महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2014 अन्वये “सुकन्या” योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ दिनांक 01 जानेिारी, 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञेय आहेत.
तसेच केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलाांच्या मागे 894 इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करून “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी "सुकन्या” योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये पुढीलप्रमा 2 प्रकारचे लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अनुज्ञेय राहतील.
प्रकार-१ चे लाभार्थी |
एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. |
प्रकार-२ चे लाभार्थी |
एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत. |
‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या “सुकन्या' योजनेचे लाभ कायम ठेऊन खालीलप्रमाणे अधिक लाभ देण्यात येतील.
महत्वाचा टप्पा |
हेतू |
अट |
फायदे |
|||
---|---|---|---|---|---|---|
प्रकार-१ चे लाभार्थी |
प्रकार-२ चे लाभार्थी |
|||||
पहिली मुलगी | दुसरी मुलगी | |||||
जन्माच्या वेळी |
मुलींचा जन्म साजरा करण्याकरिता |
जन्मनोंदणी आवश्यक |
रु. ५,००० |
निरंक |
रु. २,५००/- |
|
१. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे रु.१.०० लाख अपघात विमा व रु.५,०००/- पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल. २. मुलीच्या नावावर शासनामार्फत एल.आय.सी. कडे रु.२१,२००/- चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु.१.०० लाख विम्याची रक्कम देण्यात येईल. ३. आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणा-या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus Rs.२१,२००/-) नाममात्र रुपये १००/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील. अ) नैसर्गिक मृत्यू-३०,०००/- आ) अपघातामुळे मृत्यू-७५,०००/- इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास -७५,०००/- ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास309, Goo/- उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेतर्गत सदर मुलीला रुपये ६००/- इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल. |
||||||
मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षांच्या शेवटी |
दर्जेदार पोषण देण्यासाठी १ अंडे १ दिवस किवा दर दिवशी दूध २०० मि.लि. दिले जात असल्याची खात्री करणे. |
मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक |
रु. २,००० प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१०,०००/-५ वर्षाकरीता |
दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.१,०००/- प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१०,०००/- ५ वर्षाकरीता |
||
प्राथमिक शाळा प्रवेश (इ.१ ली ते ५ वी) |
गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चाकरिता |
मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक |
रु. २,५००/- प्रतीवर्षीप्रमाणे एकूण १२,५००/- ५ वर्षाकरिता प्रतीवर्षीप्रमाणे |
दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.१,५००/- प्रतिवर्षीप्रमाणे एकूण रु.१५,०००/- ५ वर्षाकरीता |
||
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इ.६ वी ते १२ वी |
गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चाकरिता |
मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक |
रु.३,०००/- दरवर्षीप्रमाणे प्रतीवर्षीप्रमाणे एकूण रु.२१,०००/- |
दोन्ही मुलींना प्रत्येकी रु.२,०००/- प्रतीवर्षीप्रमाणे ७ वर्षाकरिता |
||
वयाच्या १८ वर्षी |
कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी |
वयाची १८ वर्षे पुर्ण व अविवाहीत असलेबाबतचे पालकांचे शपथपत्र |
व्या विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रु.१.०० लाख देण्यात येतील. त्यापैकी किमान रु.१०,०००/-मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक राहील. |
|||
मुलीचा जन्म झाल्यानंतर |
आजी आजीबाला प्रोत्साहनपर भेट |
पहिल्या मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक |
सोन्याचे नाणे (रु. ५,०००/- कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र) |
लागू नाही |
||
गावाचा गौरव |
मुलामुलींचे विषम असलेले लिंग गुणोत्तर १,००० पेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्साहनपर |
जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदरची रक्कम गावातील मुलीच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक राहील |
ग्रामपंचायतीस रु.५,००,०००/- इतके पारितोषिक मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. |
“सुकन्या' योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेत करण्यात आल्यामुळे 'सुकन्या' योजनेच्या सर्व अटी व शतीं'माझी कन्या भाग्यश्री' योजनेमध्ये लागू करण्यात येत आहे. तसेच ‘सुकन्या' योजनेतील मुलींना ‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
संबधित प्रपत्र / किंवा अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अंतिम सुधारित : 8/25/2020
बचत गट असल्यामुळे महिला एकत्र येतात एकमेकिंचे सुख ...
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत ग्रामीण / आद...
गावामध्ये १० गट स्थापन झाले. गट सुरळीत चालविण्यासा...
भारत सरकारच्या कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयाच्या ...