इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे डिजीटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्क व्दारे वस्तू/माल किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा ज्यात डिजीटल उत्पादनाचा समावेश आहे अशी व्याख्या करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरच्या व्याख्येनुसार इलेक्ट्रॉनिक कॉमर्ससाठी डिजीटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा किंवा मंचावर मालकी हक्क असलेली, संचालित करणारी किंवा नियंत्रित करणारी अशी कोणतीही व्यक्ती.
होय. ई-कॉमर्स ऑपरेटरांना सीमित मर्यादा सूट लाभ उपलब्ध नाही आणि त्यांनी केलेल्या पुरवठ्यांचे मूल्य काहीही असले तरीही, त्यांना नोंदणी प्राप्त करून घेणे अनिर्वाय आहे.
नाही. अशा प्रकारच्या पुरवठाकर्त्यांना सीमित मर्यादा सूट लाभ उपलब्ध नाही आणि त्यांनी केलेल्या पुरवठ्यांचे मूल्य काहीही असले तरीही, त्यांना नोंदणी प्राप्त करून घेणे अनिर्वाय आहे. तथापि ही अट फक्त तेव्हाच लागू होते, जेव्हा पुरवठा अशा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर मार्फत करण्यात आला आहे, ज्याने स्त्रोतावर आकारलेला कर (TCS) संकलित करणे आवश्यक आहे.
होय. परंतु काही विशिष्ट अधिसूचित सेवांच्या बाबतीत. जर सदर सेवांचा पुरवठा त्याच्यामार्फत केलेला आहे, अशा प्रकरणात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरला कर अदा करावा लागेल आणि अधिनियमांच्या सर्व तरतुदी सदर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरला लागू होतील, जणू काही तो अशा सेवांच्या पुरवठ्याच्या संबंधित कर अदा करण्यास जबाबदार व्यक्ती आहे.
नाही. सीमित मर्यादा सूट ई-कॉमर्स ऑपरेटर्सना उपलब्ध नाही, ज्यांना त्यांच्या मार्फत पुरविण्यात आलेल्या अधिसूचित सेवांवर कर अदा करावा लागतो.
ई-कॉमर्स ऑपरेटरला त्याच्या मार्फत करण्यात आलेल्या करयोग्य पुरवठ्यांच्या बाबतीत "करयोग्य पुरवठ्यांच्या निव्वळ किंमत/मूल्याच्या" 1% पेक्षा जास्त नसलेल्या दराने परिगणित केलेली रक्कम संकलित करणे आवश्यक आहे, जेथे सदर पुरवठा संबंधित लाभ ऑपरेटरद्वारा संकलित करण्यात येतो. अशा प्रकारे संकलित केलेल्या रकमेला "स्रोतावर आकारलेला कर (Taxcollected at source-TCS)" म्हणतात.
ई-कॉमर्स कंपनीला फक्त करयोग्य पुरवठ्यांच्या निव्वळ किंमत/मूल्यावर कर संकलित करता येतो. दुसऱ्या शब्दांत, परत करण्यात आलेल्या पुरवठ्यांची किंमत/मूल्य करयोग्य पुरवठ्यांच्या एकूण किंमत/मूल्यात समायोजित केले जाते.
"करयोग्य पुरवठ्यांची निव्वळ किंमत/मूल्य" याचा अर्थ ज्यावरील पूर्ण कर ई-कॉमर्स ऑपरेटर व्दारे देय असतो अशा सेवांच्या व्यतिरिक्त, कोणत्याही महिन्यात सर्व नोंदणीकृत व्यक्तींनी सदर ऑपरेटर मार्फत केलेल्या वस्तू/माल किंवा सेवा किंवा दोन्हीच्या करयोग्य पुरवठ्यांच्या एकूण किंमत/मूल्यातून संबंधित महिन्यात ज्या पुरवठाकर्त्यास परत करण्यात आलेल्या करयोग्य पुरवठ्यांची एकूण किंमत/मूल्य कमी केलेले असते.
होय, प्रत्येक ई-कॉमर्स ऑपरेटरला कर संकलित करणे आवश्यक आहे, जेथे पुरवठा संबंधित मोबदला ई-कॉमर्स ऑपरेटर व्दारे संकलित केला जातो.
ई-कॉमर्स ऑपरेटरने ज्या महिन्यात पुरवठा करण्यात आला, त्या महिन्यात संकलन केले पाहिजे.
ऑपरेटरने संकलित केलेली रक्कम , ज्या महिन्यात ती संकलित केली त्या महिन्याच्या समाप्तीनंतर 10 दिवसांच्या आंत योग्य त्या शासनाकडे जमा केली पाहिजे.
ऑपरेटरने योग्य शासन खाती जमा केलेले TCS, ऑपरेटरने दाखल केलेल्या विवरणाच्या आधारे, प्रत्यक्ष नोंदणीकृत पुरवठाकर्त्याच्या (ज्याच्या व्यवहारापोटी रक्कम संकलित केली तो) कॅश लेजर मध्ये परावर्तित होईल. प्रत्यक्ष पुरवठाकर्त्याने केलेल्या पुरवठ्यांच्या बाबतीत कर दायित्वपूर्तीच्या वेळी सदर क्रेडिट वापरता येईल.
होय. प्रत्येक ऑपरेटरला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक वृत्तांत सादर करणे आवश्यक आहे. त्या आर्थिक वृत्तांत त्याच्या व्दारे करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या जावक पुरवठ्यांचा तपशील असला पाहिजे,
तसेच त्याच्या मार्फत परत करण्यात आलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्यांचा तपशील, आणि संबंधित महिन्यात TCS पोटी (स्रोतावर आकारलेला कर) संकलित करण्यात आलेली रक्कम यांचाही समावेश असला पाहिजे. आर्थिक वृत्तांत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने संबंधित महिन्याच्या समाप्तीनंतर 10 दिवसांच्या आंत दाखल करणे आवश्यक आहे. ऑपरेटरने वार्षिक विवरण ज्या आर्थिक वर्षात कर संकलित केला, त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर पुढे येणाऱ्या डिसेंबरच्या 31 तारखेच्या आत दाखल केले पाहिजे.
कॅलेंडर महिन्यात प्रत्येक ऑपरेटरने केलेल्या पुरवठ्यांचे तपशील आणि संकलित केलेली रक्कम आणि त्याच्या आर्थिक वृत्तांतामध्ये सादर केलेली पुरवठ्यांची माहिती यांचा मेळ, संबंधित पुरवठाकर्त्याने त्या कॅलेंडर महिन्यात किंवा त्या नंतरच्या कॅलेंडर महिन्यात दाखल केलेल्या वैध विवरणातील जावक पुरवठ्याबाबतच्या तत्सम तपशीलाशी घालण्यात येईल. ऑपरेटरने त्याच्या आर्थिक वृत्तांतामध्ये घोषित केलेला, ज्यावर कर संकलित केलेला आहे असा जावक पुरवठ्याचा तपशील आणि पुरवठाकर्त्याने घोषित केलेला तत्सम तपशील जर एकमेकांशी जुळत नसतील, तर या विसंगती बाबत दोन्ही व्यक्तींना सूचित केले जाईल.
कोणत्याही अधिदानाशी संबंधित पुरवठ्याचे मूल्य, ज्याबाबत विसंगती सूचित केली आहे आणि पुरवठाकर्त्याने जर विसंगती सूचित करण्यात आलेल्या महिन्याच्या वैध विवरणात सदर चुकीची दुरूस्ती केली नाही तर, विसंगती सूचित करण्यात आलेल्या महिन्याच्या पुढील महिन्यात उपरोक्त पुरवठ्याचे मूल्य संबंधित पुरवठाकर्त्याच्या उत्पादन कर दायित्वामध्ये जोडले जाईल. ज्याच्या उत्पादन कर दायित्वामध्ये कोणतीही रक्कम जोडली जाते, तो संबधित पुरवठाकर्ता, कर देय असलेल्या दिनांकापासून कर अधिदानाच्या दिनांकापर्यंत आधिक्य रकमेवरील व्याजासह सदर पुरवठ्यावरील कर अदा करण्यास जबाबदार असेल.
उपायुक्ताच्या श्रेणीपेक्षा निम्नश्रेणी नसलेला अधिकारी इलेक्ट्रॉनिक ऑपरेटरला सदर नोटीस बजावणीच्या (Service) तारखेपासून 15 कार्यालयीन दिवसांच्या आत विहित तपशील सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करू शकतो
अंतिम सुधारित : 1/30/2020
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...
अग्रिम अधिनिर्णय (Advance Ruling) विषयी असलेले प्र...
कर आकारणी आणि कर सवलत अर्थात Levy of & Exemption ...
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...