Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India



MeitY LogoVikaspedia
mr
mr

Loading content...


  • Ratings (0)

अनंतकृष्ण अय्यर

उघडा

Contributor  : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था23/04/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

(६ जुलै १८६२–२६ फेब्रुवारी १९३७). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. केरळ राज्यातील पालघाट. जिल्ह्यात एका गावी जन्म. काही काळ ते केरळमध्येच विज्ञानाचे प्राध्यापक होते. पुढे त्रावणकोर-कोचीन मानवजातिवर्णनविषयक सरकारी संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. केरळमधील जातिजमातींची त्यांनी सखोल व पद्धतशीर पाहणी करून माहिती गोळा केली व ती द कोचीन ट्राइब्ज अँड कास्ट्स या ग्रंथाच्या दोन खंडांत प्रसिद्ध केली (१९०८–१९१२). १९२१ साली भारतात प्रथमच कलकत्ता विद्यापीठात मानवशास्त्र-विभाग उघडण्यात आला. त्या विभागाचे पहिले प्राध्यापक होण्याचा मान डॉ. अय्यरांना मिळाला. कलकत्ता विद्यापीठात असताना त्यांनी द मायसोर ट्राइब्ज अँड कास्ट्स हा ग्रंथ चार खंडांत प्रकाशित केला (१९२८–३६). त्याशिवाय त्यांचे अँथ्रॉपॉलॉजी ऑफ द सिरियन  ख्रिश्र्चन (१९२५) व लेक्चर्स ऑन इथ्‍नॉग्राफी (१९३०) हे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश सरकारने दिवाणबहाद्दुर हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९३४ साली त्यांना यूरोपात व्याख्याने देण्यासाठी  बोलावण्यात आले होते. भारतातील मानवशास्त्रीय अभ्यासाचे अग्रदूत म्हणून डॉ. अय्यरांचे नाव नेहमीच गौरविले जाईल. तसेच कर्नाटक व केरळमधील जातिजमातींवरील त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात.

लेखक  : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

Related Articles
सामाजिक कल्याण
लवाद

(आर्बिट्रेशन) दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक व्यक्तींमधील दिवाणी स्वरूपाचा वाद उभयपक्षांनी नेहमीच्या न्यायालयीन पद्धतीऐवजी, परंतु त्यासारख्याच पद्धतीने न्यायालयाबाहेर राहून किंवा न्यायालयाची काहीशी मदत घेऊन, सामान्य अशा त्रयस्थ व्यक्ती निवडून त्यामार्फत निवाडा (अवॉर्ड) करून घेण्याची पद्धती.

सामाजिक कल्याण
उल्लाडन

एक भारतीय आदिवासी जमात.

सामाजिक कल्याण
आडनावे

उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो.

सामाजिक कल्याण
‘तिच्या’ जिद्दीला सलाम...

स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज नाही.

अनंतकृष्ण अय्यर

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था23/04/2020


Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.



Related Articles
सामाजिक कल्याण
लवाद

(आर्बिट्रेशन) दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक व्यक्तींमधील दिवाणी स्वरूपाचा वाद उभयपक्षांनी नेहमीच्या न्यायालयीन पद्धतीऐवजी, परंतु त्यासारख्याच पद्धतीने न्यायालयाबाहेर राहून किंवा न्यायालयाची काहीशी मदत घेऊन, सामान्य अशा त्रयस्थ व्यक्ती निवडून त्यामार्फत निवाडा (अवॉर्ड) करून घेण्याची पद्धती.

सामाजिक कल्याण
उल्लाडन

एक भारतीय आदिवासी जमात.

सामाजिक कल्याण
आडनावे

उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो.

सामाजिक कल्याण
‘तिच्या’ जिद्दीला सलाम...

स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज नाही.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi