অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा

अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा

अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा

पवनउर्जेपासून वीज निर्मिती

देशात १०२७८८ मे .वॅ. इतक्या क्षमतेचे पवनउर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी ५९६१  मे .वॅ. इतक्या वीजनिर्मितीचा महाराष्ट्रात वाव आहे .केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालय यांच्या सहाय्याने व महाउर्जेच्या निधीतून राज्यात ११.०९ मे.वॅ. क्षमतेचे पथदर्शी पवन उर्जा प्रकल्प सुरुवातीस उभारण्यात आले आहे .

दिनांक ३१ मार्च २०१३पर्यंत ३००५.६६ मे .वॅ. एवढ्या क्षमतेचे पवनउर्जा प्रक्ल्पप्रामुख्याने  खाजगी प्रकल्प विकासकानंमार्फत ३१ ठीकांनी उभारण्यात आले आहेत .महाराष्ट्रातील सर्वात मोठा ५८१ मे .वॅ. एवढ्या क्षमतेचे पवन उर्जाप्रकल्प धुळे जिल्यात विकसित झाला आहे .राज्यात मोठ्या प्रमाणात खाजगी प्रकल्प विकासकानंमार्फत पवन उर्जा निर्मिती प्रकल्प आस्थापित होण्याच्या दृष्टीने आकर्षक धोरण तयार करण्यात आले आहे .

उसाच्या चिपाड्यावर आधारित सहवीज /वीज निर्मिती

देशतील साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप होते .साखर कारखान्यात उस गाळपानंतर उपलब्ध होऊन उसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती केली जाते . यासाठी प्रथम चीपाडातील आद्रता कमी करून नंतर त्यांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो .सदर इंधनाचे ज्वलन करून बाष्प्काच्यासहाय्याने उच्च दाबाची वाफ निर्माण केली जाते .सदर वाफेचा विनियोग काही प्रमाणांत साखर उत्पादन प्रक्रियेसाठी व काही प्रमाणात वीज निर्मितीसाठी कर्ला जातो .यासाठी अशा प्रकल्पांना सहवीज निर्मिती प्रकल्प असे संबोधले जाते .याद्वारे निर्माण होणारी वीज आवश्यकतेनुसार साखर कारखान्यांमध्ये वापरण्यात येऊन अतिरिक्त वीज पारेषित केली जाते .

राज्यात साखर कारखान्यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे अतिरिक्त वीज निर्मितीच्या क्षमता २२०० मे .वॅ. एवढी आहे .महाराष्ट्रात मार्च २०१३ अखेर उसाच्या चिपाडापासून सह-वीज निर्मितीचे १०८८ मे .वॅ. क्षमतेचे प्रकल्प स्थापित करण्यात आले आहे.

कृषी अवशेषांवर आधारित वीज निर्मिती

शेतातील टाकाऊ कृषी अवशेषांचे ज्वलन करून त्याद्वारे बाष्प्काच्या सहाय्याने उच्च दाबाची वाफ तयार करून ती टर्बाइन्वर सोडली जाते . वाफेच्या उच्च दाबामुळे टरर्बाइंन फिरून त्यास जोडलेल्या वीज जनित्रांद्वारे विद्युत निर्मिती केली जाते .यामध्ये वापरण्यात येणारी बाष्पके शक्यतो विविध इंधनांवर काम करू शकणारी असतात .अशा प्रकल्पांमध्ये  निर्माण होणारी वाफ हि पूर्णतः वीज निर्मितीसाठी वापरली जाते . कृशिजन्य टाकाऊ पदार्थांपासून राष्ट्रीयस्तरावर १६,००० मे .वॅ. व महाराष्ट्रात ७८१ मे .वॅ. इतक्या वीजनिर्मितीस वाव असल्याचे नवीन व नाविकरनीय उर्जा मंत्रालयाकडून झालेल्या अभ्यासाअंती दिसून आले आहे .त्यापैकी १७० मे .वॅ. क्षमतेचे १६ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झालेले आहे

शहरी घन कचरा /औद्योगिक कचरयांपासून वीज निर्मिती

शहरी घन कचरा /औद्योगिकरणामुळे निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर वापर करून वीज निर्मिती करण्यास वाव आहे . यामध्ये घन कचरा व सांडपाणी यांचा समावेश होतो .यापैकी घन कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी बायोमिथीनायझेशन,कम्बशन,खत निर्मिती व गासिफिकेषण या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो .तसेच सांडपाण्यापासून वीज निर्मितीसाठी त्यातील घटक पदार्थ व सांडपाण्याचे प्रमाण लक्षात                                                              घेऊन   बायोमिथीनायझेशन या तंत्रज्ञानाआधारे वीज निर्मिती करता येऊ शकते .राष्ट्रीय पातळीवर शहरी व औद्योगिक घन कचऱ्यापासून सुमारे १,७००   मेगावॅट वीज निर्मिती करण्यास वाव असून त्यापैकी राज्यात अनुक्रमे २८७ मे .वॅ. इतका आहे . औद्योगिक सांडपाण्यावर व घन कचऱ्यावर आधारित पारेषण संलग्न ८.७२५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प असे एकूण मार्च ,२०१३ अखेर २४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प महाराष्ट्रात्न कार्यान्वित झाले आहे .

लघु जलस्त्रोत वीज निर्मिती प्रकल्प

हंगामी आणि बारमाही पाण्याचा प्रवाह हा उर्जा निर्मितीसाठी एक उत्तम उर्जास्त्रोत आहे .सध्या लघुजल विद्युतप्रकल्पाची  तांत्रिकता परिपक्व झाली आहे .आता स्थलांतरित करता येण्यासारखे लहान जल उर्जा निर्मिती सयंत्र उपलब्ध आहे .नेपाळमध्ये डोंगराळ भागात असे लहान लघुजल सयंत्र योग्यरीत्या चालविले जात असून ते सबंधित गावकरया मार्फतच सांभाळले जातात .संपूर्ण भारतात या स्त्रोतांपासून एकूण १५००० मेगावॅट क्षमतेचेप्रकल्प उभारनेस वाव असून त्यापैकी एकूण २७१ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प दिनांक ३१ मार्च ,२०१३ अखेर जलसंपदा विभागाने विकसित केले .

नवीन व नवीकरणीय उर्जा :पारेषण विरहीत साधने

१ सौर औष्णिक कार्यक्रम – सौर औष्णिक तंत्रज्ञानामाध्ये सौर उर्जेचा वापर घरगुती ,व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्येपाणी तापविणे तसेच वाफ तयार करून अन्न शिजविणे तसेच विद्युत निर्मिती करणे यासाठी होतो .

अ.     सौर उष्ण जल सयंत्र – सौर उष्ण जल संयत्रामध्ये सूर्याची किरणे सौर संकलकावर एकत्रित करून त्यापासून औष्णिक उर्जा तयार केली जाते . हि औष्णिक उर्जा पाण्याला दिली जाते . त्यामुळे औष्णिक उर्जा जास्तीत जास्त प्रमाणात संकलित करता येते .

आ.   सौर उष्णजल सयंत्र हे ३००० ली.प्रतिदिन क्षमतेपुढे बलपूर्वक अभिसरण या प्रकारात उपलब्ध आहे .अशा प्रकारचे सयंत्र घरगुती ,व्यापारी क्षेत्र ,जसे कि ,हॉटेल ,दवाखाने ,दुघ्धशाळा इ. ठिकाणी बसवता येते .साधारणतः १०० लिटर्स प्रती दिन क्षमतेच्या संयत्राद्वारे वर्षाला अंदाजे १५०० युनिट्स इतक्या विजेची बचत होते .

घटक – संकलक गरमपाणी साठवणुकीची इंन्सूलेटर टाकी गरम पाण्याची पाईपलाईन,थंड पाण्याची टाकी व अवश्यकतेनुसार पंप इ.

वैशिष्टे – १) उर्जेच्या खर्चात मोठी बचत   २) २४ तास गरम पाण्याचा पुरवठा

३)संपूर्ण सुरक्षित व अत्यल्प देखभाल  ४)दीर्घायुषी  ५) प्रदूषणविरहित

ब )सौर चूल –सौर उष्णता अन्न शिजवण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकते त्यामुळे इंधनामध्येबचत होते .इंधनाच्या किमती प्रती वर्ष वाढत असल्यामूळ गृहिणीसाठी सौर चूल वरदान ठरत आहे .सौर चुलीच्या वापराणे अन्न शिजविण्यासाठी आवतिय खर्च होत नाही . पेटी प्रकारची सौर चूल डिश प्रकार व सामुदायिक सौर चूल या प्रकारामध्ये सौर चुली उपलब्ध आहे .

सौर प्रकाशीय साधने

सौर पॅनेलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करण्यात येते .सौर कंदील ,सौर पथदीप ,सौर घरगुती दिवे , सौर पाणी उपसणारा पंप ,सौर विद्युत संच यांसारख्या सौर प्रकाशीय संयंत्राचा दैनंदिन कामामध्ये वापर करता येतो .

अ . सौर कंदील – सौर कंदील हे सौर प्रकाशीय विद्युत कार्यप्रणालीवर कार्य करतात .सौर कंदील वजनाला हलके व कुठेही सहज नेता येणारे उपकरण असल्याने ग्रामीण जनतेला अत्यंत उपयोगी आहे .सौर कान्दिलामध्ये सौर पॅनल ,विद्युत घट ,दिवा ,इलेक्ट्रॉनिकनियंत्रक इत्यादींचा समावेश असतो .सर्वसाधारण प्रकाशीय दिवसामध्ये पाच तासाच्या विद्युत घट भारीतहोण्याच्या कालावधीनंतर हा सौर दिवा ३ते ४ तास चालू शकतो .

सौर घरगुती दिवे

सौर घरगुती दिवे हे सौर प्रकाशीय विद्युत कार्यप्रणालीवर कार्य करतात .सदरचे संयंत्र वेगवेगळ्या मॉडेलसमध्ये उपलब्ध आहे . पूर्ण विद्युत भारीत संयंत्रापासून विविध प्रकारचे दिवे साधारणतः ४ तास चालविता येतात .

क . सौर पथदीप

सौर पथदीपच्या मुख्य घटकांमध्ये७४ ए.एच .बॅटरी इलेक्ट्रॉनिक नियंत्रकामुळे ते संध्याकाळ झाली कि , अपोआप सुरु होतात .व पहाट झाली कीअपोआप बंद होतात .    अशा पथदिपापासून सुमारे ९०० ल्युमेन्स इतका प्रकाश मिळतो .

३ . सौर पंप

सौर पंप प्रणालीत सौर उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत होऊन टी पंपाला पाणी उपसा करण्यासाठी पुरविली जाते ९०० ते ४५०० वॅट क्षमतेचे सौर मॉड्युल पासून १ ते ५ एच .पी . क्षमतेचे पंप चालविले जातात या पंपापासून साधारणतः १५ मी . खोलीवरून १५,००० ते २,५०,००० लिटर्स प्रतिदिन पाणी उपसा करण्यात येतो .सौर पंपामध्ये विद्युत घट नसल्याने तो सूर्यप्रकाश उपलब्ध असतांनाच कार्यरत राहतो

सौर विद्युत निर्मिती संयंत्र

सौर उर्जाचे विद्युत उर्जेत रुपांतर म्हणजेच सौर प्रकाशीय उर्जा होय .सौर विद्युत संयंत्राचे मुख्य भाग म्हणजे सौर प्रकाशीय कुपी मोड्यूल /पॅनेल,विद्युत घट,चार्ज कंट्रोलर ,इनव्हरटर,नियंत्रण कक्ष ,पारेषण प्रणाली इ.चा समावेश असतो .सदरचे संयंत्रापासून स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असताना प्रतिदिन ३.० ते ३.५ युनिट इतक्या विजेची निर्मिती होऊ शकते . १ कि .वॅ क्षमतेचे संयत्र  आस्थापित करण्यासाठी साधारणतः १०० ते ३०० चौ .मी  इतक्या सावली विरहीत जागेची आवश्यकता असते . सौर संयंत्राचा वापर करून निर्माण होणारया विजेद्वारे विविध प्रकारची विजेची साधने वापरता येऊ शकते .

