विवक्षित स्वीकृती. स्वीकृती म्हणजे मान्यता किंवा कबुली. न्यायालयीन कार्यवाहीमध्ये अभिस्वीकृतीला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच दैनंदिन व्यवहारात टपालखात्याने विशिष्ट शुल्क घेऊन पत्रांची अभिस्वीकृती देण्याची व्यवस्था केलेली आहे. मुदत-अधिनियमांनुसार ऋण, मालमत्ता वा हक्क ह्यांबाबत विशिष्ट मुदतीनंतर न्यायालयात कार्यवाही करता येत नाही. ही मुदत अभिस्वीकृतीपासून मोजली जाते. एखाद्या संस्थेच्या संचालकाने वा वैध प्रतिनिधीने ताळेबंदावर केलेली सही, ही ताळेबंदातील दायित्वाबाबत अभिस्वीकृती धरली जाते. अमेरिकेत लग्नाआधी झालेल्या अपत्यास त्याच्या पित्याने सर्वांसमक्ष आपले अपत्य म्हणून अभिस्वीकृती दिल्यास तेथील विधिनुसार त्या अपत्यास वैधता मिळते.
लेखक :र.रू.शाह
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020