महाराष्ट्र शासनाने १९६५ साली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय स्थापन केले. राज्यातील आदिवासी जमातींच्या हस्तकला वस्तू व दैनंदिन वापरातील सुमारे १२८२ वस्तू संग्रहालयात प्रदर्शित केल्या आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाने या संग्रहालयास ‘प्रेक्षणीय स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग विस्तृत अशा यंत्रणेद्वारे आदिवासी विकासाचे का करत आहे. राज्यातील आदिवासी विकास विभाग एकीकडे आदिवासी उपयोजना राबवताना विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम विभागातील दुसऱ्या यंत्रणेकडून करून घेत असते. तसेच आदिवासी जमातींच्या विषयावरील संशोधन व मूल्यमापनाचे काम संलग्न यंत्रणेकडून करून घेते. तसेच राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना बीज भांडवल उपलब्ध करून देणे व त्यांना अर्थसहाय्य देण्याचे काम राज्यातील आदिवासी विभागातील शबरी महामंडळाकडून करण्यात येते.
संदर्भ : नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.
अंतिम सुधारित : 6/11/2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रविकासाची...
माडिया गोंड, कोलाम णी कातकरी या तीन जमातींना महारा...
२००४ सालामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण भागात डेव्हलप...