GST अंतर्गत करयोग्य घटना म्हणजे लाभासाठी व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसायाच्या वृध्दीसाठी वस्तू/मालाचा आणि/किंवा सेवांचा केलेला पुरवठा आहे. अस्तित्वात असलेल्या अप्रत्यक्ष कर अधिनियमांतर्गत उत्पादन, विक्री किंवा सेवांची तरतूद अशा करयोग्य घटना "पुरवठ्यात" अंतर्भूत होतील.
"पुरवठा" या संज्ञेतील ध्वन्यर्थ व्यापक आहे आणि एखाद्या व्यक्तीने व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसाय वृध्दीसाठी लाभार्थ केलेले किंवा करण्याचे मान्य केलेले उदा. विक्री, हस्तांतरण, वस्तुविनिमय, देवाणघेवाण, परवाना, भाडे, भाडेपट्टी किंवा विनियोग इत्यादी वस्तू/माल आणि/किंवा सेवा यांच्या पुरवठ्यांच्या सर्व प्रकारांचा समावेश होतो. यामध्ये सेवांच्या आयातीचाही समावेश होतो. लाभार्थ न घेता करण्यात येणारे विशिष्ट व्यवहारही "पुरवठा" संज्ञेच्या व्याप्ती मध्ये समाविष्ट करण्याची तरतूद आहे.
करयोग्य पुरवठा म्हणजे वस्तू/मालाचा आणि/किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा पुरवठा, ज्यावर GST कायद्यांतर्गत वस्तू/माल आणि सेवा कर देय आहे.
"पुरवठा" प्रस्थापित करण्यासाठी खालील घटकांची पूर्तता होणे आवश्यक आहे :-
होय. विशिष्ट परिस्थितीत जसे लाभासाठी केलेली सेवांची आयात, जी व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी केली असेल किंवा नसेल (कलम 3(1)(बी)) किंवा CGST/SGST अधिनियम परिशिष्ट-I अंतर्गत विहित केल्यानुसार लाभ न घेता केलेला पुरवठा, जेथे प्र.4 च्या उत्तरात विहित केलेल्या मानकांपैकी एक किंवा अनेक मानकांची पूर्तता झाली नसली तरीही GST कर आकारणीसाठी सदर व्यवहारास "पुरवठा" मानले जाईल.
सीमा शुल्क अधिनियम,1962 (Customs Act,1962) अंतर्गत "वस्तू/मालाची आयात" स्वतंत्रपणे हाताळण्यात आलेली आहे, ज्यात सीमा शुल्क, प्रशुल्क अधिनियम,1975 (Customs Tariff Act, 1975) अंतर्गत मूळ सीमा शुल्काशिवाय "अतिरिक्त सीमाशुल्क" म्हणून IGST कर आकारण्यात येईल.
आंतर-राज्य स्व-पुरवठा (self-supplies) उदा. मालाच्या साठयाचे हस्तांतरण, विभागांतर्गत हस्तांतरण (branch transfer) किंवा स्वाधीन करण्यात आलेल्या मालाची विक्री (consignment sales) IGST अंतर्गत करपात्र असेल, जरी अशा व्यवहारात लाभाच्या अधिदानाचा समावेश नसला तरीही असा व्यवहार करपात्र असेल. मॉडेल GST कायदा कलम 22 अनुसार प्रत्येक पुरवठाकर्ता, जेथून तो वस्तू/माल किंवा सेवांचा किंवा दोन्हींचा करयोग्य पुरवठा करतो, त्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात GST कायद्यांतर्गत नोंदणी प्राप्त करून घेण्यास जबाबदार असेल. तथापि बहुविध व्यावसायिक कार्यक्षेत्र म्हणून नोंदणी न करण्याच्या विकल्पाच्या अधीन राहून, राज्यांतर्गत केलेले स्व-पुरवठे (self-supplies) करपात्र नाहीत.
व्यवहार "वस्तू/मालाचा पुरवठा" असल्याचे मानण्यासाठी हक्क तसेच ताबा या दोन्हीचे हस्तांतरण केले पाहिजे. जर हक्क हस्तांतरित केला नाही, तर परिशिष्ट II (1)(बी) अनुसार व्यवहार "सेवेचा पुरवठा" मानला जाईल. काही बाबतीत, ताबा तात्काळ हस्तांतरित केला जातो, परंतू हक्क पुढील दिनांकास हस्तांतरित होतो, उदा. स्वीकृतीच्या आधारे विक्री किंवा हप्त्यावरील खरेदी व्यवस्था (Hire Purchase arrangement) या व्यवहारात होते. सदर व्यवहाराला देखील "वस्तू/मालाचा पुरवठा" म्हटले जाईल.
कलम 2(17) मध्ये देण्यात आलेल्या "व्यवसाय" (Business) या शब्दाच्या व्याख्येत उद्योगधंदा (trade), व्यापार (commerce), उत्पादन (production), ज्ञान व कौशल्याधारित व्यवसाय (profession), पेशा/कामधंदा (vocation) इत्यादींचा समावेश आहे, सदर व्यवसाय आर्थिक लाभासाठी केले असतील किंवा नसतील. कोणताही उपक्रम किंवा व्यवहार जो उपरोक्त सूचीतील व्यवसायाला आनुषंगिक (incidental) किंवा पुरक (ancilliary) आहे, त्याचाही समावेश "व्यवसाय" मध्ये होतो. या शिवाय केंद्र सरकार/शासन, किंवा राज्य सरकार/शासन, किंवा स्थानिक प्राधिकरण यांनी हाती घेतलेला कोणताही उपक्रम, ज्यात ते सार्वजनिक प्राधिकरण म्हणून कार्यरत आहेत, त्याचाही "व्यवसाय" असा अर्थ लावला जाईल. उपरोक्त वरून याची नोंद घेण्यात यावी की व्यवसाय वृद्धीसाठी किंवा प्रोत्साहनासाठी व्याख्येत समाविष्ठ केलेला हाती घेतलेला कोणताही उपक्रम, GST कायद्यांतर्गत "पुरवठा" असेल.
नाही. कारण व्यक्तीने पुरवठा व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसाय वृध्दीसाठी केलेला नाही. तसेच कार व्यावसायिक वापरासाठी घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे सदर कारचा ताबा घेतेवेळी कर देयतेचा लाभ (Input Tax Credit) ग्राह्य नव्हता.
होय. परिशिष्ट-I मधील अनुक्रमांक (1) अनुसार व्यावसायिक मालमत्तेचे कायमस्वरुपी हस्तांतरण किंवा विल्हेवाट, जेथे सदर मालमत्तेवर इनपूट क्रेडिट वापरण्यात आले आहे, जरी लाभाचा समावेश नसला तरीही GST कायद्यांतर्गत सदर व्यवहार "पुरवठा" म्हणून प्रस्थापित होईल.
होय. क्लब, असोसिएशन, सोसायटी किंवा तत्सम मंडळे यांनी त्यांच्या सदस्यांसाठी केलेली सुविधांची तरतूद, "पुरवठा" मानली जाईल. CGST/SGST अधिनियम कलम 2(17) मध्ये "व्यवसाय" या व्याख्येत सदर व्यवहाराचा समावेश करण्यात आलेला आहे.
(i) करयोग्य आणि करमुक्त पुरवठे, (ii) आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पुरवठे, (iii) संयुक्त आणि मिश्र पुरवठे आणि (iv) शून्य दर पुरवठे.
IGST अधिनियम कलम 7(1), 7(2), आणि 8(1), 8(2) मध्ये अनुक्रमे आंतर-राज्य आणि राज्यांतर्गत पुरवठ्यांच्या नेमक्या व्याख्या दिलेल्या आहेत. सामान्यत: जेव्हा पुरवठाकर्त्याचे स्थान आणि पुरवठ्याचे स्थान एकाच राज्यात असते, त्या पुरवठ्यास "राज्यांतर्गत" पुरवठा असे मानले जाते आणि जेव्हा पुरवठाकर्त्याचे स्थान आणि पुरवठयाचे स्थान भिन्न राज्यात असते, तेव्हा त्या पुरवठ्यास "आंतर-राज्य पुरवठा" असे मानले जाते.
वस्तू/मालाचा वापर करण्याच्या अधिकाराचे हस्तांतरण "सेवेचा पुरवठा" असे मानले जाईल, कारण अशा प्रकारच्या पुरवठ्यांमध्ये "मालकी हक्काचे हस्तांतरण" झालेले नाही. CGST/SGST अधिनियम परिशिष्ट-II मध्ये अशा प्रकारचे व्यवहार स्पष्टपणे "सेवेचा पुरवठा" असे मानलेले आहे.
कंत्राटी कामे (Works contracts) आणि भोजन/खाद्यपदार्थ पुरविण्याची सेवा (Catering Services) यांना मॉडेल GST कायदा परिशिष्ट-II अनुक्रमांक 6(अे) आणि (बी) मध्ये विहित केल्यानुसार "सेवेचा पुरवठा" असे मानले जाईल.
माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअरचे विकास (development), आकृतिबंध (design), आज्ञावली (programming), सानुकूल पध्दती (customization), अनुकूल रूपांतर (adaptation), सुधारणा (upgradation), संवर्धन (enhancement), अंमलबजावणी (implementation) यांना मॉडेल GST कायदा परिशिष्ट-II अनुक्रमांक 5(2)(डी) मध्ये विहित केल्यानुसार "सेवेचा पुरवठा" असे मानले जाईल.
हप्त्यावरील खरेदी आधारित (Hire Purchase basis) वस्तू/मालाचा पुरवठा, हा "वस्तू किंवा मालाचा पुरवठा" मानला जाईल. जरी पुढील दिनांकास झाले तरी या व्यवहारात मालकी हक्काचे हस्तांतरण आहे.
संयुक्त पुरवठा म्हणजे करपात्र व्यक्तीने प्राप्तकर्त्याला केलेला पुरवठा, या पुरवठ्यामध्ये वस्तू किंवा सेवांचे दोन किंवा दोनापेक्षा अधिक पुरवठे असतात किंवा वस्तू/सेवा यांचा संयोग असतो, जे स्वाभाविकपणे एकत्रित बांधलेले असतात आणि सर्वसाधारण व्यवसायाच्या दरम्यान संयुक्तपणे पुरविले जातात आणि त्यामधील एक "प्रमुख पुरवठा" असतो. उदाहरणार्थ, जेथे वस्तू खोक्यात भरल्या जातात आणि परिवहनाद्वारा विम्यासह पाठविल्या जातात, वस्तूंचा पुरवठा, बांधणी साहित्य, वाहन आणि विमा हा संयुक्त पुरवठा आहे आणि वस्तूंचा पुरवठा हा प्रमुख पुरवठा आहे.
दोन किंवा दोनापेक्षा अधिक पुरवठ्यांचा समावेश असलेल्या, त्यापैकी एक प्रमुख पुरवठा असलेल्या संयुक्त पुरवठ्याला सदर प्रमुख पुरवठ्याचा "पुरवठा" असल्याचे मानले जाईल.
"मिश्र पुरवठा" म्हणजे करदात्या व्यक्तीद्वारा एकाच किंमतीत संयुक्तपणे पुरविण्यात येणारे, वस्तू किंवा सेवा किंवा त्यांच्या कोणत्याही संयोगाचे दोन किंवा दोनापेक्षा अधिक स्वतंत्र पुरवठे, जेथे सदर पुरवठा संयुक्त पुरवठा होत नाही. उदाहरणार्थ, डबाबंद अन्नपदार्थ, मिठाई, चॉकलेट्स, केक्स, सुकामेवा, शीतपेय आणि फळांचे रस यांचा समावेश असलेल्या खोक्याचा पुरवठा, जेव्हा एकाच किंमतीत सदर पुरवठा केला जातो तो "मिश्र पुरवठा" असतो. यामधील प्रत्येक वस्तू स्वतंत्रपणे पुरविता येते आणि या वस्तू एकमेकांवर अवलंबून नाहीत. जर या वस्तू स्वतंत्रपणे पुरविल्या गेल्या तर तो "मिश्र पुरवठा" होणार नाही.
दोन किंवा दोनापेक्षा अधिक पुरवठ्यांचा समावेश असलेला मिश्र पुरवठा, ज्या विशिष्ट पुरवठ्यावर अधिकतम कर दर लागू होतो त्याचा "पुरवठा" असे मानले जाईल.
होय. मॉडेल GST कायदा, परिशिष्ट-III मध्ये काही विशिष्ट व्यवहारांची यादी दिलेली आहे, उदाहरणार्थ (i) कर्मचाऱ्याद्वारा सेवेच्या दरम्यान किंवा त्याच्या सेवेबाबत नियोक्त्याला (employer) देण्यात येणाऱ्या सेवा, (ii) कोणत्याही कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या न्यायालयाने किंवा न्यायासनाने दिलेल्या सेवा, (iii) संसद सदस्य, राज्य विधानमंडळ सदस्य, स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, संविधानात्मक पदाधिकारी (कॉन्स्टिट्यूशनल functionaries) यांनी केलेली कार्ये, (iv) अंत्यसंस्कार, दफन, दहन किंवा शवागार (mortuary) इत्यादी सेवा, (v) जमिनीची विक्री आणि (vi) लॉटरी,
पैज आणि जुगार या खेरीज आर्थिक/चलनी दावे (actionable claims) यांना वस्तूंचा पुरवठा असे मानले जाणार नाही किंवा सेवांचा पुरवठा असेही मानले जाणार नाही.
शून्य दर पुरवठा म्हणजे वस्तू/माल आणि/किंवा सेवांची निर्यात किंवा SEZ (Special Economic Zone) विकासकांना किंवा SEZ यूनिटला केलेला वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा पुरवठा.
सर्वसाधारण तत्त्वानुसार, लाभ न घेता करण्यात आलेली सेवेची आयात GST अंतर्गत कलम 3 अनुसार "पुरवठा" मानला जाणार नाही. तथापि करपात्र व्यक्तीने भारता बाहेरील संबंधित व्यक्तीमार्फत किंवा त्याच्या इतर कार्यालयामार्फत, त्याच्या व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी लाभ न घेता सेवेची आयात केलेली असली तरीही परिशिष्ट-I मधील अनुक्रमांक 4 अनुसार ती आयात "पुरवठा" मानला जाईल.
स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार
अंतिम सुधारित : 8/2/2020
अग्रिम अधिनिर्णय (Advance Ruling) विषयी असलेले प्र...
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (e-commerce) म्हणजे काय तसेच...
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...