प्रकल्पक्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आहेत, त्या प्रत्येक योजनेसाठी किती निधीची तरतूद आहे, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण किती निधी प्राप्त झाला आहे, एकूण किती निधी खर्ची पडला, मागील महिन्यात किती निधी प्राप्त झाला होता, प्रकल्पक्षेत्रातील कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी देण्यात आला.
प्रकल्पस्तरीय देखरेख व संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे का, त्यावरील सदस्य, किती बैठका झाल्या याबाबतचा तपशील
जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आहेत, त्या प्रत्येक योजनेसाठी किती निधीची तरतूद आहे, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण किती निधी प्राप्त झाला आहे, एकूण किती निधी खर्च पडला, मागील महिन्यात किती निधी प्राप्त झाला होता, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांसाठी किती निधी देण्यात आला.
जिल्हा आदिवासी उपयोजना तयार करण्यात आली आहे का, त्यामध्ये किती निधीची मागणी करण्यात आली होती, मंजूर निधी किती आहे
तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आहेत, त्या प्रत्येक योजनेसाठी किती निधीची तरतूद आहे, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण किती निधी खर्च पडला, मागील महिन्यात किती निधी प्राप्त झाला होता, तालुक्यातील कोणत्या गावांसाठी किती निधी देण्यात आला.
गावात राबवल्या जाणाऱ्या योजना कोणत्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या व नावे, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण किती निधी प्राप्त झाला आहे, एकूण किती निधी खर्ची पडला, मागील महिन्यात किती प्राप्त झाला होता.
संदर्भ : महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना भाग -३
नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.
अंतिम सुधारित : 6/11/2020
आज आदिवासी उपयोजनेवर देखरेख करण्यासाठी प्रकल्पाच्य...
आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रविकासाची...
माडिया गोंड, कोलाम णी कातकरी या तीन जमातींना महारा...
२४ जानेवारी २०१३ रोजी आंध्र प्रदेशाने अनुसूचित जात...