4. पवन – सौर संकरित संयंत्र

या संतान्त्रामध्ये पवन व सौर उर्जेचा संयुक्तीकरीत्या उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यात येते . या संयंत्रामध्ये वापरण्यात येणारे विद्युत घट सौर किवा पवन ऊर्जेद्वारे भारीत करन्यात येतात. संयंत्र आस्थापनेसाठी प्रकल्पस्थळी १०० मी . परिसरात उंच झाडे ,इमारती ,वीज वाहक ताराइ. अडथळे नसावे .तसेच वाऱ्याचा वेग २० मीटर कमीतकमी १५ की.मी प्रती तास (४.१७मीटर्स प्रती सेकंद )असावा . १कि . वॅ. क्षमतेच्या संयंत्रापासून साधारणतः २.५ ते ३.० युनिट प्रती दिन वीज निर्मिती होते . तथापि वीज निर्मिती हि वाऱ्याचा वेग व सौर प्रकाशावर अवलंबून असते .

बायोग्यास पासून विद्युत निर्मिती कार्यक्रम

सेंद्रिय पदार्थाचे जीवानुद्वारे हवा विरहीत अवस्थेत विघटन होऊन तयार होणारया ज्वलनशील वायुला बायोगॅस म्हणतात . बायोगॅसमध्ये मुख्यतः ५५ ते ६५ टक्के मिथेन , ३० ते ४० टक्के कार्बनडायऑक्साईड व काही प्रमाणात हायड्रोजन सल्फाइड ,हायड्रोजन ,नायट्रोजन कार्बनमोनॉक्साइड व ऑक्सिजन इ. वायूंचे मिश्रण असते . बायोग्यासचीउष्मांक मूल्य अंदाजे ४७००  किलो कॅलरी इतके असते . यामुळे त्याचा वापर करून वीजनिर्मिती करता येते . तसेच निर्माण होणारया स्लरीचा उपयोग उत्कृष्ठ खत म्हणून  करता येऊ शकते . बायोगॅसपासून विद्युत निर्मिती हा एक किफायतशीर विकेंद्री /पारेषण वाहिनीस संलग्नअसा उर्जा निर्मितीचा पर्याय आहे .अशा प्रकारचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेन , ग्रामीण भागातील कृषी उद्योगातील टाकाऊ पदार्थ ,हॉटेल /ढाब्यावरील वाया जाणारे अन्न .वाया जाणारा भाजीपाला वा तस्यम सेंद्रिय पदार्थावर कार्यरत राहू शकतात . याद्वारे पर्यावरण पोषक वीज निर्मिती करता येऊ शकते .अशा प्रकारचे प्रकल्प आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाचे अनुदान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते .

उर्जा बचतीचे साधे व सोपे मार्ग

मुलांसाठी – १)सकाळचा नाश्ता सर्वांनी एकाच वेळी घ्यावा म्हणजे सर्वाना एकाच वेळी गरमगरम अन्नपदार्थ वाढता येतील आणि इंधन ,वीज व आइचे श्रमही वाचतील

२)अभ्यास व खेळासाठी शक्यतो सुर्यप्रकाशाचाच वापर करा

३)स्नान वेळेवर व एकापाठोपाठ करा .त्यामुळे पुन्हा पुन्हा पाणी गरम करण्यासाठी खर्च होणारया विजेची बचत होईल

३) कुटुंबातील सर्वांचे कपडे एकाच वेळी धुतल्यास धुलाई यंत्र योग्य क्षमतेने चालवणे सोयीचे होईल

४)सायंकाळी घरातील सर्व मुले एकाच ठिकाणी अभ्यासाला बसल्याने विजेची बचत होते .

