण ८०.७ टक्के आहे. जमिनीत सुमारे ८० ते ९० फुटांवर पाणी लागते (ग्राउंड वॉटर टेबल). ह्या पाण्याची पातळी देखील खाली चालली आहे आणि त्याचा दर्जा फारसा चांगला नाही. गावकर्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. वॉटरशेड प्रकल्प सुरू होण्यापूर्वी टँकरने पाणीपुरवठा होत असे व त्या पाण्यासाठी गावकर्यांमध्ये भांडणे होत. ह्या प्रकल्पापूर्वी पाण्याची समस्या गंभीर बनली होती.
ह्या बाबींचा विचार करून जलसंधारणाच्या ह्या प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले गेले. जलसंधारण प्रकल्प विकास समिती, PIA आणि ग्रामपंचायत ह्यांनी छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला. ह्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार होता. ह्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदा १२५ घरांच्या छपरांवर पाणी साठवण्यासाठीची संयंत्रे बसवली गेली. त्यासाठी ७.९१ लाख रुपये खर्च आला. ह्या खर्चाचा काही भाग ज्या घरांवर ही संयंत्रे बसवली गेली त्यातील रहिवाशांनी उचलला. ह्यानंतर काही काळातच संपूर्ण खेड्यातील घरांच्या छपरांवर ही संयंत्रे दिसू लागली.
पाण्यावर सूर्यप्रकाश पडला नाही तर कित्येक वर्षांपर्यंत देखील ते पिण्याजोगे राहू शकते. ह्यासाठी, तळघरांतील टाक्यांमधून, सूर्यप्रकाशापासून दूर, पाणी साठवले गेले. अशा टाकीची कमीतकमी साठवणूक-क्षमता १०००० लिटर आणि कमीतकमी आकार ७ फूट (रुंदी), ७ फूट (लांबी) तर खोली ८ फूट असते. अर्थात रहिवाशांनी त्यांच्या गरजांनुसार ह्या मोजमापांमध्ये बदल केले आहेत. आता छतावरील पाणी साठवण्याची ही लाट सर्वत्र पसरली असून नवी घरे बांधतानाच त्यासाठीच्या संयंत्रांची तरतूद घराच्या रचनेमध्येच केली जात आहे.
वर्षभर लागणारे पावसाचे पाणी साठवण्यास सुरूवात झाल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र जाण्याची वेळ आली नाही.
मिळणारे पाणी पिण्यायोग्य असल्याने दूषित पाण्यामधून रोगराई पसरण्याची शक्यता पुष्कळच कमी झाली.
तळघरातील टाकीमधून पाणी वर काढण्यासाठी हातपंप वापरले जात असल्याने ऊर्जेची बचत झाली.
पाण्याची चिंता मिटल्याने खेड्यातील एकंदर सामाजिक वातावरण सुधारले आणि जीवनमानातही वाढ झाली.
उरलेले पाणी, पाइप्सच्या सहाय्याने, शेतीलाही देता येते.
स्रोत : http://www.cseindia.org
अंतिम सुधारित : 8/5/2020
ढग हे पाण्याच्या अतिशय लहान कण आणि बर्फाचे स्पटिक ...
मध्यप्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील दातिया ब्लॉक...
नारायणपूरमधील तलावाच्या (जोहड़) काठावर उभे राहिलेल...