অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रकाशमय जीवन

प्रकाशमय जीवन

अनामिकाला इंग्रजी शिकायला आवडते आणि, तिला डॉक्टर देखील व्हायचे आहे. “वीज माझ्यासाठी फार उपयुक्त ठरेल त्यामुळे मी जास्त अभ्यास करु शकेन". येथे वीजेसंबंधी पुष्कळशा समस्या आहेत. नुकतीच येथे दोन-तीन दिवस वीज नव्हती. जर दिवे असले तर आम्ही रात्री देखील काम करु शकतो. अभ्यास करण्यासाठी मला जास्त वेळ मिळेल", अनामिका म्हणते.

उत्तरप्रदेश राज्यात एकूण ४५४ केजीबीवी आहे ज्यातील ३७६ ही सरकारतर्फे आणि ७८ ही वेगवेगळ्या एनजीओ तर्फे राबविण्यात येते. ३७,००० पेक्षा जास्त मुलींची या कार्यक्रमासाठी २००९ मध्ये नोंद झाली आहे.

एक सामाजिक उपक्रम आयकेइए (IKEA) द्वारे, १०० सुन्नन सौर-कंदील, मागच्या महिन्यात शाळेत आले, ज्यात दर मुलीस एक कंदील मिळेल. विद्यार्थ्यांनी ते प्राथमिक रंगांचे दिवे, त्यांचे आवरण काढून आणि त्यांना जागीच बरोबर ठेवून, हसत खेळत स्वीकारले.

“साधारण मुली रात्रीच्या वेळी एकत्र नसतात. आता प्रत्येकीला वेगवेगळा दिवा मिळेल, जेणे करुन त्या त्यांच्या वेळेप्रमाणे अभ्यास करु शकतात,” असे किशोर म्हणाले. “हा एकूण ग्रामीण विभाग आहे आणि येथे नेहमी दोन-चार दिवस सलग वीज उपलब्ध नसते. हे दिवे आमच्या मुलींसाठी फार उपयुक्तण ठरतील. ह्या मुली फार उत्सुक आहेत, आणि त्यांना रात्रीच्या वेळीदेखील दिवसा शाळेप्रमाणे अभ्यास करण्याची ओढ देखील आहे. त्या आमच्या शाळेत येतात, आणि मुलांप्रमाणेच वाढतात.”

जगभरात विक्री होणार्‍या दर सुन्नन दिव्यामागे, ज्यांची वीजेपर्यंत पोच नाही अशा मुलांसाठी त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी यूनीसेफला एक दिवा देण्यात येईल. आयकेइए ने विशेषत: विकासशील जगासाठी एक बळकट सुन्नन दिवा तयार केला आहे. हे कंदील आयुष्याच्या कठिण परिस्थितिंमध्येे सांभाळ आणि हानि ह्यांचा प्रतिकार करण्याच्या कामी येतील अशा पद्धतीने तयार केलेले आहेत, ज्यात उच्च तपमान सहन करण्यायची क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आलेला आहे.

एकूण ६६,७४० सुन्नन दिव्यांपैकी ६,४९४ दिवे शाळांमध्ये आणि उत्तरप्रदेशातील स्त्रियांच्या साक्षरता गटाला वितरित करण्यात आले. आणखी २४,७२० दिवे राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात आणि गुजराथ राज्यांमध्ये वितरित करण्यात येत आहेत.

“जेव्हां वीज असते त्यावेळी सर्व प्रकाशमय असते, आणि मला ते आवडते,” असे मंताशा प्रसन्नपणे म्हणते. “जेव्हा वीज नसते, आम्ही जेवणानंतर फारच लवकर झोपी जातो आणि लवकर उठतो. आता मी रात्री अभ्यास करु शकते. ”

चित्र निबंध "आयकेइए’’ सुन्नन कंदि‍लांसवे प्रकाशमय जीवन"

स्त्रोतwww.unicef.org

अंतिम सुधारित : 7/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate