योजना - अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- मूळ विहित नमुन्यांतील अर्ज पूर्णतया भरलेला असावा.
- १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टिफिकेट
- वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
- अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्याप्रत)
- उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण भागासाठी तलाठी/ शहरी भागासाठी तहसीलदार)
- अनुभवाबाबत प्रमाणपत्र
- निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत.
- पासपोर्ट साईज व पूर्ण आकारच फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत).
- जातीचे प्रमाणपत्र
- जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वतःच्या मालकीची/ भाड्याची/ भाडे पावती, विशिष्ट मुदतीचे भाडे करार पत्रक इ.)
- कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
- वाहन परवाना (स्वतः किंवा पहिला नातेवाईक यांचे नावे) आवश्यक. वाहन परवाना धर्काचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसाय मदत करण्याच्या हमिबाबत प्रतिज्ञापत्रक (फक्त वाहन कर्जांसाठी).
- व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक.
- शेतीविषयक कर्जासाठी : अर्जदाराचे नावे जमीन असल्याबाबतचा पुरावा. (७/१२ व ८-अ चा उतारा)
- पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असल्याबद्दल दाखला (फक्त पशुपालन व्यवसायासाठी).
- रुपये ३ लाख पेक्षा जास्त कर्जासाठी जामिनदाराची कागदपत्रे (पगारपत्रक, ओळख्पत्रक यांची झेरॉक्स प्रत)
- भूजल सर्व्हेक्षण अहवाल (विहीर पाईपलाईन प्रकल्पांसाठी)
- मतिमंद, सेरेब्रल पाल्सी / ऑटीझम अर्जदाराबाबत पालकत्व दाखला, एकत्रित फोटो, पालकांचे प्रतिज्ञापत्र.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://www.mshfdc.com/index.php/2013-03-08-09-00-16/2013-03-09-04-29-57
अंतिम सुधारित : 2/23/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.