जंगलाचे महत्त्व ख-या अर्थाने समजले असल्याने जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण पणाला लावणा-यांचा योग्य गौरव आणि स्मरण होण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.
राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशाच्या रहिवाशांना झाडांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही ११ सप्टेंबर १७३८ रोजी, स्थानिक राज्याने दिलेल्या वृक्षतोडीच्या अयोग्य आदेशाविरूद्ध, तेथील बिष्णोई समाजाच्या ३६३ व्यक्तींनी बलिदान केले. त्याचप्रमाणे १९९१ मध्ये वीरप्पनने केलेल्या भारतीय वनसेवेतील अधिकारी पी. श्रीनिवास यांच्या ह्त्येचेही स्न्र्ण यानिमित्ताने ठेवले जाते. केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याच्या पुढाकाराने हा बलीदान दिवस पाळला जाऊ लागला.
जंगले वाढली तरच आपला टिकाव लागेल ही आपल्या पूर्वजांनी ओळखलेली वस्तुस्थिती विसरली जात आहे. परंतु राजस्थानातील बिष्णोई समाजाने हे तत्त्व प्रत्यक्षात आणून दाखवले. हा समाज पूर्वीपासूनच निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. आजही वन्य सजीवांची आणि नैसर्गिक संसाधनांची चोरटी शिकार, निर्यात, तोड इ. रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि वन कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मानव आणि वणे यांच्या सध्याच्या ताणलेल्या संबंधाच्या संदर्भात ही प्राणांची बाजी महत्त्वाची आहे. बलिदान करणा-या अशा व्यक्तींची त्यामागील निसर्गप्रेमाची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 2/12/2020
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...
गीधांडांच्या संरक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जावे यासा...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...