অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६

राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६

  • राष्ट्रीय पर्यावरण धोरण सध्या अस्तित्वात असणा-या धोरणांवर आधारीत आहे. (उदा. राष्ट्रीय वन धोरण १९८८, पर्यावरण आणि विकासावरील राष्ट्रीय संवर्धन योजना आणि धोरण,१९९२; प्रदूषणात घट करण्यासंबंधीचे धोरण, १९९२; राष्ट्रीय शेतकी धोरण, २०००; राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, २०००; राष्ट्रीय जल धोरण, २००२; इ.)
  • पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे नियंत्रित बदल, कार्यक्रम आणि प्रकल्प; केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारांद्वारा होणारे पुनरावलोकन आणि कायदे यांसाठी या धोरणाकडे मार्गदर्शक म्हणुन पाहिले जावे ही अपेक्षा आहे.
  • पर्यावरणीय साधनसंपत्तीचे संवर्धन करताना सर्वांचे हित साधले जावे हा या धोरणाचा मुख्य धागा आहे. साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जे घटक या साधनसंपत्तींवर अवलंबुन आहेत त्यांना साधनसंपत्तीला हानी पोहोचण्याऐवजी संवर्धनाच्या माध्यमातुन अधिक चांगले उत्पनाचे साधन मिळवुन देणे.
  • सार्वजनिक संस्था, स्थानिक समुदाय, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था, गुंतवणुकदार आणि आंतरराष्ट्रीय विकास भागीदार अशा निरनिराळ्या घटकांच्या माध्यमांनी पर्यावरण व्यवस्थापनासाठी आपापली साधनसंपत्ती आणि बलस्थाने यांचा प्रभावी वापर करुन एकत्र येऊन काम करावे हा देखिल या धोरणामागील हेतू आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate