अनुसूचित क्षेत्रात दुर्गमतेमुळे पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत अशा क्षेत्रातील अतिमागास व दारिद्रय रेषेखालील जीवन जगणा-या आदिम जमातीच्या शेतक-यांसाठी त्यांना सुधारित शेतीची गोडी निर्माण व्हावी. शेतीत सुधारणा व्हावी, पर्यायाने त्यांचा विकास व्हावा व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांना मुख्य प्रवाहात सामील होता यावे या उद्देशाने वाडी विकास कार्यक्रम योजना शासनाने पेण व पांढरकवडा या प्रकल्प क्षेत्रांतर्गत आदिम जमातीच्या लोकांसाठी आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. आदिम-2203/प्र.क्र.85/का.17, दिनांक 19.8.2003 अन्वये मंजूर करण्यात आली आहे. सदरची योजना महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरीयाज (मित्रा), नाशिक या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून या योजनेमार्फत स्वयंरोजगार निर्माण करणे, जमिनीची उत्पादन क्षमतेत वाढ, शेतीच्या उत्पन्नात वाढ, कुटूंबाच्या स्थलांतरामध्ये घट, आरोग्य व राहणीमान यात सुधारणा करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यासाठी रुपये 66.00 लक्ष निधी उपलब्ध झालेला आहे.
या योजनेअंतर्गत एकूण 300 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
संपर्क-
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण / पांढरकवडा.
माहिती संकलन: प्राची तुंगार
स्त्रोत: आदिवासी विकास विभाग
अंतिम सुधारित : 6/11/2020