५)सर्व विद्युत उपकरणे गरज नसेल तेव्हा त्वरित बंद करा .मुलांनी लक्ष ठेवल्यास विजेचा अपव्यय नक्कीच कमी होईल .

६)शाळकरी मुलगाहि अनावश्यक असलेला दिवा बंद करुन उर्जेची बचत म्हणजेच पर्यायाने उर्जा निर्मिती करू शकतो .

गृहिणीसाठी

)गरज नसेल तेव्हा सर्व विद्युत उपकरणे आणि दिवे त्वरित बंद करा

२) दिवे आणि ट्युबलाईटवर धूळ व घाणसाचू देऊ नका

३)घराच्या भिंती व छताला फिकट रंग द्या

३विद्युत उपकरणे व वीज जोडणी साहित्य दर्जेदार वापरा

विजेच्या वहनातील हानी कमी करण्यासाठी योग्य आकाराची वीज तार वापरा

४आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार फ्रीजचा आकार ठरवा उदा .कुटुंबातील एका व्यक्तीस साधारणतः ३० लिटर क्षमता असे प्रमाण असते

५)फ्रीजमध्ये जादा बर्फ साचू देऊ नका .फ्रीज वेळोवेळी डीफ्रोस्ट करा .

६) फ्रीजमधील   दरवाजाच्या कडा आणि बिजाग-यातून हवा आत जात नाही ना याबाबत अधूनमधून खात्री करून घ्या .

७) फ्रीज भिंतीपासून पुरेशा अंतरावर आणि हवेशीर जागी ठेवा .

८)आपले घर जास्त काळ बंद राहणार असल्यास् फ्रीज बंद ठेवा

९)शक्य असेल त्तेथे कमी क्षमतेचे दिवे वापरा.

१०)पाणी तापवण्याच्या गीझेर्सनाजास्त वीज लागते म्हणून गिझर ऐवजी सौर उर्जेवर चालणाऱ्या सौर  बंबाचा जास्तीत जास्त उपयोग करा .

११) धुण्याची पावडर प्रमाणापेक्षा जास्त वापरू नका.धुलाई यंत्राचा वापर जेव्हा त्याच्या क्षमतेएवढे कपडे असतील तेव्हाच करा

१२)कपड्याची इस्त्री करताना  इस्त्रीचे तापमान कपड्याच्या प्रकारास योग्य ठरेल अशा प्रकारे नियंत्रित करा

१३)आपले ओले केस श्यक्यतो नैसर्गिकरीत्या वाळवा .

उद्योजक व व्यवस्थापन यांच्यासाठी

१)        कारखान्यान्मध्ये उर्जा प्रशिक्षण दर २-३ वरशांनी करावे.

२)      २)आस्थापनाच्या इमारतीत कोणीही नसेल तेव्हा सुरक्षेसाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना वगळता इतर सर्व दिवे बंद ठेवावे.

३)      विजेच्या बल्बपेक्षा ट्युबलाईट अधिक प्रकाश देते आणि टिकतेहि खूप म्हणून ट्युबलाईटचा वापर करा.

४)      सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.

५)      सजावटीसाठी विजेच्या दिव्यांचा जास्त वापर शक्यतो टाळावा.

६)       कामकाज संपल्यानंतर वॉटर कुलर बंद करा व जेवढया तापमानाला पाणी थंड हवे तेवढयाच तापमानाला पाणी थंड करा.

७)      आपल्या अस्थापनातील सर्व कर्मचार्यांनी वर-खाली जाण्यासाठी जीण्याचाच वापर करावा, यासाठी त्यांना प्रवृत्त करा. गर्दीची वेळ नसेल तेव्हा कार्यालयातील चालू उदवाहनाची (लिफ्ट) संख्या कमी करा.

८)      घर्षण कमी करण्यासाठी मोटर यांना नियमित वंगण करा.

९)       मोटर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे तिची कार्यक्षमता वाढेल

१०)    मोटर नेहमी भाराच्या शक्य तेवढी जवळ ठेवा.

११)     योग्य शक्तीचीच मोटर वापरा. ज्यादा शक्तीची मोटर वापरल्यास जड वीज लागते. तसेच मोटर नेहमी चांगल्या कार्यक्षमतेचीच वापरा.

१२)    मोटरला कपॅसीटर लावा. त्यामुळे केव्हीए चार्जेस कमी होतील व मोटारीचे नुकसान टाळता येईल.

१३)    मोटारीचे पट्टे व चकत्या या नेहमी मधून मधून घट्ट करा त्यामुळे पट्टा घसरून वीज वाया जाण्याचे प्रकार कमी होतील.

१४)    खराब झालेले बेअरिंग त्वरित बदला आणि त्याची वेळेवर देखभाल होईल याची काळजी घ्या.

कृषी पंप आणि वीज बचत

१) कमी अवरोधाच्या फुट व्हॉल्वमुळे विजेची १०% बचत होते.

२) विद्युत पंप व मोटर समपातळीवर बसविल्यास विजेची बचत होते. पंप पाण्याच्या पातळीपासून शक्यतो ३ मी.च्या आत बसवावा.

३) पाणी बाहेर फेकणारा पाईप शक्य तितका जमिनीच्या जवळ आणावा.

४) पाणी खेचण्यासाठी जाडसर पी.व्ही.सी पाईप वापरल्यास १५ टक्क्यांपर्यंत वीज बचत केली जाऊ शकते.

५) व्होल्टेज स्थिर राखण्यासाठी व मोटर मध्ये बिघाड होऊ नये म्हणून मोटर टर्मिनल्समध्ये शंट कपॅसीटर बसवावा.

६) बीईई स्टार लेबल असलेला पंप वापरल्यास २५% पर्यंत वीज बचत होऊ शकते.

आपणांस माहित आहे का?

१)        १ युनिट विजेची बचत म्हणजेच २ युनिट विजेची निर्मिती होय.

२)      औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून उत्पादित झालेल्या १ युनिट विजेची निर्मिती म्हणजेच ३०१५ किलो कॅलरी उष्णतेचे उत्सर्जन, १ किलो CO2,  ०.६ किलो NO2, ०.९ किलो CO आणि ०.००७ किलो SO2, वायूची निर्मिती आणि त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणात वाढ होते.

३)      १ मे.वॅ औष्णिक वीज निर्मितीसाठी ५ कोटी रुपये खर्च व त्यासाठी ५ वर्षाचा कालावधी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास दीड ते दोन कोटी खर्च.

जनसामान्यांच्या दृष्टीने उपयुक्त महाउर्जाच्या विविध योजना

१)        राज्यात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या इमारतीवर सौर विद्युत संच आस्थापित करण्याची योजना

शासकीय, निमशासकीय इमारतीमधील वीज मागणी भागविण्यासाठी पूरक वीज सौर प्रकाशीय उर्जा प्रकल्पातून निर्माण करता येते. पथदर्शी प्रकल्प म्हणून शासकीय, निमशासकीय इमारतीवर सौर विद्युत संच आस्थापित करण्यात येत आहेत. राज्य शासन निधीतून योजना राबविण्यात येत असून इमारतीच्या वीज वापरानुसार प्रकल्पाची क्षमता २० कि.वॅ.पर्यंत ठेवण्यात येते.

२)      राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सौर अभ्यासिका आस्थापित करण्याची योजना

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पद्धतीने विजेचा वापर करणे खर्चिक आहे किंवा भारनियमनामुळे विजेचा पुरवठा खंडित स्वरूपाचा आहे. अशा विविध ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिका, समाजमंदिर, ग्रामपंचायतीची कार्यालये,शाळा या ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्यार्थांन अभ्यास करणे सोयीचे व्हावे या दृष्टीने सौर अभ्यासिका योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे.

३)      राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील गावे/वस्त्या/पाडे यामध्ये सौर ऊर्जेद्वारे ग्रामीण विद्युतीकरणाची योजना

राज्यातील आदिवासी व दुर्गम ग्रामीण क्षेत्रात ज्या ठिकाणी वीज पोहोचली नाही व पुढील ५ ते ७ वर्षात पारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशी गावे/वस्त्या/पाडे/तांड्यामध्ये सौर घरगुती दिवे व सौर पथदिव्यांद्वारे विद्युतीकरण करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरात सौर घरगुती दिवे व प्रत्येक १० घरांच्या पाठीमागे एक सौर पथदीप आस्थापित करण्यात येत आहे.

४)      उर्जा लेख परीक्षण योजना

मध्यम व लघु उद्योग, शासनाचे विविध अंगीकृत उपक्रम, शासकीय/निमशासकीय इमारती, स्थानिक स्वराज्य संस्था व निवासी संकुले इ. क्षेत्रांमध्ये उर्जा लेखा परीक्षण करण्याची सवय लागावी या दृष्टीने महाउर्जाकडून निवडक घटकांसाठी उर्जा बचत कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये तांत्रिक सहाय्य व कमाल रु.४०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.

५)      उर्जा कार्यक्षम पथदिवे योजना

ग्रामीण भागातील पथदिव्यांमध्ये सध्या १०० वॅट बल्बऐवजी ३६ वॅटच्या सी.एफ.एल.चा वापर केल्यास ६४% विजेची बचत होऊ शकते. सदर योजनेंतर्गत ३६ वॅटच्या सी.एफ.एल.वर आधारित पथदिवे आस्थापित करण्यासाठी ग्रामपंचायातीना ९०% अर्थ सहाय्य दिले जाते.

६)       निष्कासित उष्णतेच्या पुनार्वापाराची (वेस्ट हिट रिकव्हरी) योजना.

या योजनेंतर्गत उद्योगांना निष्कासित उष्णतेच्या पुनर्वापरावर आधारित प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महाउर्जा मार्फत तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्य दिले जाते.

७)      उर्जा संवर्धन व उर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य स्तरावरील पारितोषिकाची योजना.

राज्यात उर्जा संवर्धन आणि उर्जा कार्यक्षमता यामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरीय उर्जा संवर्धन पारितोषिक योजना राबविण्यात येते. सदर योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होत आहे.

८)      नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांमध्ये उर्जाकार्यक्षमता वाढविण्यासाठी अर्थसहाय्य योजना.

नागरी भागातील पथदिव्यांमध्ये उर्जा बचत संयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल रु. २० लाखांपर्यंत तसेच पाणी पुरवठा योजनेंतर्गत उर्जा बचत संयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल रु. ५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते.

९)       शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये उर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी अर्थसहाय्याची योजना.

शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रु.२५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

१०)    उर्जा संवर्धन विषयी क्षमता बांधणीसाठी जनजागृती करण्याची योजना.

या योजनेंतर्गत कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता वाणिज्यिक इमारती यांच्याशी संबंधित अभियंते, शासकीय/निमशासकीय क्षेत्रातील अभियंते, वास्तुविशारद, वास्तुशास्त्र व अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी कार्यशाळा/ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे इ. साठी रु.४५०० प्रति कार्यक्रम ते कमाल रु. ५०,०००/-प्रति कार्यक्रम प्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

११)     लघु व मध्यम उद्योगांत प्राथमिक उर्जा परीक्षणाची योजना.

लघु व मध्यम उद्योगांत प्राथमिक उर्जा परीक्षण करण्यासाठी रु. ३०००/-प्रती उद्योग प्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येते. महाउर्जाने उर्जा लेखा परीक्षण करणाऱ्या ८० उर्जा परीक्षण संस्था/कंपन्यांना नोंदणीकृत केलेले आहे.

स्त्रोत - महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (meda)

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate