(क) कर प्रशासनाला माहिती हस्तांतरित करण्याचे साधन; (ख) कर प्रशासनाला "पूर्तता पडताळणी " करण्यासाठी; (ग) विहित कालावधीच्या मर्यादेत करदात्याच्या कर दायित्वास अंतिम स्वरूप देणे; विहित कालावधीतील कर दायित्व घोषित करणे; (घ) धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती देणे; (ङ) कर प्रशासनाचे "लेखापरिक्षण आणि कर-निवारक विरोधी (anti evasion) कार्यक्रमाचे व्यवस्थापन."
GST अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने काही पद्धतीने किंवा अन्य प्रकारे विवरण दाखल करणे आवश्यक असेल. नोंदणीकृत व्यक्तीने मासिक विवरण (सर्वसाधारण पुरवठाकर्ता) किंवा त्रैमासिक विवरण (संयुक्त कर योजनेचा पर्याय निवडलेला पुरवठाकर्ता) दाखल करणे आवश्यक असेल. ISDना देखील त्या विशिष्ट महिन्यात वितरित केलेल्या लाभाचे तपशील दर्शविणारे मासिक विवरण दाखल करणे आवश्यक असेल. कराची वजात (TDS) करावी लागणाऱ्या व्यक्ती आणि कर संकलित (TCS) करावा लागणाऱ्या व्यक्ती यांना, विहित केल्यानुसार कर वजात/संकलन आणि अन्य तपशील दर्शविणारे, मासिक विवरण दाखल करणे आवश्यक असेल.अनिवासी करपात्र व्यक्तीला देखील ज्या कालावधीत उपक्रम राबविलेला असेल त्या कालावधीसाठी विवरण दाखल करणे आवश्यक असेल.
एका सर्वसाधारण नोंदणीकृत करदात्याला एका महिन्यात करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या पुरवठ्यांशी संबंधित जावक पुरवठ्यांचे तपशील GSTR-1 मध्ये सादर करणे आवश्यक आहे, उदा. नोंदणीकृत व्यक्तींना करण्यात आलेला जावक पुरवठा, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींना (ग्राहक) करण्यात आलेला जावक पुरवठा, क्रेडिट/डेबिट नोट तपशील, शु-यदर (zero rated), सूट दिलेले आणि GST अंतर्गत न येणारे पुरवठे, निर्याती आणि भविष्यात होणाऱ्या पुरवठ्याशी संबंधीत प्राप्त झालेले अग्रिम.
बीजकांची स्कॅन्ड कॉपी अपलोड करावी लागणार नाही. बीजकातील केवळ विशिष्ट माहिती अपलोड करावी लागेल.
नाही. पुरवठे B2B किंवा B2C प्रकारचे आहेत, तसेच ते राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य आहेत, यावर बीजकांचे अपलोड अवलंबून आहे. B2B पुरवठ्याकरीता, राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य पुरवठे असले तरीही सर्व बीजके अपलोड करावी लागतील. कारण काय? कारण प्राप्तकर्ता इनपूट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेईल, तरी बीजकांची जुळवणी करणे आवश्यक आहे. B2C पुरवठ्याकरीता, खरीददार आयटीसीचा लाभ घेणार नाही, त्यामुळे सामान्यतः बीजके अपलोड करणे आवश्यक नाही. तथापि इष्टस्थळ आधारीत मूलतत्वे अंमलात आणण्यासाठी, आंतरराज्य B2B पुरवठ्याकरीता `. 2.50 लाखापेक्षा जास्त मूल्य असलेली बीजके अपलोड करावी लागतील. राज्यांतर्गत पुरवठ्यांकरीता `. 2.50 लाखापेक्षा कमी मूल्य असलेली सर्व बीजके आणि सर्व आंतरराज्य बीजके, राज्यनिहाय माहितीचा सारांश पुरेसा असेल.
नाही. वस्तुत: तपशीलवार वर्णन अपलोड करणे आवश्यक नाही. वस्तू/मालाच्या पुरवठ्याबाबत फक्त HSN सांकेतांक आणि सेवांच्या पुरवठ्याबाबत लेखांकन सांकेतांक (Accounting code) दाखल करणे आवश्यक असेल. विवरण दाखलकर्त्यास अपलोड करतांना भराव्या लागणारे कमीत कमी संख्यात्मक अंक, त्याच्या मागील वर्षाच्या उलाढालीवर अवलंबून असतील.
