स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविण्यास अर्थसहाय्य
उद्देश व स्वरुप
आदिवासींच्या शैक्षणिक विकासाकरिता कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना 1953-54 पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या आश्रमशाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेष, शैक्षणिक साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. त्याकरिता कर्मचा-यांचे पगार व परीक्षणाकरिता विहित प्रमाणात अनूदान शासनाकडून देण्यात येते.
प्रवेशाच्या अटी
शासकीय आश्रमशाळेत प्रवेशाकरिता असलेल्या सर्व अटी लागू.
संपर्क : संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक / संस्था चालक.
अनुदानित आश्रमशाळेस मान्यतेकरिता अटी
- 1. संस्था नोंदणीकृत असली पाहिजे.
- 2. विहित नमून्यात आश्रमशाळा सुरु करण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण, उपलब्ध विद्यार्थी संख्या, संस्थेची आर्थिक स्थिती, आदिवासी क्षेत्रातील कार्य इ. च्या माहितीसह अर्ज करणे आवश्यक.
संपर्क- संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
माहिती संकलन: प्राची तुंगार
स्त्रोत: आदिवासी विकास विभाग
अंतिम सुधारित : 7/16/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.