पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागाला दरवर्षी सौर प्रारणाची सुमारे १.५ X १०२१ वॉट-तास (औष्णिक ऊर्जेबरोबर) इतकी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वीवर माणसे वापरत असलेल्या एकूण ऊर्जेच्या तुलनेत अगदी प्रचंड म्हणजे २३,००० पटींहून जास्त आहे. सूर्यापासून एकूण सुमारे ३.९ X १०२० मेवॉ. ऊर्जा उत्सर्जित होते व तिच्यापैकी केवळ दोन अब्जांश भागाएवढी ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात पोहोचते.
पृथ्वीच्या वातावरणाच्या लगेचच बाहेर व संपूर्ण सौर वर्णपटातील मोजलेल्या सौर प्रारणाच्या शक्ति-घनतेला 'सौरांक' म्हणतात. म्हणजेव सूर्य यांच्यात सरासरी (माध्य) अंतर असताना वातावरणाच्या माथ्यावरील प्रारणाच्या आपतनाच्या दिशेत असलेल्या पृष्ठभागावर सूर्याकडून येऊन पोहोचणार्या ऊर्जेच्या त्वरेला सौरांक म्हणतात व तो दर चौ. सेंमी.ला ०.१४० वॉ. असतो. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेनुसार १९८१ मध्ये सौर स्थिरांकाचे सर्वांत विश्वासार्ह मूल्य दर चौ. मी.ला १,३७० ± ६ वॉ. एवढे होते. या सौर शक्तीपैकी ८% शक्ती वर्णपटातील जंबुपार तरंगलांब्यांची, ४७% ऊर्जावर्णपटाची आणि ४५% ऊर्जातरंगलांब्यांची असते. सौर स्थिरांक हा वस्तुतः यथार्थ वा खरा स्थिरांक नाही. कारण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या लंबगोल आकारामुळे त्यात सतत लहान सहान बदल होत असतात. ५ जुलैच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून कमाल अंतरावर असताना सौर स्थिरांकाचे सरासरी मूल्य ३.३% कमी होते; तर ३ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वांत जवळ असताना सौर स्थिरांकाच्या सरासरी मूल्यात सु. ३.४% इतकी असते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/19/2020
ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभा...
पाणी तापवण्याच्या सौर हीटर्समुळे वीजेची तसेच पैशां...
पाणी तापवण्यासाठीची सौर यंत्रणा हे एक असे उपकरण आह...
पाणी उपसण्याच्या सौर यंत्रणेवरील वारंवार विचारले ज...