Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

  • Ratings (2.88)

बचत दिवा योजना

उघडा

Contributor  : 21/07/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

देशभरात निर्माण होणा-या वीजेच्या उत्पादनापैकी २०% वीज ही प्रकाश मिळविण्यासाठी वापरली जाते. देशातील बरीचशी प्रकाशऊर्जा ही इनकॅण्डेसेंट बल्बच्या म्हणजे पिवळा प्रकाश देणार्‍या दिव्याच्या माध्यमातून मिळवली जाते. यात प्रामुख्याने घरांचा समावेश आहे. इनकॅण्डेसेंट बल्ब अत्यंत अकार्यक्षम असतात कारण हे दिवे केवळ १०% च वीजेचे प्रकाशात रुपांतर करतात व उर्वरीत ९०% वीजेचे रुपांतर उष्णतेमध्ये करतात.

कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसेंट लॅम्प म्हणजेच CFLचे दिवे इनकॅण्डेसेंट बल्बना उत्तम पर्याय आहे. CFLचे दिवे इनकॅण्डेसेंट बल्बच्या तुलनेत १/५ एवढीच वीज वापरतात आणि तेवढ्याच क्षमतेचा प्रकाश देतात. व्यापारी बाजारपेठेतही CFLने मोठी बाजी मारली आहे. २००३ मध्ये भारतात CFL चा खप २०० लाख इतका होता तो २००८ मध्ये २००० लाखांवर जाऊन पोहोचला. मात्र लाईटिंग असोशिएशनच्या आकडेवारीनुसार घरांमध्ये वापरल्या जाणा-या CFLच्या दिव्यांचे प्रमाण ५-१०% एवढेच आहे. याचे मुख्य कारण आहे ते त्यांची किंमत. एक CFL चा दिवा सामान्य बल्बपेक्षा ७-१० पटींनी महाग असतो.

असे म्हटले जाते की, भारतात आजमितीला सुमारे ४००० लाख इनकॅण्डेसेंट बल्ब वापरात आहेत. त्यांच्या जागी जर CFL चे दिवे वापरले गेले तर वीजेची मागणी १०००० मेगावॅटने कमी होईल.

बचत दिवा योजनेचे उद्दिष्ट्य हेच आहे. घरोघरी इनकॅण्डेसेंट बल्बएवढा प्रकाश देणारे CFL चे दिवे पुरवणे हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. ही योजना क्योटो प्रोटोकॉलच्या स्वच्छ विकास प्रणालीअंतर्गत राबवली जाणार आहे. ही योजना फेब्रुवारी २००९ मध्ये सुरु करण्यात आली.

ही योजना खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. यामध्ये CFL चे दिवे तयार करणारे खाजगी उत्पादक व राज्याराज्यांमधील विद्युत वितरण महामंडळे यांचा समावेश आहे. CFL उत्पादक त्यांना ठरवून दिलेल्या विभागामध्ये १५ रुपयाला एक याप्रमाणे उच्च दर्जाचे CFL चे दिवे विकतील.  CFL उत्पादक विद्युत वितरण महामंडळांच्या BEE या पॅनेलकडून ठरविले जातील. या योजनेनुसार केवळ ६० व १०० वॅटचे इनकॅण्डेसेंट बल्बच्या जागी अनुक्रमे ११-१५ व २०-२५ वॅटचे CFL चे दिवे विकले जातील. BEE या योजनेवर देखरेख ठेवेल.

प्रत्येक विद्युत वितरण महामंडळांच्या विभागात या योजनेअंतर्गत ५० लाख CFL चे दिवे विकले जातील अशी अपेक्षा आहे.

स्त्रोतwww.bee-india.nic.in

Related Articles
ऊर्जा
विजेची बचत काळाची गरज

सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.

ऊर्जा
विजेची बचत आणि सुरक्षा

दूरदर्शन सह्याद्री निर्मित विजेची बचत व सुरक्षा कशी करायची या संबंधित हा माहितीपट आहे.

ऊर्जा
दिवे लावणे

कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो.

ऊर्जा
ऊर्जा बचत व संवर्धन

दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्हणजे काय? उर्जेचे प्रकार , उर्जा संवर्धन म्हणजे काय व उर्जा संवर्धनासाठी शासनाच्या योजना कोणत्या , कोणते उपकरणे वापरावे , उर्जा बचत कशी करावी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

ऊर्जा
उर्जा बचतीसाठी एल.ई.डी.

उर्जा बचतीसाठी एल.ई.डी. तंत्रज्ञानाचा वापर

ऊर्जा
अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा

देशात १०२७८८ मे .वॅ. इतक्या क्षमतेचे पवनउर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी ५९६१ मे .वॅ. इतक्या वीजनिर्मितीचा महाराष्ट्रात वाव आहे

बचत दिवा योजना

Contributor : 21/07/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
ऊर्जा
विजेची बचत काळाची गरज

सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.

ऊर्जा
विजेची बचत आणि सुरक्षा

दूरदर्शन सह्याद्री निर्मित विजेची बचत व सुरक्षा कशी करायची या संबंधित हा माहितीपट आहे.

ऊर्जा
दिवे लावणे

कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो.

ऊर्जा
ऊर्जा बचत व संवर्धन

दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्हणजे काय? उर्जेचे प्रकार , उर्जा संवर्धन म्हणजे काय व उर्जा संवर्धनासाठी शासनाच्या योजना कोणत्या , कोणते उपकरणे वापरावे , उर्जा बचत कशी करावी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

ऊर्जा
उर्जा बचतीसाठी एल.ई.डी.

उर्जा बचतीसाठी एल.ई.डी. तंत्रज्ञानाचा वापर

ऊर्जा
अक्षय उर्जा ..व नवीकरणीय उर्जा

देशात १०२७८८ मे .वॅ. इतक्या क्षमतेचे पवनउर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी ५९६१ मे .वॅ. इतक्या वीजनिर्मितीचा महाराष्ट्रात वाव आहे

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi