भारतामध्ये शेतीसाठी व घरगुती वापरासाठी पारंपरिक ऊर्जेचा पुरवठा अत्यल्प आहे व त्याची पूर्तता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर योग्य वापर व व्यवस्थापन करूनच होऊ शकतो. सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत असून प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा प्रामुख्याने विद्युत चुंबकीय लहरीद्वारे पृथ्वीवर उपलब्ध होते. भारताच्या विस्तीर्ण भूभागावर वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी जवळपास २८o-३00 दिवस भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असून प्रती चौरस मीटर भूमीवर सुमारे १५-२0 मेगा ज्युल इतकी ऊर्जा दिवसभरात उपलब्ध होते. या सौर ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवेिण्यासाठी करु शकतो.
समुद्राच्या खाया, मचूळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोड्या पाण्यात/ शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. सौर शुद्धीजल यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याची सोय केली जाऊ शकते हे पाणी पिण्यासाठी तसेच मोटार उद्योग, बॅटरीचार्जीग स्टेशन, आरोग्य केंद्र. शासकीय मोटर कार्यशाळा, प्रयोगशाळा तसेच प्रक्रेिया उद्योगामध्ये वापरले जाऊ शकते.
सौर शुद्धजल संयंत्र एक हवाबंद चौंकोनी उतरता इबा असतों, तो हवाबंद करण्यासाठी फायबर रेनफोर्सड प्लॅस्टिक (FRP) या विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो. या डब्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनीयम पत्र्याचे आवरण असून त्यावर उष्णताशोषक काळ्या रंगाचे सिलवर्टीव्ह कोटींग केलेले असते. त्यामुळे सूर्याची किरणे डब्याच्या आतील भागात शोषली जाऊन आतील तापमान वाढते. या चौकोनी (१ मी. × १ मी.) डब्याच्या वरच्या बाजूला ४ मि.मी. जाड काचेचे आवरण असून अॅल्युमिनियम किंवा प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने ही काच डब्यावर घट्ट बसविली जाते. चौकोनी डबा व काच यांच्यामध्ये खर सिर्लाँग वापरून डबा हवाबंद करण्यात येतो. या संयंत्रामध्ये अशुद्ध जल भरण्याकरिता एल (L) पाईपची (Pyc) रचना केली जाते.
एक चौरस मीटर सौर शुद्धजल सयंत्रामध्ये (Sular Si|) अशुद्ध जलाचा सर्वसाधारण एक इंच जाडीचा थर होईल (अंदाजे ५ लिटर ) इतके पाणी भरण्यात येते. अशुद्ध पाणी चौकोनी डब्यात भरल्यानंतर पाणी आत सोडणा-या पाईपचे तोंड बूच लावून बंद केले जाते. सौर शुद्धजल संयंत्राच्या वरील काचेच्या आवणातून सौर किरणे आतील काळा रंग (सिलवर्टीव्ह कोटिंग) दिलेल्या आवरणावर शोषली जातात. त्यामुळे आतील पाण्याचे तापमान वाढून बाष्पीभवन क्रियेने पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते. चौकोनी डब्यामधील वाफ आपल्या नैसर्गेिक गुणधर्मानुसार वरच्या बाजूस सरकते. ही वाफ काचेच्या आतील बाजूने अडविली जाते. परंतु काचेची बाहेरील बाजू थंड असल्यामुळे वाफेचे रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होते. काचेच्या उतरत्या रचनेमुळे असे अनेक पाण्याचे थेंब घरंगळत/घसरत खालच्या बाजूस असणा-या संकलन पाईपमध्ये जमा होतात. या संयंत्राद्वारे एक चौरस मीटर आकाराच्या चौकोनी डब्यातून दररोज २ ते २.५ लेिटर शुद्धजल मिळते.
महाराष्ट्र उर्जा विकास निगम पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०/२६६१४३९९३ ) यांनी नोदणीकृत केलेल्या पुरवठादारांकडे सौर शुद्धजल सयंत्र योग्य त्या किमतीमध्ये उपलब्ध आहे .
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सूर्यशक्ती ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ...
वीजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वाप...
कूपनलिका पुनर्भरण सयंत्र दोन भागात विभागले आहे. प्...
अमेरिकेतील एमआयटी येथील अभियंत्यांनी द्विमितीय डाय...