अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ च्या प्रकरण दोनमधील विभाग तीन मध्ये अत्याचाराचे स्वरूप स्पष्ट केल्यामुळे यातील कोणत्याही कृतीविरुद्ध अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तीला या कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येतो.
कलम (३)(१)(१) : अनुसूचित जाती व जमाती यांचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जाती व जमातीच्या कोणत्याही व्यक्तीस घृणास्पद पदार्थ, ज्याचा अन्न वा पेय म्हणून समावेश होत नाही, असा पदार्थ खाण्याची /पिण्याची जबरदस्ती करणे.
कलम (३)(१)(२) : संबंधित व्यक्तीच्या वास्तव्याच्या जागेत/ घराच्या ओट्यावर/ दारात वा अपमान करण्याचा वा त्रास देण्याच्या वाईट उद्देशाने घृणास्पद पदार्थ टाकण्याचे कृत्य करणे.
कलम (३)(१)(३) : संबंधित प्रवर्गाच्या पुरुष/ महिलांच्या अंगावरील वस्त्र फाडणे, नग्नावस्थेत/ रंगवलेल्या चेहऱ्याने, नग्न शरीराने धिंड काढणे, मानवी प्रतिष्ठेचा अवमान करणारी कोणतीही कृती करणे.
कलम (३)(१)(४ व ५) : संबंधित जातीच्या व्यक्तीच्या मालकीची कोणतीही जागा अन्यायाने घेणे, लागवड करणे, जमीन, जागा व पाणी यांच्या वापरास अडथळा निर्माण करणे.
कलम (३)(१)(६) : अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या सदस्यास शासनाने नेमून दिलेल्या व्यक्तीच्या सेवेव्यतिरिक्त वेठ करण्याची सक्ती करणे किंवा अशा प्रकारचे सक्तीचे श्रम करावयास लावणे.
कलम (३)(१)(७) : अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला त्याने एखादया विशिष्ट उमेदवाराला मत देऊ नये किंवा दयावे अथवा कायदयाने उपबांधील केलेल्या पद्धती व्यतिरिक्त अन्य रीतीने मतदान करण्यास भाग पाडणे, दडपण आणणे/ धाकपटशा करणे.
कलम (३)(१)(८) : संबंधित जाती व जमातीच्या व्यक्तीविरुद्ध ती निर्दोष असल्याचे माहिती असूनही त्यांच्याविरुद्ध खोटा, द्वेषमूलक किंवा तापदायक दावा अथवा फौजदारी व अन्य वैध कार्यवाही दाखल करणे.
कलम(३)(१)(९) : संबंधित प्रवर्गाच्या व्यक्तीचे काम होऊ नये व त्यांना त्रास होईल वा वाईट उद्देशाने कोणत्याही लोकसेवकाला खोटी व शुद्र माहिती पुरवणे व तशी व्यवस्था निर्माण करणे.
कलम (३)(१)(१०) : सार्वजनिक ठिकाणी चारचौघांसमोर जातीवाचक शिवीगाळ, पाणउतारा वा अपमान करणे किंवा धाकदपटशा दाखविणे.
कलम (३)(१)(११) : अनुसूचित जाती व जमातीच्या कोणत्याही महिलेवर तिची बेअब्रू व तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे व तिच्याविरुध्द बाळाचा वापर करणे.
कलम (३)(१)(१२) : कोणतीही अनुसूचित जाती व जमातीची स्त्री आहे हे माहीत असूनही स्वबळाचा वापर करून त्या स्त्रीच्या इच्छेविरुध्द तिचे लैंगिक शोषण करण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करणे व त्या परिस्थितीचा फायदा घेणे.
कलम(३)(१)(१३) : संबंधित प्रवर्गाच्या लोकांकडून वापरला जाणारा कोणताही पाण्याचा झरा, तलाव, जलाशय, विहीर वा अन्य कोणताही जलस्त्रोत यामधील पाणी ते सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी वापरले जात असेल त्यासाठी अयोग्य ठरेल अशा घृणास्पद पदार्थ, विषारी पदार्थ, टाकून दूषित करणे.
कलम(३)(१)(१४) : कोणत्याही अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीस सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जाण्यायेण्यास रूढीप्राप्त अधिकार नाकारणे वा प्रतिबंध करणे.
कलम(३)(१)(१५) : संबंधित जाती व जमातीच्या व्यक्तींना स्वतःचे राहण्याचे घर, गाव, जागा वा अन्य निवासस्थान सोडून जाण्यास भाग पाडणे किंवा जबरदस्ती करणे.
संदर्भ : नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.
अंतिम सुधारित : 7/21/2020
दलित व आदिवासींच्या विरोधातील अत्याचारांची व्याख्य...
अनेक आदिवासी जमाती ह्या विविध कारागिरींत आणि हस्तक...
एक भारतीय विमुक्त जमात.
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...