অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था

प्रस्तावना

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली. या संस्थेचे आयुक्त हे प्रमुख आहेत व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी एक सहा संचालक व एक उपसंचालक कार्यरत आहेत.

संस्थेची उद्दिष्टे

  1. केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे.
  2. आदिवासी जीवन व विकास या विषयावर संशोधन करणे.
  3. आदिवासी विकास विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच आदिवासी विद्यार्थ्याकरता सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.
  4. आदिवासींसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे.
  5. आदिवासी कळा व संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय चालवणे व हस्तकला प्रदर्शन, लघुपटाची निर्मिती करणे.
  6. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.

संशोधन शिष्यवृत्ती

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून दरवर्षी दोन विद्यर्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात येते. आदिवासी जमातींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती या संस्थेकडून देण्यात येते. तसेच केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या डॉक्टरल रिसर्च फेलोशिप व पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिपसाठीचे राज्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज ही संस्था केंद्राकडे शिफारशीसह पाठवते. आलेल्या अर्जामधून राष्ट्रीय पातळीवर २५ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते.

 

संदर्भ : नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.

अंतिम सुधारित : 6/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate