অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - मासे

जैवविविधता - मासे

 • असिपुच्छ मासा
 • या माशाच्या नराच्या शेपटीवर तरवारीच्या पात्यासारखा एक लांब भाग असतो म्हणून याला ‘असिपुच्छ’ हे नाव दिले आहे.

 • आंधळा मासा
 • जगाच्या निरनिराळ्या भागांतील गुहांतून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रवाहात विविध मत्स्यकुलांतील अनेक जातींचे मासे आढळतात.

 • ईल
 • ईल : अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव अँग्विला अँग्विला आणि भारतीय जातीचे अँग्विला बेंगालेन्सिस असे आहे. भारतीय ईलचे मराठी नाव अहीर आहे.

 • ईल
 • अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात.

 • एंजल-मासा
 • हे लौकिक नाव पुष्कळ निरनिराळ्या जातींच्या माशांना दिलेले दिसून येते.'एंजल' म्हणजे देवदूत.

 • कटला
 • अस्थिमत्स्यांच्या (ज्यांच्या शरीरातील सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे.

 • कॉड
 • निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात

 • दोदरी रावशी
 • मांस रुचकर व स्वादिष्ट

 • नळी मासा
 • सिन्‌ग्नॅथिडी या मत्स्यकुलात घोडामाशांच्या बरोबरच नळी माशांचाही समावेश होतो.

 • निवटी
 • एक आगळावेगळा सागरी अस्थिमासा. पिसिफॉर्मिस गणातील गोबिडी कुलात निवटी (किंवा निवटा) या माशाचा समावेश होतो. जगभर निवटी माशांच्या दहा प्रजाती आढळतात. पेरिऑप्âथॅल्मस अर्जेंटिनीलिनिएटस असे शास्त्रीय नाव असलेली जाती बहुधा सर्वत्र आढळते.

 • पर्च
 • पर्च : हे नाव पर्सिडी मत्स्य कुलातील पर्का वंशातील जातींना देतात; परंतु इतर काही माशांनाही पर्च हे नाव दिलेले आढळते. पर्कावंशात सु. ९० जाती असून बहुतेक अमेरिकन आहेत. हे गोड्या पाण्यात राहणारे असून खाद्यमत्स्य आहेत.

 • पाइक
 • पाइक : हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात.

 • पापलेट
 • पापलेट : मासळीच्या बाजारात पाँफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पाँफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे.

 • पाला
 • पाला : मत्स्यवर्गातील क्लुपिइडी कुलात या माशाचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव क्लुपिया (किंवा हिल्सा ) इलिशा आहे. याला ‘भिंग’ असेही म्हणतात. पर्शियन आखातापासून ब्रह्मदेशापर्यंत भारताच्या सर्व समुद्रकिनाऱ्यालगत आणि द. भारतातील व बंगालमधील सर्व नद्यांमध्ये हा आढळतो.

 • पिकू
 • पिकू : या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्‍लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो ‘झिर’ या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते.

 • पिरान्हा
 • पिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते.

 • पॉरपॉइज
 • पॉरपॉइज : (शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशियामधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो.

 • फीत मासा
 • लांबट व चपट्या फितीसारख्या आकाराच्या माशांना फीत मासे हे नाव देतात

 • फुप्फुसमीन
 • डिप्नोई गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात.

 • बांगडा
 • बांगडा : स्काँब्रिडी मत्स्यकुलातील खाऱ्या पाण्यातील एक खाद्योपयोगी मासा. याचे शास्त्रीय नाव रास्ट्रेलिजर कानागुर्टा असे आहे. एफ्. डे यांनी याचा समावेश स्काँबर वंशात केला असून त्याचे नाव स्काँवर मायक्रोलेपिडोट्स असे ठेवले आहे. भारतात हीच जाती आढळत असून मराठीत याला बांगडा, बांगडई किंवा तेल-बांगडा म्हणतात.

 • बिटर्लिंग
 • बिटर्लिंग : हा सायप्रिनिडी कुलातील मासा आहे. ऱ्होडियस सेरिसियस हे ह्याचे शास्त्रीय नाव आहे. हा गोड्या पाण्यात राहाणारा असून मध्य व पूर्व यूरोप आणि आशिया मायनरमध्ये (तुर्कस्तान) आढळतो.

 • बॅराकुडा
 • बॅराकुडा : या नावाने ओळखण्यात येणाऱ्या माशांचा समावेश म्युजिलिफॉर्मिस गणाच्या स्फिरीनिडी कुलात करतात. या कुलातस्फिरीना हा एकच वंश असून त्यातील २० जातींच्या माशांना बॅराकुडा हे नाव देतात, तसेच त्यांना ‘सी पाइक’ असेही म्हणतात.

 • मरळ
 • मरळ : चॅनिडी या मत्स्यकुलात मोडणारे हे मासे भारतातील सर्व नद्यांमध्ये व जलशयांत आढळतात. महाराष्ट्रात मरळींच्या मुख्यत्वे चार जाती आहेत. त्यांना अनुक्रमे चॅना मरूलियस (मरळ किंवा फुलमरळ), चॅ स्ट्राएटस (पट्टमरळ किंवा धडक्या), चॅ पंक्टॅटस (बोटरी मरळ) व चॅ. गाचुआ (डाकू, डोक किंवा डोकर्‍या) असे म्हणतात.

 • मळ्या
 • चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्थानिक लोक हा आवडीने खातात

 • मोतक
 • हा भारतातील सर्वांत कमी वजनाचा मासा आहे. याचे वजन फक्त ०·०८ ग्रॅम इतके आहे

 • मोरी
 • या माशाचे शास्त्रीय नाव स्कोलिओडॉन पॅलासोरा असे असून इंग्रजीत याला ‘डॉगफिश’ असे म्हणतात.

 • रोही पर्च
 • या माशाचा समावेश ॲनॅबॅटिडी कुलात होतो. त्याचा प्रसार आग्नेय आशिया, मलाया व आफ्रिकेत आहे.

 • रोहू
 • हा गोड्या पाण्यातील मासा आहे. याचे शास्त्रीय नाव लबिओ रोहिटा हे आहे व याचा समावेश सायप्रिनिडी या कुलात होतो. या कुलातील मत्स्य कार्प या सामान्य नावाने ओळखले जातात.

 • लांज
 • मुख्यतः खाण्यासाठी वापरले जातात

 • लॅटिमेरिया
 • डेव्होनियन प्रभावी असलेल्या क्रॉसोप्टेरिजीआय या वर्गात मोडणाऱ्या माशांपैकी सध्या अस्तित्वात असलेल्या या माशाला लॅटिमेरिया असे म्हणतात.

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate