अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नांव | सुक्ष्म पत पुरवठा योजना |
२ | योजनेचा प्रकार | केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | या योजने अंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५ टक्के व्याज दराने रु.५००००/ पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये रु.१००००/ अनुदान दिले जाते व उर्वरीत रक्कम रु.४००००/ कर्ज म्हणून दिली जाते. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
८ | योजनेची वर्गवारी | रोजगारनिर्मिती |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
१ | २०१२-१३ | ४१५.७५ | १६६३ |
२ | २०१३-१४ | २५८.२५ | १०३३ |
३ | २०१४-१५ | ७५.२५ | ३०१ |
स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/25/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...