অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निवटी

निवटी

एक आगळावेगळा सागरी अस्थिमासा. पिसिफॉर्मिस गणातील गोबिडी कुलात निवटी (किंवा निवटा) या माशाचा समावेश होतो. जगभर निवटी माशांच्या दहा प्रजाती आढळतात. पेरिऑप्âथॅल्मस अर्जेंटिनीलिनिएटस असे शास्त्रीय नाव असलेली जाती बहुधा सर्वत्र आढळते. हे मासे उष्ण प्रदेशातील सागरकिनाNयांवर आणि आफ्रि का व ऑस्ट्रेलिया खंडांत आढळतात. मुख्यत: किनारपट्ट्यांवरील रेतीयुक्त व दलदलीच्या भागात, तिवराच्या वनात आणि उथळ पाण्याच्या डबक्यात हे आढळून येतात. समशीतोष्ण भागातही हे अशाच अधिवासांमध्ये दिसून येतात. सामान्य माशांपेक्षा हे मासे दीर्घकाळ पाण्याबाहेर राहू शकतात. रांगत व सरपटत ते पाण्याबाहेर कोरड्या किनाऱ्या वर दूरवर जाताना दिसतात. त्यांची जीवनशैली उभयचर प्राण्यांशी काहीशी मिळतीजुळती असते. काही वेळा हे मासे बिळांत आढळतात. त्यांची काही बिळे हवेत उघडतात तर काहींची तोंडे पाण्यात असतात.

निवटी निवटी माशाचा रंग किनारपट्टीवरच्या मातीशी साधम्र्य दाखविणाऱ्या फिकट तपकिरीपासून काळपट अशा छटांचा असतो. शरीर २०-२५ सेंमी. लांब असते. शरीराचा आकार काहीसा बेडूक माशासारखा असतो. डोके आणि त्यालगतचा भाग जास्त रुंद असून त्याचे डोके बेडूकमाशाच्या डोक्यासारखे दिसते. डोके साधारणपणे अर्धगोलाकार असून त्यावर मध्यभागी पुढच्या बाजूला एकमेकांशी दोन बटबटीत डोळे असतात. ते नेत्रकोटरांमध्ये ओढून घेता येतात. डोक्याच्या कडांवर असलेल्या या दोन डोळ्यांतील कोणताही डोळा त्याला स्वतंत्रपणे चारही दिशांना फिरविता येतो. पेरिऑप्âथॅल्मस हे प्रजातीचे नाव त्यांच्या विस्तृत अशा दृष्टिक्षेत्रावरून देण्यात आले आहे. मुखगुहेच्या बाजूला कल्ले धारण करणारा भाग विस्तारित असून त्यात पाणी धरून ठेवता येते. जमिनीवर असताना कल्ले आणि त्वचा ओलसर ठेवण्यासाठी ते पाणी उपयोगी पडते. शेपटीकडील भाग मागच्या बाजूला बारीक होत जातो. शेपटीभोवती पुच्छपर असतो.

निवटी माशाला दोन पृष्ठपर आणि एक अधरपर असतो. कल्ल्यांच्या पोकळीला लागूनच दोन्ही बाजूंना वक्षपर असतात. वक्षपरांचा शरीराकडील भाग मांसल असतो आणि त्यांचा उपयोग करून या माशांना रांगता येते. शरीराची मागील बाजू चिखलातून किंवा ओल्या जमिनीवरून सरपटत जाते. तसेच हा मासा शेपटीला झटका देऊन हवेत ६० सेंमी. पर्यंत उडी मारू शकतो. अशा प्रसंगी तो हवेतील कीटकदेखील मटकवू शकतो. त्यांच्या उड्या मारण्याच्या क्षमतेमुळे त्यांना 'स्किपर' हे नाव पडले आहे. श्रोणिपरांची जोडी वक्षपरांजवळच खालच्या बाजूस असते. दोन्ही बाजूंचे हे पर शरीराजवळ एकमेकांना जोडल्यासारखे असतात. वक्षपर आणि श्रोणिपर यांच्या मदतीने हे मासे जमिनीवर रांगण्याखेरीज खारफुटीच्या (तिवराच्या) वनातील कच्छी वृक्षाच्या उघड्या मुळांवर आणि तळाकडील शाखांवर चढू शकतात. आपल्या प्रवासात ते खेकडे किंवा कीटक यांसारखे भक्ष्य मिळवितात.

पाण्यात असताना निवटी माशांचे श्वसन कल्ल्यांच्या मदतीने होते. ते पाण्याबाहेर जास्त काळ राहू शकतात आणि त्यांचे श्वसन ओल्या त्वचेच्या साहाय्याने चालते. त्यांच्या शेपटीमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. म्हणूनच ते बऱ्या चदा शेपूट पाण्यात सोडून बाकीचे शरीर पाण्याबाहेर ठेवून बसलेले दिसतात. मुखगुहेच्या कल्ल्यानजिक त्वचेमध्ये रक्तपुरवठा चांगला असल्याने त्या भागात हवा भरून निवटी बेडकाप्रमाणे मुखगुहेमधील त्वचेच्या साहाय्याने श्वसन करू शकतात. या माशांत प्रजनन कशा प्रकारे घडून येते, यासंबंधी अजून निश्चित माहिती उपलब्ध नाही.

 

किट्टद, शिवाप्पा

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate