অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम

राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम

योजनेचे स्वरूप

  • केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना.
  • केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते.
  • 100 % केंद्र पुरस्कृत योजना
  • उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी
  • संबंधीत यंत्रणेची लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध

उद्देश

  • ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे
  • ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी
  • केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप

अनुदान वितरण

  • सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र
  • अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र
  • शौचालय जोडणी केल्यास - रु. 1,200/- प्रति संयत्र

संपर्क

जिल्हा स्तरावर - कृषी विकास अधिकारी

तालुका स्तरावर - गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)

स्त्रोत : ग्राम विकास विभाग

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate