(रूख-अळू; लॅ. लॅजिनॅन्ड्रा ओव्हॅटा, लॅ. टॉक्सिकॅरिया; कुल-अँरॉइडी). फुसझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक ओषधीय [⟶ ओषधि] जलवनस्पती. हिचा प्रसार श्रीलंकेत व भारतात (कोकण ते केरळपर्यंत आणि सह्याद्रीवर सु. १,२०० मी. उंचीपर्यंत) आहे. ती दलदलीत व पाण्याच्या ओहोळांच्या दुतर्फा दाटीवाटीने वाढलेली आढळते. तिचे सु. ५ सेंमी. जाड व जमिनीत आडवे सरपटत वाढणारे खोड [मूलक्षोड; ⇨ खोड] चिवट व वलयांकित असून त्यावर कृमिरूप मुळे व मोठी, साधी (१५−३७.५ × ५−१२.५ सेंमी.) दीर्घावृत्ताकृती, नागमोडी किनारीची, लांब देठाची पाने असतात; त्यांच्या तळाशी लहान आवरक (वेढून राहणारी) उपांगे (उपपर्णे) असतात. मार्च ते एप्रिलमध्ये स्थूल कणिश प्रकारचे फुलोरे येतात [⟶ पुष्पबंध]; ते पुं-आणि स्त्री-पुष्पबंध अशा प्रकारचे असतात; पुं-पुष्पबंध लहान दांड्यासारखा व स्त्री-पुष्पबंध गोलसर झुबक्यासारखा असतो; त्यावरील विशेष प्रकारचे आवरण (महाछद) खाली नळीसारखे, वर पसरट व टोकास शेपटीसारखे असून त्यावर परिदलहीन (संदले आणि प्रदले नसलेली) व एकलिंगी फुले येतात
[⟶ फूल]. त्यांना तीव्र वास असून अनेक कॅरियन प्रकारच्या माश्यांचे थवे त्यांवर येतात. परागकोश पिवळे दाटीने उगवलेले आणि स्त्री-पुष्पबंधावर अनेक स्त्री-पुष्पांचे किंजपुट (स्त्री-केसराचे तळभाग) अनेक मंडलांत असतात. बीजके ४−८, तलस्थ बीजकधानीवर असतात. संयुक्त फळ गोलसर (३.८ ५ सेंमी. व्यासाचे) आणि अंशतः तडकणारे असून बी लांबट (१० मिमी. लांब), लहान व खोबणीयुक्त असते. फुलांची आणि वनस्पतीची इतर सर्वसामान्य शरीरिक लक्षणे ⇨ॲरॉइडी अथवा सुरण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.वत्सनाभ विषारी असून तिचा रस जहाज असतो; तो खाजेवर लावण्याच्या मलमात घालतात. तो कृमिनाशाकही असतो. गाठदार खोड मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार, सूज इत्यादींवर वापरतात.
लेखक - प्र वैद्य / शं. आ. परांडेकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
याचे मूलस्थान भारताचा ईशान्य भाग आहे. चीन आणि जपान...
खसखस व अफूकरिता करतात.
फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग द्विदलिकित व...
आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष.