ह्या कार्यक्रमाची सुरूवात 1981-82 मध्ये बायोगॅस विकासासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या रूपाने करण्यात आली.
व्यापारी व सहकारी बँका शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या क्षेत्रामध्ये बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी कर्जे देतात. शेती व ग्रामीण विकासासाठीची राष्ट्रीय बँक (नाबार्ड - NABARD) बँकांना आर्थिक पुनर्सहाय्य आपोआप मिळण्याची सुविधा देते.
नमुना |
मान्यताप्राप्त क्षमता (दरदिवशीचे गॅसचे उत्पादन, घनमीटरमध्ये) |
फ्लोटिंग ड्रम प्रकारचे बायोगॅस संयंत्र - KVIC नमुना |
1 ते 10 |
KVIC नमुना - फेरोसिमेंट डायजेस्टर तसेच / अथवा फायबरग्लास रीइनफोर्स्ड (एफआरपी) गॅस होल्डर |
1 ते 10 |
दीनबंधू नमुना |
1 ते 6 |
फेरोसिमेंटने प्रत्यक्ष जागेवर बांधला जाणारा (इन-सिटु) दीनबंधू नमुना |
1 ते 6 |
प्रगति नमुना |
1 ते 6 |
रबरयुक्त नायलॉनचा बॅग डायजेस्टर असलेला फ्लेक्सी नमुना |
1 ते 6 |
ग्रामीण ऊर्जा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपशाखीय विभाग व उपशाखीय संस्था
i) प्रत्येक संयंत्रामागे दिले जाणारे केंद्रीय अनुदान
वर्गीकरण |
प्रत्येक संयंत्रामागे दिले जाणारे केंद्रीय अनुदान |
ईशान्येकडील राज्ये व सिक्किम (आसामचे सपाट प्रदेश वगळून) |
रु. 14,700/- |
आसामचे सपाट प्रदेश |
रु. 9,000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 10,000/- पर्यंत मर्यादित) |
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल (तराई प्रदेश वगळून), तामिळनाडूमधील निलगिरी, सदर कुरसुंगड व कालिपॉँग, दार्जिलिंग जिल्ह्याचे उपविभाग (प. बंगाल), सुंदरबन, अंदमान व निकोबार बेटे |
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 10000/- पर्यंत मर्यादित) |
इतर सर्व वर्ग |
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 8000/- पर्यंत मर्यादित) |
ii) बायोगॅस संयंत्राशी संलग्न स्वच्छतागृहे - अशा प्रत्येक संयंत्रांसाठी रु.1000/- चे अतिरिक्त अनुदान दिले जाते.
iii) 5 वर्षे मोफत देखभाल व वॉरंटीशी संबंधित टर्न-की (चालनादायक) कामाची फी - रु.1500/- .
iv) जुन्या, बंद पडलेल्या संयंत्रांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य - लाभार्थी तसेच विभागास लागू असल्याप्रमाणे केंद्रीय अनुदानाच्या दराच्या 50 टक्क्यांपर्यंतचे सहाय्य घरगुती प्रकारची बायोगॅस संयंत्रे दुरुस्त व पुन्हा चालू करण्यासाठी मिळू शकते. मात्र अशी संयंत्रे किमान 5 वर्षे जुनी असावी व मूलभूत दुरुस्त्यांच्या अभावी बंद पडलेली असावी.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 6/10/2020
बायोगँसमुळे लाकुडफाटा तोडुन जाळणे मी बंद केले आहे....
जैविक वायूचा वापर दळणवळणासाठी लागणारे इंजिन तसेच ज...
जैविक वायूचा वापर दळणवळणासाठी लागणारे इंजिन तसेच ज...
जैविक वायूचा वापर दळणवळणासाठी लागणारे इंजिन तसेच ज...