অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक वन दिन- २१ मार्च

‘दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी ( आणि इतरही अनेक बाबी) आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.

मूळ संकल्पना व सुरुवात

संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.

पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.

  • अनावश्यक जंगलतोड टाळणे.
  • अधिक झाडे लावणे.
  • जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे
  • जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती

अधिक माहिती

जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणा-या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणा-या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल.

 

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६

अंतिम सुधारित : 3/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate