आयोगाची सर्वसाधारण कर्तव्ये
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाची सर्वसाधारण कर्तव्ये व अधिकार पुढीलप्रमाणे आहेत –
- अनुसूचित जाती व जमातीसाठी संविधान व राज्य शासनाकडून उपलब्ध सवलती व हक्कासाठी तरतुदीप्रमाणे सद्यःस्थितीचा अभ्यास करणे व शासनास उपाय सुचविणे.
- अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींकडून येणाऱ्या तक्रारींची चौकशी करणे.
- अनुसूचित जाती व जमातीच्या सामाजिक, आर्थिक विकासाच्या योजना, धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत भाग घेऊन शासनास सल्ला देणे व त्या धोरणाचे, योजनांचे मूल्यमापन करणे.
- अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ प्रमाणे दाखल प्रकरणांचा आढावा घेणे. पीडित व्यक्तीस देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेणे. तसेच पोलिसांकडील थकीत चौकशी प्रकरणे किंवा तक्रार दाखल करून न घेतलेल्या बाबींची चौकशी करणे.
- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या प्रगतीचा आढावा घेणे.
- अत्याचार घडलेल्या ठिकाणांना भेटी देणे व अत्याचारग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत उपाययोजना सूचित करणे.
- अनु. जाती – जमातीच्या संदर्भातील विषयावर संशोधन करणे आणि राज्य शासनाला संशोधन अभ्यासाचा अहवाल सादर करणे व त्या आधारे अनु. जाती/जमातीच्या विषयावर राज्य शासनाला सहाय्य करणे.
- अनु. जाती – जमातीच्या कर्मचाऱ्यांवर सेवाविषयक तक्रारी स्वीकारणे व तपास करणे. अनु. जाती-जमातीसंबंधी आरक्षण धोरणाचा आढावा घेणे.
- सेवायोजन/ भरती, शिक्षणक्षेत्रातील प्रवेश, निवडणूकविषयक बाबी यांच्या आरक्षण धोरणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
- अनु. जाती-जमातीच्या विविध समस्यांबाबत राज्य शासनाशी संपर्क ठेवणे.
- आरक्षण धोरण अंमलबजावणीबाबत उपाययोजना सुचविणे.
- अनु. जाती व जमातीच्या कल्याणकारी योजनांसंबंधी सल्ला देणे.
- अनु. जाती व जमातीच्या कल्याण, आरक्षण, संरक्षण, विकासासंबंधी इतर ज्या ज्या बाबी राज्य शासनाकडून ठरविण्यात येतील त्याबद्दल कार्यवाही करणे.
- अनु. जाती व जमातीच्या यादीमधून जाती व जमाती वगळण्यासाठी शिफारस करणे.
पुढील प्रकरणात आयोग कार्यवाही करणार नाही
- ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्ष अनुसूचित जाती/जमातीचे आहेत.
- ज्या प्रकरणात दोन्ही पक्ष बिगर अनुसूचित जाती/ जमातीचे आहेत.
- जे प्रकरण मुख्यतः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किंवा अनुसूचित जमाती आयोगाशी संबंधित आहे.
- जे प्रकरण मुख्यतः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किंवा अनुसूचित जमाती आयोगाशी संबंधित आहे.
- जे प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन आहे किंवा इतर कुठल्याही प्राधिकरणाच्या विचारधीन आहे.
- केंद्र शासनाचे किंवा महामंडळे, कंपन्यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची निव्वळ सेवाविषयक प्रकरणे.
संदर्भ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग व जनजाती सल्लगार परिषद
नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.