पर्यावरणीय परिस्थिती अहवाल
प्रस्तावना
पर्यावरणीय स्थितीचा अहवाल याचे मुख्य उद्दिष्ट्य आहे भारतातील पर्यावरणाची सद्य स्थिती जगासमोर आणणे, ज्याचा वापर मुलभूत कागदपत्रे म्हणुन अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये करता येईल.
या अहवालाचा हेतू आहे पर्यावरणाची स्थिती आणि त्यातील बदल यांचे विश्लेषण करुन येणा-या दशकांसाठी साधनसंपत्तीच्या वाटपासाठी मार्गदर्शक तत्वे व योजना पुरविणे आणि राष्ट्रीय पर्यावरण कृती नियोजनास मदत पुरविणे.
या अहवालात पर्यावरणाची स्थिती आणि त्यातील बदल (जमिन, पाणी, हवा, जैवविविधता) आणि पाच महत्त्वाचे मुद्दे (हवामान बदल, अन्नसुरक्षा, जलसुरक्षा, ऊर्जासुरक्षा आणि शहरीकरणाचे व्यवस्थापन) यांचा समावेश आहे.
या अहवालात भारतातील पर्यावरणाची सद्य स्थिती, बदलांमागील कारणीभूत घटक यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. या अहवालात पर्यावरणा -हास रोखण्यासाठी असणा-या सरकारच्या सध्याच्या आणि प्रस्तावित धोरणांचे आणि कार्यक्रमांचेही मूल्यांकन केले गेले आहे आणि आवश्यक पर्याय सुचवण्यात आले आहेत.
पर्यावरणाची परिस्थिती अहवाल २००९; काही महत्त्वाचे मुद्दे
भारताच्या भू-भागापैकी ४५% भूभागाची धूप, मातीची आम्लता, क्षारता आणि खारटपणा वाढणे, पाणी तुंबणे आणि वा-यामुळे धूप होणे यामुळे -हास झाला आहे. जमिनीचा -हास होण्यामागची मुख्य कारणे आहेत : जंगलतोड, पर्यावरणास हानीकारक पद्धतीने शेती, खाणकाम करणे आणि मोठ्या प्रमाणात भूजलाचा वापार करणे. मात्र -हास झालेल्या १४७ मिलीयन हेक्टर जमिनीपैकी दोन तृतीयांश जमिनीची प्रत सहज सुपीक करता येऊ शकते. भारतातील जंगलांचे प्रमाण देखिल हळूहळू वाढत आहे. (सध्या ते २१% आहे.)
सर्व भारतीय शहरांमध्ये वायूप्रदूषण वाढत आहे. श्वसनाद्वारे सहज फुफ्फुसात जाऊ शकणा-या हवेतील पदार्थांचे प्रमाण भारतातील सर्व ५० मोठ्या शहरांमध्ये वाढत चालले आहे. वायूप्रदुषणाचे मुख्य कारण वाहने आणि कारखाने आहेत.
भारत त्याच्या वापरक्षमतेच्या ७५% पाणी वापरत आहे आणि जर ते जपून वापरले गेले तर भविष्यातील पिढ्यांसाठी पुरेसे आहे. घरगुती पाण्यासाठी आकारले जाणारे दर, अस्वच्छता, कारखान्यांकडुन जमिनीतील पाण्याचा होणारा अनिर्बंध वापर, त्यांच्याकडुन तयार होणारी घातक व विषारी रसायन, पदार्थ, अक्षम जलसिंचन आणि रासयनिक खतांचा अवास्तव वापर ही पाण्याच्या समस्येमागील महत्त्वाची कारणे आहेत.
जैवविविधतेच्या बाबतीत भारताचा जगात १७वा क्रमांक लागतो मात्र तरीही त्यापैकी १०% जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे आवास उद्ध्वस्त करणे, इतर आक्रमक प्रजाती, पर्यावरणाचा अनिर्बंध गैरवापर, वातावरणातील बदल ही यामागील मुख्य कारणे आहेत.
भारतातील शहरी लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या झोपडपट्ट्यांत राहते.
वातावरणीय बदलांना कारणीभूत ठरत असणा-या हरीतगृह वायूंपैकी भरत केवळ पाच टक्केच वायू उत्सर्जित करतो. मात्र सुमारे ७० कोटी भारतीय लोकसंख्येला आज ग्लोबल वार्मिंगचा थेट धोका आहे कारण या ग्लोबल वार्मिंगचा परिणाम शेतीवर होतो, दुष्काळ पडतात, पूर येतात आणि वादळांची संख्या व तीव्रता वाढते आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते.
स्त्रोत:http://moef.nic.in/index.php
अंतिम सुधारित : 8/29/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.