आता तरी बायांनो बोलक्या व्हा गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !!
चार गोष्टींचा विचार कराल का गं
बुद्धिमत्तेला चालना मिळेल ना गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II १ II
बाहेर पडायला भिऊ नका गं
दडपशाहीला मागे हटवा गं
दडपून बुजऱ्या राहू नका गं
अन्यायाला वाचा फोडू या गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II २ II
शिबिरात यायला तयर व्हा गं
जोडीला चार जणी घेऊन या गं
एकजुटीचे बळ सर्वांना दावू या गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ३ II
आपल्या अडचणी आपण सोडवू
बचत गट भक्कम करू
गावातील अडचणी शोधून काढू
आपल्या हिमतीनं सोडवून दावू गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ४ II
मिटींगला वेळेवर आपण जाऊ
आपल्या अडचणी गटात मांडू
गटाच्या अडचणी गटात सोडवू
एकजुटीने राहून दाखवू ग
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ५ II
रात्रीच्या शाळेला जाऊन शिका गं
कशाला शिकायचं ? म्हणू नका गं
कागदावर अंगठा लावू नका गं
शिकायची हिंमत सोडू नका गं
आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ६ ईई
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 1/30/2020
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा बचत...