आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्यास सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन ( CBDM- Community Based Disaster Management ) तंत्र अवलंबित करण्याबाबद दोन शब्द. ... ....
भूकंप, पूर, विज पडणे, वादळ, आग या आपत्ती येणे व त्यांची तीव्रता कमी करता येणे आपल्या हातात नसले तरी योग्य नियोजन केल्यास त्यांच्यापासून होणारे नुकसान कमी करता येणे शक्य आहे.
कुठेही निसर्ग किंवा मानव निर्मित आपत्ती उद्भवली की त्या क्षणी प्रथम दुर्बल होतो तो स्थानिक नागरिक ! तो बाहेरून येणा-या मदतीची प्रतिक्षा करण्याऐवजी थेट मदत कार्याला सुरुवात करतो. त्या वेळी कधी कधी त्याचे नुकसानही होते. म्हणून स्थानिक नागरिकांना आपत्कालीन मदत कार्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तंत्र स्वीकारायला हवं. समुदाय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेलं आपत्ती पूर्व नियोजन !
सविस्तर विचार केल्यास आपत्ती व्यवस्थापन म्हणजे, आपत्तीच्या सुनियोजित प्रतिकारासाठी योग्य तयारी तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतर उद्भवणारी परिस्थिति पुर्वपदावर आणण्याची योजना होय.
सरकार पण प्रत्येक वर्षी तालुका स्तरावर मा. तहशीलदार यांच्या अध्यक्षते खाली तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करते.पण ते संपूर्ण तालुक्याचा विचार करुन तयार करते .अशा वेळी सरकारला आपल्या गावाची गरज काय आहे ते समजत नाही. याउलट गावातील समुदायानी मिळून जर आपत्ती व्यवस्थापन आराखडा केला व तो सरकारला दिला तर आपली गरज काय आहे. हे सरकारला समजेल. त्यामुळे आपत्ती काळात आपल्याला आवश्यक ती मदत सरकार कडून मिळण्यास मदत होईल.
१. स्थानिक लोकांत आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे.
२. आपत्ती पूर्व नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे. हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे.
३. आपत्ती तयारीचा स्तर उंचावणे.
४. धोका व वाईट परस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे.
५. उपलब्ध संसाधनांची जाणीव करुण देणे.
६. प्रशासन व गाव यात समन्वय साधून गाव प्रशासनास मजबूती प्राप्त करुण देणे.
१. गावाची प्राथमिक माहिती/ पार्श्वभूमी
२. गावाचा आपत्तीचा इतिहास
३. आपत्तीचा कालानुक्रमे आलेख
४. गावातील संभाव्य धोके व उपाय योजना
५. गावातील संवेदनशील जागा/ गर्दीची ठिकाणे
६. गावाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा
७. आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा
८. गावातील लोकांची दिनचर्या
९. वार्षिक दिनदर्शिका
१०. खाद्य संस्कृती आराखडा
११. शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा
१२. आपत्कालीन महत्त्वाचे संपर्क क्रमांक
माहिती लेखन: बाळू भांगरे, खडकी बुद्रुक, ता.अकोले.
अंतिम सुधारित : 8/9/2020
दिल्ली शहराला १७२० सालापासून पाचवेळा पाच रिश्टर क्...
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस...