विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची म्हणजेच साध्या भाषेत विजेची गरज भागवण्यासाठी अजूनही खनिज इंधनांचाच वापर मुख्यत: केला जात आहे. परंतु, यामुळे प्रदुषणासारख्या समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होत आहे. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर द्यायला हवा.
२००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. पारंपारिक वीज जाळ्यावरील ताण कम होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण व्हावे असाही हेतू यामागे आहे. अशा पहिल्या ऊर्जादिनाच्या निमित्ताने एक पोस्टाचे तिकिटही जारी केले गेले आहे.
आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा मोठ्या प्रमाणात जाळला जातो. यामुळे जंगलतोड तर होतेच: शिवाय धूर, आरोग्य, आग यांसारखे इतर प्रश्न निर्माण होतात. अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने बरीच उत्तरे मिळतील. यांमध्ये सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रिय कचरा, जैव – अवशेष इत्यादींपासून मिळणा-या विजेचा समावेश होतो.
दैनंदिन जीवनातील ऊर्जा वापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जावापररावर भर देणे. अशा ऊर्जेची माहिती देणारे प्रकल्प- नमुने इ. बनवणे. सोलर हिटर, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. बाग रस्ते या ठिकाणी सुध्दा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 6/23/2020
जैवविविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी ह...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...
गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासा...