गिधाड म्हटले की बहुतेकांना किळस वाटते. मेलेले प्राणी खाणारा पक्षी या पलीकडे त्यांच्याबद्दल फारशी उत्सुकता दाखवत नाही. परंतु, मेलेले प्राणी लगेचच खाऊन गिधाडे संभाव्य रोगराईच्या प्रसाराला अटकाव करत असतात हे कोणी ध्यानात घेत नाही. अगदी दहा- वीस वर्षापूर्वी, जरा वस्तीपासून दूर गेले की, गिधाडे सर्वत्र दिसत आता मात्र त्यांना शोधावे लागते- कारण वस्तीच त्यांच्यापर्यंत येऊन पोहचली आहे!
गिधाडांवर आलेले हे संकट लक्षात आल्यावर आफ्रिकेतील मोठ्या शिकारी पक्ष्यांसंबधी (बर्डस ऑफ प्रे) काम करणा-या संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्वेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे इंटरनॅशनल व्हल्चर अवेअरनेस डे सुरु केला. भारतातही गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जात आहे.
मानवाच्या अधिवासावरील अतिक्रमण हे अनेक सजीवांच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे; हे आपण वारंवार वाचत आहोत. शिवाय पाण्यात मिसळणारी कीटकनाशके, औद्योगिक प्रदूषके इ. मुळेही आपण त्यांच्यावर एकप्रकारे विषप्रयोगच केला आहे. जगात सर्वत्र कमी- अधिक प्रमाणात हेच घडल्याने काही जातींची गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. (जाता जाता – ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या दोनच खंडामध्ये गिधाडे राहत नाहीत.) यामुळे सर्वत्र जीवचक्रांचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडते आहे. गिधाडे अत्यंत कार्यक्षमतेने सफाई करत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व फार आहे. भारतात ६ प्रकारची गिधाडे आढळतात. मात्र त्यापैकी पांढ-या पाठीची आणि लांब चोचवाली गिधाडे कमी संख्येने राहिली आहेत.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 7/3/2019
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या...
जैवविविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी ह...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...