অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एंजल-मासा

एंजल-मासा

हे लौकिक नाव पुष्कळ निरनिराळ्या जातींच्या माशांना दिलेले दिसून येते.'एंजल' म्हणजे देवदूत. देवदूतांना पंख असून दिसालया ते सुंदर असतात;म्हणून या दोन लक्षणांपैकी एखादे ज्या माशात आढळते त्याला एंजल-मासा म्हणतात.

एंजल-मासा (टेरोफायलम स्केलेर): मध्यभागी नर व उजव्या बाजूस (पुढून दाखविलली) मादी.एंजल-मासा (टेरोफायलम स्केलेर): मध्यभागी नर व उजव्या बाजूस (पुढून दाखविलली) मादी.

भारतातील राजा आणि पाकट यांच्याशी साम्य असणारा एक शार्क (शास्त्रीय नावस्क्वॉटिना स्क्वॉटिना)उष्ण आणि उपोष्ण समुद्रांत आढळतो. याचे पृष्ठ-पक्ष बरेच मागे असतात;गुद-पक्ष नसतो आणि अंस-पक्ष (छातीच्या भागावरील पर, पर म्हणजे हालचालीस वा तोल संभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी)पंखांसारखे मोठे असतात. अंस-पक्षांच्या वरील लक्षणांवरून याला एंजल-मासा हे नाव दिले आहे. सामान्यतः हा मासा लहान असतो पण १-२ मीटर लांबीचे नमुनेही आढळतात.

दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझान आणि ओरिनोको या नद्यांत सायक्लिडी मत्स्यकुलातले मासे आढळतात. यांपैकी एकाचे शास्त्रीय नावटेरोफायलम स्केलेर असे आहे. हा दक्षिण अमेरिकेचा एंजल-मासा होय. त्याच्या शरीराची लांबी १०–१५ सेंमी. असून ते दोन्ही बाजूंनी चपटे, रुपेरी आणि त्यावर काळे पट्टे असतात. त्याचे पर बरेच मोठे असतात. हा मासा देखणा व गरीब असल्यामुळे

सगळीकडे घरगुती जलजीवालयांतून ठेवलेला आढळतो. तेथे त्याची वीणही होते.टेरोफायलम वंशाच्या आणखी एका जातीला (टेरोफायलम आयमेकाय) लहान एंजल-मासा म्हणतात.

बर्म्युडा बेटात कीटोडोंटिडी मत्स्यकुलातील होलॅकँथस वंशाच्या व विशेषतः एंजलिक्थिस वंशाच्या जातींना एंजल-मासे म्हणतात. हे दोन्ही बाजूंनी चपटे व झगझगीत रंगांचे असून प्रवाळ खंडकांत त्यांची वर्दळ असते.

केप कॉडपासून रीओ द जानेरोपर्यंत आढळणाऱ्या स्पेड-माशाला (शास्त्रीय नावकीटोडिप्टेरस फाबर) कधीकधी एंजल-मासा म्हणतात.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate