मध्यप्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील दातिया ब्लॉकमधील 641 लोकांची वस्ती असलेले बुंदेलखंड प्रदेशातील हमीरपुर गावाला, जेथे बहुतांशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे लोक राहतात आणि अनियमित पर्जन्यवृष्टीमुळे नेहमीच दुष्काळाजन्य स्थितीस तसेच पाण्याच्या अत्यंत टंचाईस तोंड द्यावे लागते. येथील सरासरी पर्जन्यमान कमी झाले आहे. येथे दोन दशकांपूर्वी 100 दिवस (सरासरी 740 एमएम) पडणारा पाऊस आता 40 दिवसच (सरासरी 340 एमएम) पडतो आहे.
द व्हिलेज वॉटर ऍण्ड सॅनिटेशन कमिटी (व्हीडब्ल्यूएससी) (VWSC) म्हणजेच पेयजल समिती, जिची स्थापना स्वजल धारा कार्यक्रमाच्या अंतर्गत गावांतील पाणीपुरवठा योजना अंमलात आणण्यासाठी करण्यात आली होती, तिने सामुदायिक योगदानाच्या स्वरूपात रू.40,000 एकत्र देखील केले होते पण आवश्यक त्या संमत्या मिळाल्या नाही. असे आढळून आले होते की जोपर्यंत गावांत एक व्यवस्थित पाणीपुरवठा यंत्रणा नसेल, तोपर्यंत आर्थिक विकास शक्य होणार नाही कारण दिवसातील बराचसा वेळ दूरस्थ पाणीस्त्रोतांमधून (लांबच्या अंतरावर असलेले जलाशय) पाणी वाहून आणण्यात खर्ची पडत असे.
गावकर्यांनी लागोपाठ बर्याच बैठकी घेऊन भू-जल पातळी वाढविण्यासाठी आणि भविष्यकाळात पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करता यावे म्हणून स्वत: पुढाकार घेऊन ‘एकत्रित जल संसाधन व्यवस्थापन’ पध्दतीचा अवलंब केला. पावसाच्या पाण्याचा संग्रह आणि पुनर्चक्रन करण्यासाठी, सर्व घरांमध्ये पर्जन्यजल-संग्रह संरचना बांधण्याची; विहिरी आणखी खोलवर खणण्याची आणि गावातील परित्यक्त उघड्या विहिरी आणि ट्यूबवेल्सचे खड्डे भरून काढणे आणि पाटबंधारे बांधणे यासाठी योजना तयार करण्यात आली.
चालू नसलेले नलकूप (हॅण्डपंप) आणि खणलेल्या विहिरींचे पुनर्भरण
त्यांनी गावांबाहेर असलेली एक अशी जागासुध्दा शोधून काढली जेथून गावांतील घरे आणि रस्ते बांधण्यासाठी माती खणून व वाहून नेणे शक्य होते ज्यायोगे त्या जागी नलकूप आणि भू-जल पातळी आपोआप वाढावी म्हणून मोठा तलाव बांधता येईल. पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंटने (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) (PHED) गावांत एक डाइक-कम-बोल्डर धरण बांधले आणि इतर गावांतून निघणार्या नाल्यांवर पाटबंधारे बांधले ज्यामुळे पाटबंधार्यांवर बांधलेले नलकूप पुन्हा भरून गेले.
व्हीडब्ल्यूसीने (VWSC) सर्व 75 घरांत, शाळांतून आणि अंगणवाड्यांमधून छतावर पावसाचे पाणी साठविण्यासाठी संरचना बांधल्या ज्यांमध्ये छतावरून प्लॅस्टिकचे ड्रेन-पाइप एका खड्डयात टाकतात ज्यामध्ये वाळू आणि गोटे असतात. एक स्थानिक एनजीओ ‘परहित’ने प्रत्येक घरास रू.500 दिले आणि बाकी उरलेली रू.1000 ते 1200ची रक्कम लाभार्थ्यांतर्फे देण्यात आली.
हमीरपुर गावासाठी, हा प्रवास सर्व घरांना सुरक्षित पिण्याचे पाणी आवरित करणार्या एका उपक्रमापासून सुरू झा्ला ज्यायोगे ‘एकत्रित जल संसाधन व्यवस्थापन’ पध्दतीचा अवलंब करून आणि मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठविणार्या संरचनांची बांधणी करण्यात आली आणि ज्यायोगे गावात पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. हा महत्वपूर्ण फायदे असलेला एक अप्रतिम प्रयोग आहे.
PHEDद्वारे बांधण्यात आलेल्या एक रूफ-टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग चेक डॅम
स्त्रोत:
अंतिम सुधारित : 8/1/2020
आशियातील देशांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा ह...
नाले-ओहोळावर घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांध...
महाराष्ट्रातील दुष्काळी समस्या दिवसेंदिवस बिकट होत...
वायू, जल व जमीन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती होय. ह...