1 नोव्हेंबर 2017 पासून कांदिवली, मुंबईत मध्ये प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचा रहिवासी आणि दुकानदारांनी निश्चय केला आहे.
रहिवासी, दुकानदारांची एकजूट
कांदिवलीतील ठाकूर गाव आणि सिद्धार्थ नगर इथल्या सुमारे 30 सोसायट्यातल्या 15 हजार रहिवासी आणि 700 हून अधिक दुकानदारांनी हा पणच केला आहे की या परिसरांत प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार करायच्याच.
दुकानदारांचे पैसेही वाचतील
रहिवाशांनी सांगितले की या निर्णयामुळे केवळ पर्यावरणाला मदत होणार नाही, तर दुकानदारांचे पैसेही वाचतील.
ठाकूर गाव आणि सिद्धार्थ नगर येथील रहिवासी फोरमचे संस्थापक सदस्य कमांडर (सेवानिवृत्त) संदीप श्रीवास्तव म्हणाले की, रस्त्यावरील लहान आकाराच्या स्टॉल्सच्या मालकांनीही प्रति दिन 200 रुपये प्लास्टिकच्या पिशव्या पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात. "आता हे विक्रेते ग्राहकांना हव्या तर कापडी पिशव्या 5 रुपयाला पुरवतील. प्लास्टिक पिशव्या न वापराव्या लागल्याने लहान विक्रेत्यांचे वर्षाला 70,000 रुपये वाचतील, तर मोठ्या विक्रेत्यांची वर्षाला 2.5 लाख रुपयांची बचत होऊ शकेल."
सतत प्रचार प्रसारचे फळ
त्यांनी सांगितले की, "प्लास्टिकच्या पिशव्यावर बंदी घालण्याची आलेली ही चळवळ या भागात अनेक महिने चालली आहे आणि फेरीवाल्यांच्या संघटनांसोबत अनेक बैठकी झाल्यानंतर ठरले गेले की बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी 1 नोव्हेंबर पासून कोणत्याही परिस्थितीत करायचीच."
"रहिवाशांपुढे हे एक मोठे आव्हान आहे आणि ते आम्ही यशस्वी करूच. केवळ कांदिवलीमध्ये नव्हे तर मालाड आणि दहिसरमध्ये जागरुकता मोहिम राबवण्यात आली आहे. 13 गणपती मंडळात प्रसार करण्यात आला. अनेक रहिवाश्यांनी प्रत्येकी 5000 रुपये दिले आहेत, पोस्टर छापली गेली आणि खास टी-शर्ट तयार केले", असे त्यांनी सांगितले.
'सोच सयानी' मोहीम
या मोहिमेला 'सोच सयानी' असे नाव दिले गेले असून ते नाव असलेल्या पिशव्या तयार केल्या आहेत. टी शर्ट वर ते छापले आहे.
रहिवाशांच्या मंचाचे संस्थापक सदस्य डॉ. के.के.सिंह म्हणाले की, "आमच्या पिढीने पुढच्या पिढीला "कचरापेटी" वारसा म्हणून देणे योग्य नाही. "आम्ही अनेक गोष्टींबद्दल तक्रारी करतो, पण बदलण्यासाठी काय करतो ते तेवढेच महत्त्वाचे आहे."
हाक्कर्स युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सिंग म्हणाले, "रहिवाशांना त्यांनी मनापासून पाठिंबा दिला. विशेषत: रहिवाश्यांच्या या आश्वासनांनंतर की तेच दुकानदारांकडे प्लास्टिक थैली हवी असा हट्ट करणार नाहीत."
अंतिम सुधारित : 4/17/2020