महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यापैकीच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना ही आहे. या योजनेमुळे युवकांना रोजगार निमिर्तीतून स्वावलंबन होता आले आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे.
व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सध्या चार निवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये सुरु करण्यात आली आहेत. यात इलेक्ट्रीशियन, ऑईल इंजिन/इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती, मोटार मॅकॅनिक इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने असतो. एका सत्रात ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. प्रशिक्षणार्थींच्या इच्छेनुसार तीन प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण त्याला घेता येईल.
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीस दरमहा रु.४००/- विद्यावेतन तसेच प्रशिक्षणानंतर तीन महिने शहरी भागातील कार्यशाळेत प्रात्यक्षिकांची संधी, आवश्यक कच्चे साहित्य व अनुषंगिक अवजारे पुरविण्यात येतात.
अनुसूचित क्षेत्रात दुर्गमतेमुळे पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत, अशा क्षेत्रातील अतिमागास व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या आदिम जमातीच्या शेतकऱ्यांसाठी त्यांना सुधारित शेतीची गोडी निर्माण व्हावी. शेतीत सुधारणा व्हावी, पर्यायाने त्यांचा विकास व्हावा व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांना मुख्य प्रवाहात सामील होता यावे या उद्देशाने वाडी विकास कार्यक्रम योजना राबविली आहे.
शासनाने पेण व पांढरकवडा या प्रकल्प क्षेत्रांतर्गत आदिम जमातीच्या लोकांसाठी आदिवासी विकास विभागासाठी मंजूर करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज (मित्रा), नाशिक या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी ६६ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे संपर्क साधावा.
माहिती संकलन- विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण भवन, नवी मुंबई.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/11/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...