आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापासून ऐकू येणारा 'कुहूsकुहू' पुढे ऑगस्ट-सप्टेंबरच्या अखेरीस ग्रीष्मातही तसाच आवाज ऐकू येतो. कुहू अशी साद ऐकू आली की 'कोकिळेला कंठ फुटला म्हणायचा' असे बऱ्याच जणांच्या तोंडून सहज उद्गार निघतात.
खरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. असे बघण्यात आले आहे की चिमण्या व इतर पक्षी पहाटे जशी चिवचिवाट करतात किंवा एकसुरात विशिष्ठ आवाज करत एकमेकांशी संवाद सादत असतात तसे कोकीळ पक्षी समूहाने करीत नाहीत तसेच इतर पक्षांच्या मनानी कोकीळ पक्षाचा आवाज खूपच मोठा असतो साधारण अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळ व्यापले जाते. आपल्याला काही सांगायचे असेल तर त्यासाठी स्पीकर लागतो. कोकीळ नर पक्षाच्या आवाजाचा चढ उतार राग, प्रेम, आणि बऱ्याच गोष्टी सांगून जाते. ‘या मधुर आवाजाने अनेक कवी व लेखकांच्या साहित्यात कोकिळेने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. पण बिचारा कोकीळ 'कुहू कुहू' असे वारंवार ओरडत राहून त्याचा गळा सुजला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्षच नसते ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
परमेश्वराने जीवांची निर्मिती करताना प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत तसेच वनस्पती, पक्षी आणि प्राणीमात्रात काहीना काही वैशिठ्ये मुद्दामुनच ठेवली आहेत जसे आवाज, आकार, रंग, दिसणे आणि त्यापाठी काहीतरी कारण असलेच पाहिजे. असो.
विविध पक्षांची किलबिल पहाटेच्या शांतवेळी सगळ्यांनी ऐकली असेल. आपण जंगलात भटकंतीला गेलो असता, किंवा परसदारी आपण नेहमी विविध तऱ्हेच्या पक्षांनी काढलेल्या वेगवेगळ्या आवाजाने त्यांच्या मित्र मैत्रिणींना घातलेल्या सादेने, कधी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शत्रू पासून सावध करण्यासाठी काढलेल्या विविध आवाजाने मन अचंबित होते आणि हे बघण्यात आणि ऐकण्यात खूप मजा वाटे !
कोकीळा पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो आणि ती उबविण्याची जबाबदारी सोपवितो. कावळा त्याच्या घरट्याकडे कोणासही फिरकू देत नाही. तो त्याच्या घरट्याचे जीवापाड रक्षण करीत असतो. कावळा आणि कोकीळा या दोन पक्षात मोठे वैर आहे. कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत ते कावळ्याच्या घरात अंडी घालतात आणि ती उबविण्याची जबाबदारीही कावळ्याकडे सोपवितात. अंडी दुसर्याच्या घरट्यात घालणे, ती न उबवणे, पिल्ले झाली कि त्यांना चारा पाणी न देणारा हा पक्षी जो फक्त अंडी घालतो आणि पिल्लांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबादारी कावळ्यावर सोपवतो. वसंत ॠतूत कुहू कुहू गाणारा हा पक्षी आंबा, आणि बाभळीच्या दाट झाडीत जास्त प्रमाणात आढळतो.
कोकीळ मादी बहुदा कावळयाचं घरटं अंडी घालण्यासाठी शोधत असते. कोकीळ नर व मादी ऐतोबा आहेत. बहुतेक सर्व पक्षी आपल्या कुवतीनुसार सुबक वा ओबडधोबड घरटं तयार करतात. पण कोकीळ नर मादींना 'असावे घरकुल आपले छान' ही कवी कल्पना वाटत असावी. मूर्ख लोक घरं बांधतात यावर त्यांचा विश्वास असतो. घरटं बांधलं नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते मग कावळीच्या नकळत तिथे कोकीळ मादी अंडी घालते. कावळी मादी ती अंडी उबवते. बाहेर आलेल्या पिलांना भरवते. ही पिले उडून जाईपर्यंत तिला त्याचा थांगच लागत नाही. तसे बघता पक्षात धूर्त आणि चतुर ‘कावळा’ पक्षी असावा पण येथे अपवाद आढळतो.
नर कोकीळ कावळयासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ आणि डौलदार दिसतो. महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. जसा माणिक लाल रंगाचा असतो तसा त्याचा भास होतो. मादी कोकीळ हा वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. नर नखशिखांत काळा, मादी मात्र फिकट राखी रंगावर त्याच गडद रंगानं खडी काढावी अशी. नराची नजर गरीब तर तिची कावेबाज. तिच्या अप्पलपोटया स्वभावाचे दर्शन बऱ्याच जणांना अनेकदा घडले असेल.
दर १८ वर्षांनी 'कोकीळा व्रताचा' महिना येतो त्यावेळी कोकीळेचे दर्शन झाल्याशिवाय किंवा आवाज ऐकल्याशिवाय भाविक महिला अन्नग्रहण करीत नाहीत. त्यावेळी अनेक कोकिळ नरांना लोकांकडून बंदीवास धडवला जातो याकडे पक्षी मित्रांनी काळजी घ्यावयास पाहिजे.
हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. कोकिळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. कोकिळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.
अंतिम सुधारित : 10/7/2020
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकड...
पक्ष्यांविषयी मनोगत.
द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची- चित्रपट-परिच...
स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या...