प्रदूषण म्हणजे काय
प्रदूषण म्हणजे घातक दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषणाचे स्त्रोत
- गंभीर प्रदूषण स्त्रोतांमध्ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.
- प्रदूषणाचे काही स्त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्या टाक्या ह्यांना अपघात घडल्यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.
- आणखी काही सर्वसामान्य प्रकारच्या प्रदूषण स्त्रोतांमध्ये क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.
- प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल-शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.
प्रदूषणाचे प्रकार
पारंपारिक प्रदूषणांच्या स्वरूपांमध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्सर्गी (रेडियोऍक्टिव्ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच ध्वनि प्रदूषण ही प्रदूषण ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या आहे.
ध्वनि प्रदूषण
आरडाओरड म्हणजे नको असलेले आवाज. ध्वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आकलन आता जास्त चांगल्या प्रकारे झालेले आहे.
ध्वनि हा हवेच्या माध्यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्यापक गुणवत्ता पातळीमध्ये केले जाते. ध्वनिचे मापन डेसिबलमध्ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्त जोराच्या आवाजामुळे बधिरत्व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्वनि स्तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्या क्रमांकाचे ध्वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्वनिप्रदूषण स्तर दिल्लीचे ही आहे.
आवाज किंवा ध्वनिमुळे फक्त चिडचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, आणि ऍन्ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्या आवाजामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्या कायमच्या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्त ध्वनि किंवा आवाजामुळे न्यूरोसिस आणि नर्व्हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.
कचरा आणि जलप्रदूषण
जेव्हां विषारी पदार्थ तलाव, ओढा,नद्या, समुद्र आणि इतर जलाशयांमध्ये प्रवेश करतात तेव्हां ते पाण्यामध्ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुजतात किंवा पाण्यावरच अवक्षेपित होतात. परिणामी जलप्रदूषण होते ज्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेचा ह्रास होऊन जलपर्यावरण प्रणालींवर दुष्परिणाम होतो. प्रदूषक पदार्थ जमिनीखाली देखील जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्परिणाम होऊ शकतो.
जलप्रदूषण हे फक्त मानवांसाठीच नव्हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्यांसाठीही विनाशकारी आहे.प्रदूषित पाणी हे पिण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी,शेती आणि उद्योग ह्यासाठीदेखील अयोग्य आहे. ह्याच्यामुळे सरोवरे आणि नद्यांच्या सौंदर्यात्मक गुणवत्तेचा नाश होतो.
वायू प्रदूषण
वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. ह्याच्यामुळे वातावरणातील (पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणात) संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे (त्या थराचे घनत्व कमी झाले आहे) परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचलतात.
खाली काही मुख्य वायूप्रदूषक घटक आणित् यांचे स्त्रोत दिलेले आहेत
- कार्बन मोनोक्साइड (CO) एक रंगहीन, गंधहीन वायू आहे जो कार्बन आधारित इंधने अर्धवट जाळण्याने उत्पन्न होतो जसे पेट्रोल, डिझेल आणि लाकडे. सिगरेटसारख्या नैसर्गिक व कृत्रिम उत्पादनांच्या जळण्यामुळेदेखील हे उत्पन्न होतात. आपल्या शरीरात प्रवेश करणार्या प्राणवायूचे प्रमाण कमी करतो. ह्यामुळे आपली हालचाल मंदावते आणि आपणांस झोप येऊन आपण गोंधळात पडू शकतो.
- कार्बन डायऑक्साइड (CO2) एक प्रमुख हरितगृह वायू आहे. कोळसा, तेल, आणि नैसर्गिक वायू जाळणे ह्यासारख्या मानवी क्रियांचा हा परिणाम आहे.
- क्लोरोफ्लोरोकार्बन्स् (CFC) गॅसेसचे उत्सर्जन मुख्यत्वे एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटर्समधून होते. जेव्हां वायूशी ह्यांचा संयोग वायूशी घडून येतो, CFC स्ट्रेटोस्फियर पर्यंत वर जातात आणि तेथे त्यांचा संपर्क काही इतर वायूंशी घडून येतो, ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणार्या ओझोन थराचा ह्रास होत आहे.
- शिसे हे पेट्रोल, डिझेल, शिश्याच्या बॅटर्या, पेंटस्, हेयर डाय उत्पादने इत्यादींमध्ये असतात. विशेषत: लहान मुलांवर शिश्याचा वाईट परिणाम होतो. काही वेळा ह्याच्यामुळे संपूर्ण नाडी तंत्रास हानि पोचू शकते, पचन क्रियेसंबंधी समस्या बळावू शकतात आणि काही वेळा कर्करोग देखील होऊ शकतो.
- ओझोन पृथ्वी सभोवताली असलेल्या वातावरणाच्या वरील थरांमध्ये नैसर्गिक स्वरूपातच असतो. हा महत्वपूर्ण वायू सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण एखाद्या ढालीप्रमाणे करतो. तथापि, जमिनीच्या पातळीवर, हा उच्च विषारी प्रभाव असणारा एक प्रदूषण घटक आहे. वाहने व कारखाने हे जमिनीच्या पातळीच्या ओझोन उत्सर्जनाचे मुख्य स्त्रोत आहेत. ओझोनमुळे डोळ्यांस खाज सुटते, जळजळ होते व डोळ्यांतून पाणीही वाहते. ह्याच्यामुळे सर्दी-पडसे आणि न्युमोनियाच्या विरूध्द आपली रोगप्रतिकारक शक्ति कमी होते.
- नायट्रोजन ऑक्साइडमुळे (Nox) ह्यामुळे काळे धुके तसेच आम्लयुक्त पाऊस पडतो. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांसारखी इंधने जाळण्याने हा उत्पन्न होतो. हिवाळ्यात नायट्रोजन ऑक्साइडमुळे मुलांना श्वसनसंबंधी आजार होण्याची शक्यता असते.
- हवेमध्ये तरंगणारे कणस्वरूप पदार्थ (SPM) हवेमध्ये धूर, धूळ, आणि वाफेच्या स्वरूपात खूप वेळपर्यंत तरंगणारे घन पदार्थकण असतात आणि हे धुक्याचे मुख्य स्त्रोत असल्याने अंधत्वासही कारण ठरू शकतात किंवा अंधुक दिसू लागते. ह्यांतील बारीक कण, जेव्हां श्वासाबरोबर शरीरात प्रवेश करतात तेव्हां ते आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन बसतात आणि मग फुफ्फुसांना हानि पोचून श्वसनसंबंधी त्रास सुरू होतो.
- सल्फर डायऑक्साइड (SO2) हा वायू प्रामुख्याने कोळसा जाळल्यावर उत्पन्न होतो, मुख्यत्वे औष्णिक विद्युत केंद्रांतून. काही औद्योगिक प्रकियांमुळे, उदा. कागद तयार करणे आणि धातू वितळविणे इ. मुळे सल्फर डायऑक्साइड उत्पन्न होतो. काळे धुके व आम्लयुक्त पाऊस ह्यांचा हा मुख्य कारण घटक आहे. ह्याच्यामुळे फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.
रासायनिक प्रदूषण
रासायनिक प्रदूषणाचे स्त्रोत पुष्कळ प्रकारचे आहेत, ज्यामध्ये समावेश आहे:
- घरगुती नि:सरण
- औद्योगिक निचरा
- अवशेष/कचर्यातून होणारी गळती
- वातावरणीय उत्सर्जन
- घरगुती निर्मूलन
- समुद्रातील अपघात व फैलाव
- तेलाच्या रिगमधून होणारा संचालनात्मक नि:सरण
- खाणकामातील नि:सरण आणि
- शेतीसंबंधी निस्सारण
तथापि काही रसायने ही प्रत्येकास विचार करायला लावण्यासारखी बाब असते कारण हे स्थायी प्रदूषण घटक आहेत:असे पदार्थ समुद्री अन्नसाखळ्यांमध्ये प्रवेश करतात आणि सरते शेवटी ह्या साखळीतून समुद्री खाद्य भक्षकांमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करतात.स्थायी प्रदूषण घटकांमध्ये कीटकनाशके, उदा.डीडीटी आणि औद्योगिक रसायने, तसेच सध्याच्या जमान्यात पीसीबी ह्यांचा समावेश आहे.
प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी सोपे सल्ले
ध्वनि प्रदूषण बंद करा
- तुमच्या टीव्ही आणि म्युझिक सिस्टमचा आवाज कमी ठेवा.
- गाडीचा हॉर्न क्वचितच वाजवा.
- लाउडस्पीकरच्या वापरास प्रोत्साहन देऊ नका.
- लग्नाच्या वरातीत बॅन्ड व फटाक्यांचा वापर करू नका.
- सर्वांना ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
हवेचे प्रदूषण संपवा कमी करा
- घरे, फॅक्टरी, वाहने यांपासून निघणार्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा.
- फटाक्यांचा वापर करू नका.
- केरकचरा केराच्या कुंड्यांमध्ये टाका, जाळू नका.
- थुंकण्यासाठी पीकदाणी किंवा वाहत्या गटारांचा वापर करा.
- सर्वांना हवेच्या प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
जल प्रदूषण स्वच् करा
- कधीही सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नका.
- पाण्याच्या सार्वजनिक पाइपांचा गैरवापर करू नका.
- फक्त अधिकृत जागांवरच पवित्र मूर्तींचे विसर्जन करा.
- सर्वांना जल प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा.
रासायनिक प्रदूषणाची विल् हेवाट लावा
- रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर,पॉलिथिनच्या ऐवजी कागदाचा वापर, पॉलिएस्टरच्या ऐवजी कॉटन, ज्यूटचा वापर करण्याकडे कल ठेवा.
- पॉलिथिनच्या पिशव्यांची विल्हेवाट योग्य त्या प्रकारे लावा.
- जास्तीतजास्त झाडे लावा.
- सर्वांना रासायनिक प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा
जमिनीचा वापर आणि त्यामुळे होणारे भूजलाचे संभाव्य प्रदूषण
जमिनीचा वापर | भूजल प्रदूषणास कारणीभूत क्रिया |
निवासी |
- गटारे नसलेली आरोग्य व्यवस्था
- जमीन व वाहत्या पाण्यात सांडपाण्याचा निचरा
- मलनिसा:रण केंद्र किंवा कुंड
- सांडपाण्याची गळती,घन कचरा निर्मूलन
- रस्ते व शहरी कचरा,हवाई निचरा
|
औद्योगिक व व्यावसायिक |
- गटारे नसलेली आरोग्य व्यवस्था
- जमीन व वाहत्या पाण्यात सांडपाण्याचा निचरा
- मलनिसा:रण केंद्र किंवा कुंड
- सांडपाण्याची गळती,घन कचरा निर्मूलन
- रस्ते व शहरी कचरा,हवाई निचरा
|
खाणकाम |
|
रासायनिक खतांचा वापर करून केलेली शेती शेतीसाठी सांडपाण्याचा वापर जमिनीतील खारटपणा पशुपालन
|
|
किनारपट्टीय क्षेत्रे |
|
खार्या पाण्याचे अतिक्रमण |
|
स्त्रोत: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सेंट्रल पल्यूशन कंट्रोल बोर्ड,2007