१. आपत्तीच्या प्रंसंगी कोण कुठे आहे? हे बाहेरील लोकांना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना कळवे. त्या प्रमाणे संकट ग्रस्तांना मदत करणं सोपं होईल.
२.आपत्ती प्रसंगी सर्वात अगोदर दुर्बल घटकांना मदत करणं सोपं होईल. उदा. लहान मुले, अपंग,वृध्द इत्यादी.
३.या दिनचर्या / आपत्ती व्यवस्थापन घड्याळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात वापर करून सरकारला सादर केलं तर मदत कार्य अधिक प्रभावी होईल.
४. विविध सामाजिक संस्था किंवा सरकार यांना तेथिल लोकांन सोबत त्यांच्या वेळेनुसार काम करता येईल.
दिनचर्या घडयाळ तयार करताना लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणुन त्यासाठी प्रत्येक गटातील प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. उदा. शेतकरी, महिला, शाळेतील मुले, युवक, वृद्ध, नोकरदार.
१.सर्व प्रथम एक कार्डशीट पेपर घेऊन त्यात स्केज पेनच्या साह्याने गटानुसार गोल वर्तुळे काढा. ( चित्रात दाखवल्या प्रमाणे) वर्तुळ काढताना एक काळजी घ्या की त्यात लेखन करता येईल.
२.त्यानंतर अगदी आतल्या लहान वर्तुळात घड्याळाचे १ ते २४ पर्यंतचे आकडे लिहा.
३.मग गटनिहाय रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंतची दिनचर्या त्या त्या वर्तुळात लिहा.
४.संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यांनतर त्याचे त्याच ठिकाणी वाचन करून त्यातील त्रुटी दुरुस्त करा.
५.तयार केलेले दिनचर्या घडयाळ रंगारीच्या ( पेंटर)मदतीने गावातील सावर्जनिक ठिकाणी व्यवस्थित काढा. ( कमीत कमी गावात ३-४ ठिकाणी काढा.)
१.बऱ्याचदा गटाची दिनचर्या सारखी नसल्याने दिनचर्या घडयाळ बनविताना अडचणी येतात. जसं प्रत्येक शेतकऱ्यांची दिनचर्या सारखी नसते. अशा वेळी त्या गटाची कॉमन दिनचर्या नोंद करावी.
माहिती लेखन: बाळू निवृत्ती भांगरे, खडकी बुद्रुक, ता.अकोले.
अंतिम सुधारित : 2/2/2020