सुयोग्य तंत्रज्ञान आणि जीवन कौशल्ये केंद्र (सेंटर फॉर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी अण्ड लाईव्हलीहूड स्किल्स) म्हणजेच 'कॅटालिस' यांनी सौरप्रकाश उपकरणाच्या साहाय्याने ग्रामीण समुदायांना पर्यावरणस्नेही प्रकाशयोजना उपलब्ध करून देण्यासाठी एक सूक्ष्म-उद्योग उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये ग्रामीण महिलांना समाविष्ट करून घेणे कार्यक्रमाच्या यशासाठी एक प्रभावी आणि पर्यावरणस्नेही साधन ठरले आहे.
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॅटालिसने ३एम चा मार्ग स्वीकारला म्हणजेच: बनवा (मेक), विपणन (विक्री) करा (मार्केट), आणि सांभाळा (देखभाल) (मेंटेन). सुरुवातीला झारखंडमधील पेरेका या आदिवासी गावाची प्रतिमान म्हणून निवड करण्यात आली. पेरेका गावामध्ये सामाजिक मालकी निर्माण करण्यासाठी ३ वेगवेगळ्या पाड्यांमधील प्रतिनिधींची एक समिती तयार करण्यात आली. गावाच्या प्रतिमान समितीच्या १५ सदस्यांपैकी ६ स्त्रिया होत्या. या समितीने कॅटालिसच्या कर्मचारीवर्गाच्या मदतीने गावाचा संसाधन आराखडा आणि गरज विश्लेषण केले आणि वापरता येऊ शकतील अशा विविध सुयोग्य तंत्रज्ञानाचे उपाय सुचविले. कामाची सुरुवात करण्यासाठी लोकांनी सुचविलेल्या क्षेत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र होते ऊर्जा- त्यातही प्राधान्याने पर्यावरणस्नेही उपायांद्वारे घरगुती प्रकाशयोजना.
गावातील लोकांचे संध्याकाळनंतर सगळे व्यवहार ठप्प होत असत. अपुरी प्रकाशव्यवस्था केवळ प्रगती आणि विकासाच्या संधींनाच मारक असते असे नाही तर तिचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि सुरक्षेवर होतो कारण त्यांना केरोसिनचे दिवे, लाकूड आणि पिकाचे टाकाऊ भाग यांपासून प्रकाश मिळवावा लागतो. सौरऊर्जेचा पर्याय लोकांनी सुचविला ज्यामुळे केरोसिनमुक्त प्रकाश मिळू शकेल. समुदायाने हा निर्णय घेतला की कॅटालिसच्या समन्वयाने उद्योजकता प्रतिमानावर सौरप्रकाश उपक्रम राबविला जावा. संकल्पनात्मक प्रतिमान कॅटालिसद्वारा विकसित केले गेले आणि समुदायाशी बरीच सल्लामसलत करून त्याला मूर्त रूप दिले गेले.
दोन स्व-मदत गटांची स्थापना केली गेली: गिदान मस्कल स्वमदत गट आणि हरकन स्वमदत गट. प्रत्येक गटामध्ये १० स्त्री सदस्य होते. रंजक बाब अशी की सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मदतीने या स्त्रियांनी खूपच कमी वेळेत जोडणीचे काम शिकून घेतले. स्त्रियांना व्यवसाय कौशल्ये, गट व्यवस्थापन, तणाव निवारण आणि व्यवसाय प्रकल्प विकास तसेच सौरदिव्यांची तांत्रिक बाजू याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण गावामध्येच स्त्रियांच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये योग्य पद्धतीने बसेल अशा त-हेने देण्यात आले. प्रशिक्षणाचे वेळापत्रक असे आखण्यात आले होते की त्याचे निकाल प्रशिक्षण कालावधीमध्ये दिसू लागतील. त्यामुळे सहभाग्यांमध्ये प्रोत्साहन आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
आपल्या स्वतःच्या गावाच्या प्रकाशगरजा भागविल्यानंतर स्व-मदत गटाचे सदस्य आता स्वतःच सौरदिवे तयार करतात (युएस $१= भारतीय रु. ४६.९) (प्रशिक्षक किंवा कार्यक्रम संघाच्या कोणत्याही मदतीशिवाय). ते त्यांना स्थानिक बाजारामध्ये तसेच इतर गावांमध्ये विकतात आणि प्रत्येक दिव्यामागे रु. २५० ते ३०० इतका नफा कमवितात. या सौरदिव्यांमध्ये एलईडी (लाईट एमिटिंग डायोड्स) वापरलेले असतात जे २० तासांचा बॅक-अप देतात; सामान्य सौरदिवे कमाल ४-८ तासांसाठीचा बॅक-अप देतात. स्व-मदत गट यासाठी लागणारे सुटे भाग विश्वासार्ह पुरवठादाराकडून मिळवितात. ६ महिन्यांमध्ये स्व-मगत गटांनी आसपासच्या भागांमध्ये सुमारे ८०० सौरदिवे बनविले आणि विकले. सौरदिव्यांमुळे प्रकाशाची गरज तर भागली पण आता तेथे मोबाईल फोन चार्जरची मागणी मूळ धरू लागली आहे. अतिरिक्त प्रशिक्षणाच्या मदतीने या स्त्रिया सौरचार्जिंग युनिट्सच्या साह्याने मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करण्याच्या उद्योगामध्ये पाऊल टाकू शकतात ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळेल. उद्योग प्रकल्पांसाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल स्थानिक स्वयंसेवी संस्था (लीड्स) कडून आणि स्व-मदत गटांच्या बचतीतून आलेले होते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नफा गटाच्या भांडवल निधीमध्ये व्यवसायातील थेट गुंतवणूक म्हणून वळविला गेला. आता ४०% नफा भांडवल निधीमध्ये जातो तर ६०% गटाच्या सदस्यांमध्ये समान पद्धतीने वाटला जातो.
या उपक्रमातुन खूप काही शिकण्यास मिळाले आणि हे दाखवून देता आले की ग्रामीण स्त्रिया ऊर्जासेवा प्रदात्यांची भुमिका सांभाळू शकतात. असे करण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या क्षमताबांधणी आणि तांत्रिक व बिगरतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या इतर साधनांची गरज आहे. सध्या हे प्रतिमान भारतातीतल छत्तीसगढ आणि ओरिसामधील २ इतर गावांमध्ये राबविले जात आहे.
स्त्रोत: ई-नेट नियतकालिक, २०१० अंक:२अंतिम सुधारित : 1/30/2020
नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून (अपारंपारिक ...
ऊर्जे विषयीच्या बातम्या
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...