অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नियम, अटी व मार्गदर्शक बाबी

नियम, अटी व मार्गदर्शक बाबी

नियम :

(खालील मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर प्रत्येक बचत गटच स्वतःसाठी योग्य अशा नियमांची आखणी करेल.)

१.बचत गटातील सभासद महिला ही गावाबाहेरील नसावी.

२.बचतगटात सर्वांनी समान बचत असावी.

अ) सर्व सभासदांनी गटाच्या बैठकीला नियमित हजर रहावे.

ब) एखादया सभासदास पूर्वसूचनेशिवाय गैरहजर राहता येणार नाही.

४. नियमित रक्कम जमा केली नाही तर त्यास दंड ठेवावा.

गटाने ठरवलेली दंडाची रक्कम रु. _______ आहे.

५.सभासदांना कर्जफेडीसाठी ठराविक कालावधी योग्य ते हप्ते ठरवावेत.

व्याजदर दरमहा _______ % असेल.

(हा व्याजदर दरमहा ३% पेक्षा जास्त नसावा.)

१.गटाच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज देऊ नये. पण गावातील दुसऱ्या बचत गटास कर्ज देण्यास हरकत नाही.

२.महिला बचत गटामध्ये पुरुषांना सहभागी होता येणार नाही व निर्णय प्रक्रियेत किंवा कर्ज घेण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीच्या वतीनेही सहभाग घेता येणार नाही.

३.जास्तीत जास्त कर्ज रक्कम रु. ______ राहील. त्यापेक्षा जास्त रकमेची कर्ज मिळणार नाही.

४.जर ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज हवे असेल तर बचत गटातील दोन सभासदांना त्यासठी जामीन रहावे लागेल.

५.प्रथम घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय दुसरे कर्ज देऊ नये.

६.गटाच्या सभासदांच्या गरजेनुसार व सभासदांच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम ठरवावी. ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. या गोष्टीच्या निरीक्षणासाठी तीन महिलांची एक समिती स्थापन करावी.

७.जेव्हा एखादया बाहेरील संस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल (उदा. बँकेकडून) तेव्हा किमान ७५% सभासदांची त्यास मान्यता असावी. हा निर्णय लिखित स्वरुपात असावा.

अटी

१.बचतगटातील कमीत कमी १० व जास्तीत जास्त २० सभासद असावेत.

२.सभासदाचे वय १८ पेक्षा जास्त असावे किंवा ती विवाहित असावी.

३.गट सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी एखादी महिला गटात येण्यास तयार असेल तर तिला गटातील सर्व सभासदांच्या संमतीने, गटातील सदस्यसंख्या पाहून, गटात सामिल करून घ्यावे. या नवीन सभासदाने पूर्वीचे इतर सभासदांइतके पैसे भरावे.

४.गट सुरु झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत गटातील सर्व तरुण महिलांना शी करता आली पाहिजे. (फक्त वयस्कर महिलांना अंगठा देण्याची परवानगी असावी.)

मार्गदर्शक बाबी

१.बचतगटाच्या पहिल्या मिटींगमध्ये (स्थापनेच्या वेळी) सर्व सभासदांची गट स्थापन करण्यास मान्यता असावी. अध्यक्षाची निवड व्हावी व गटाचे नियम, अटी, मार्गदर्शक तत्त्वे यांचे जाहीर वाचन होऊन त्यांस गटाची संमती घ्यावी.

२.मासिक बैठकीची तारीख, वेळ व जागा निश्चित करावी.

३.गटाचे अध्यक्ष तसेच इतर सभासदांची हिशोबाचे कामकाज शिकून घ्यावे.

४.बचत गटाच्या सर्व नोंदी – लेजर, पासबुक व मिटींग नोंदवही – सभा संपल्यानंतर लगेच लिहाव्या.

५.मागील मिटींगचा वृत्तांत बैठकीत वाचून दाखवावा.

६.कर्ज देताना प्राथमिकता कोणत्या कर्जाचा दयावी याचे नियम गटाने सुरुवातीलाच ठरवावे.

७.बचत गटाच्या बैठकीमध्ये इतर विषयांवरही चर्चा व्हावी. उदा. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, उदयोग, अडचणी, इ.

८.बचत गटात जमलेल्या रकमेतून रोपवाटिका, परसबाग, कुटीर उदयोग किंवा आपल्या भागात चालत असलेला उदयोग करावा. ही सर्व कार्ये गटातर्फेच व्हायला पाहिजेत असे नव्हे तर सभासदांना वैयक्तिक रित्या फायदा होईल असे कार्य असावे.

९.कर्जाचे वितरण गटाने एकमताने करावे.

१०.सभासदांना कर्ज देऊन झाल्यानंतर, जर इतर गटांनाही या उरलेल्या रकमेची गरज नसेल तर रक्कम बँकेत ठेवावी.

११.बचत गटांनी वर्षातून किमान एकवेळा आपल्या वह्या स्थानिक जाणकाराकडून तपासून घ्याव्यात.

 

लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे  - पुस्तिका

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate