इंधन, प्राणवायू (ऑक्सीजन ) व उष्णता या तीन गोष्टीं एकत्र आल्याने आग निर्माण होते. या मध्ये एखादी गोष्ट नसली तरी आग निर्माण होऊ शकत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते.
1. वणवा ( झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन निर्माण होणारी आग ), वीज पडणे या नैसर्गिक कारणाने आग लागते.
2. घरात निष्काळजीपणामुळे गॅस, स्टोहचा वापर/ वीजेचा शॉट सर्कीट यामुले देखील आगी लागतात.
3. पेट घेणारी रसायने,पेट्रोलियम पदार्थ, विजेच्या तारांची आयोग्य पद्धतीने मांडणी यामुळे आग लागते.
4. पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पद्धतीने ठेवल्यास व त्यांचा आगीशी संबंध आल्यास आगी लागतात.
5. विडी.सिगारेट पिऊन / ओढून बेजबाबदारपणे जंगलात, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकणे तसेच फटाक्यांचा अतिरिक्त व चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे आगी लागतात.
1. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होते.
2. जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.
3. जंगल व शेतीच्या परिसरात आग लागल्यामुळे चार, शेती अवजारे, जळाऊ इंधन ( सरपण,गोवऱ्या) यांचे नुकसान होते.
1. वीज वाहक तारा, घरातील वीज कलेक्शन, विजेची उपकरणे सुस्थितीत आहेत का ? याची इलेक्ट्रिशियन ( वायरमन) किंवा विजेसंबधी जाणकर व्यक्तींकडून तपासणी करून घ्या.
2. घरातील आगपेट्या, विजेची उपकरणे लहान मुलांपासून दूर ठेवा.
3. रॉकेल, पेट्रोल, डिझेल, यांसारखे ज्वालाग्रही व्यवस्थित ठेवा. शक्यतो पेट्रोल व डिझेल घरात ठेऊ नका.
4. गॅस, शेगडी, स्टोहचं काम संपलं की त्वरित बंद करून ठेवा. काम करताना त्यात अडचण जाणवत असेल तर त्यासंबंधी माहितगार व्यक्तीकडून ते लवकर दुरुस्त करा.
5. गॅस, शेगडी, स्टोह, चुलीवर पदार्थ शिजत ठेऊन बाहेर जाऊ नका किंवा गप्पा गोष्टी करत बसू नका. स्वंयपाक होईपर्यंत स्वयंपाक गृहाच्या बाहेर जास्त वेळ थांबू नका.
6. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, घरात अग्निशामक उपकरण ठेवावे.
7. विजेच्या तारांनी किंवा विजेच्या उपकरणांनी लागलेल्या आगीवर पाणी फेकू नका. त्यासाठी त्यावर माती, वाळू टाकून आगीचा भडका कमी करण्याचा प्रयत्न करा व अग्निशमन दलास फोन लावा.
8. आगी संबधी कुठल्याच बाबतीत निष्काळजीपणा करू नका व मोठी जोखीम स्वीकारू नका.
9. घरातील प्रत्येक व्यक्तीने अग्निशमन दल, पोलीस, दवाखाना यांचे संपर्क क्रमांक संग्रही ठेवा.
10. फटाके पेटविताना मोकळ्या जागेत, काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने पेटवा.
माहिती लेखन: बाळू निवृत्ती भांगरे, खडकी बुद्रुक, ता. अकोले.
अंतिम सुधारित : 6/16/2020
शॉर्ट सर्किटमुळे गाड्या पेटतात. मग ती खाजगी कार, ब...
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या हफ्त्यानंतर ते जून ...