होय. फक्त मूल्य नाही तर, करयोग्य मूल्य देखील अपलोड करावे लागेल. काही बाबतीत दोन्ही वेगळे असू शकतात. काही बाबतीत मोबदला प्राप्त होणार नसला तरी, परिशिष्ट-I अनुसार तो पुरवठा आहे, त्यामुळे विहित केल्यानुसार करयोग्य मूल्य परिगणित करणे आणि अपलोड करणे आवश्यक आहे.
होय. प्राप्तकर्त्याला त्याच्या पुरवठाकर्त्याने अपलोड न केलेल्या बीजकांची माहिती अंतर्भूत करता येते. जुळवणीच्या अधीन राहून अशा प्रकारच्या बीजकांवरील लाभ (ITC) तात्पुरत्या स्वरूपात देता येतील. जुळवणी झाल्यानंतर, पुरवठ्याकर्त्याने बीजके अपलोड केली नाहीत, तर दोघानाही याबाबत सूचित करण्यात येईल. विसंगति / चुकीची दुरूस्ती केल्यास, तात्पुरता लाभ (ITC) कायमस्वरूपी निश्चित केला जाईल. जर विसंगती दुरुस्त केली नाही तर, ज्या महिन्यात सदर विसंगती कळविण्यात आली, त्या महिन्यानंतरच्या महिन्यातील प्राप्तकर्त्याच्या विवरणामध्ये उत्पादन कर दायित्वात (output liability) सदर रक्कम जोडली जाईल.
GSTR-2 मध्ये माहितीचा मोठा हिस्सा स्वयंचलनाने स्थलांतरित होईल, तरी काही तपशील केवळ प्राप्तकर्ता भरू शकतो उदा. आयातीचे तपशील, नोंदणीकृत नसलेले पुरवठाकर्ते किंवा संमिश्र पुरवठाकर्ते (composition suppliers) यांच्याकडून केलेल्या खरेदीचा तपशील आणि सूट देण्यात आलेले/GST अंतर्गत न येणारे/शुन्य GST लागू झालेले पुरवठे इत्यादी.
जर GSTR-2 मधील बीजके प्रति-पक्ष GSTR-1 मधील बीजकांशी जुळली नाहीत, तर सदर विसंगति पुरवठाकर्त्यास कळविली पाहिजे. दोघानाही याबाबत सूचित केल्यानंतरही विसंगति तशीच राहिली आणि दुरूस्त केली गेली नाही, तर इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ परत फिरविला जाईल. दोन कारणांमुळे विसंगति निर्माण होते. पहिले कारण म्हणजे प्राप्तकर्त्याकडून चूक होणे आणि अशा बाबतीत पुढील कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही. दुसरे कारण म्हणजे असे होणे शक्य आहे की पुरवठाकर्त्याने बीजक निर्गमित केले, परंतू ते अपलोड केले नाही आणि त्यावरील कर अदा केला नाही. अशा बाबतीत प्राप्तकर्त्याने वापरलेले इनपूट टॅक्स क्रेडिट त्याच्या उत्पादन कर दायित्वात जोडले जाईल, थोडक्यात, जर पुरवठाकर्त्याने पुरवठा केला परंतु त्यावरील कर अदा केला नाही तर सर्व विसगंतींची परिणती कारवाईत होईल.
कधीही, परंतू आगामी आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या अगोदर, अशा प्रकारच्या अंतर्भाव न झालेल्या बीजकावर शुल्क आणि व्याज भरून, ज्या महिन्यात बीजक अपलोड केले नाही, त्या महिन्याच्या GSTR-3 मध्ये पुरवठाकर्त्याला बीजक अपलोड करता येईल. ज्या संबंधित पुरवठाकर्त्याने विसंगति दुरूस्त केली आहे त्या रकमेच्या प्रमाणात प्राप्तकर्ता त्याचे उत्पादन कर दायित्व कमी करण्यास पात्र ठरेल. परत फिरविलेल्या ITCवर अदा केलेले व्याज प्राप्तकर्त्याला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधील तदनुरूप लेखाशिर्षात रक्कम जमा करून परत केले जाईल.
GSTR-2 चे वैशिष्ट असे आहे की प्रति-पक्ष पुरवठाकर्त्याने त्याच्या GSTR-1 मध्ये सादर केलेल्या तपशीलांच्या आधारे, प्राप्तकर्त्याला प्राप्त झालेल्या पुरवठ्याचे तपशील आपोआप (auto populated) GSTR-2 मध्ये स्थलांतरित होतात.
नाही. संयुक्त कर योजनेतील करदात्यांना जावक किंवा आवक पुरवठ्याचा कोणताही तक्त्ता दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यांना GSTR-4 तक्त्यात त्रैमासिक विवरण तीन महिन्यानंतर येणा-या पहिल्या महिन्याच्या 18 तारखेच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. कोणत्याहीइनपूट टॅक्स क्रेडिटसाठी ते पात्र नाहीत म्हणून GSTR-2 त्यांना लागू होणार नाही आणि संयुक्त कर योजनेंतर्गत अदा केलेल्या करावरील लाभ देता येत नसल्याने GSTR-1 त्यांना लागू होणार नाही. त्यांच्या विवरणात जावक पुरवठ्याच्या संक्षिप्त तपशीलासह अदा केलेल्या कराच्या रकमेचा तपशील त्यांनी घोषित करणे आवश्यक आहे. त्यांच्या त्रैमासिक विवरणातच त्यांनी केलेल्या खरेदीचा तपशील देणेही आवश्यक असून, यातील अधिकांश माहिती स्वयंचलनाने (auto populated) भरली जाईल.
नाही. ISDना केवळ GSTR-6 मध्ये विवरण दाखल करणे आवश्यक आहे आणि या विवरणात ISDना सेवा पुरवठादारांकडून प्राप्त झालेल्या लाभाचा (ITC) आणि ISDनी प्राप्तकर्त्याच्या यूनिट्सना (Recipient Units) वितरित केलेल्या लाभाचा तपशील असतो. त्यांच्या विवरणातच या सर्व बाबींचा समावेश होत असल्याने, आवक आणि जावक पुरवठ्याची अलग आर्थिक माहिती दाखल करण्याची आवश्यकता नाही.
GST अंतर्गत वजातकर्ता त्याच्या GSTR-7 तक्त्त्यातील विवरणात ज्यांच्या स्रोतातून वजावटी केल्या आहेत त्या व्यक्तिनिहाय वजावटींचा तपशील, ज्या महिन्यात या वजावटी केल्या आहेत त्या महिन्याच्या पुढील महिन्यातील 10 तारखेच्या आत सादर करील. वजातीकर्त्याने अपलोड केलेले वजावटींचे तपशील ज्यांच्या स्रोतातून वजावटी केल्या आहेत त्या व्यक्तींच्या GSTR-2 मध्ये स्वयंचलनाने (auto populated) स्थलांतरित होतील. करदात्यास त्याच्या वतीने करण्यात आलेल्या वजावटींचा लाभ घेण्यासाठी त्याच्या GSTR-2 मधील वजावटींचे तपशील सुनिश्चित करावे लागतील. करदात्यास या क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्यासाठी कोणतेही स्थूल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र केवळ करदात्याच्या माहितीकरीता असेल आणि सामाईक पोर्टलवरून डाउनलोड करता येईल.
ISD, नैमित्तिक/अनिवासी करदाते, आणि संयुक्त कर योजनेंतर्गत (composition scheme) असलेले करदाते, TDS/TCS वजातकर्ते यांच्या खेरीज, GSTR-1 ते 3 मध्ये विवरण सादर करणा-या सर्व करदात्यानी वार्षिक विवरण दाखल करणे आवश्यक आहे. नैमित्तिक करदाते, अनिवासी करदाते, ISD, आणि स्रोतातून कर वजावटी/संकलित करण्यासाठी प्राधिकृत व्यक्ती यांनी वार्षिक विवरण दाखल करण्याची आवश्यकता नाही.
नाही. जी व्यक्ती सामान्य करदाता म्हणून कर अदा करते, त्या प्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने वार्षिक विवरण दाखल करणे आवश्यक आहे. नोंदणी रद्द करण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, अशा नोंदणीकृत करपात्र व्यक्तींनी अंतिम विवरण दाखल करणे आवश्यक आहे. सदर अंतिम विवरण, नोंदणी रद्द करण्यात आलेल्या दिनांकापासून किंवा रद्द करण्याबाबतच्या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक आहे.
GST मध्ये विवरणे प्रत्येक व्यवहारांच्या तपशीलांनी तयार केलेली असतात म्हणून विवरण पुनरिक्षित (revise) करण्याची आवश्यकता नसते. बीजक किंवा डेबिट/क्रेडिट नोटस् यांच्या संचात बदल करण्याची गरज असेल तर विवरण पुनरिक्षित करण्याची आवश्यकता निर्माण होते. सादर करण्यात आलेले विवरण पुनरिक्षित करण्याऐवजी, या प्रणालीत ज्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, त्या व्यवहारांच्या तपशीलात (बीजक किंवा डेबिट/क्रेडिट नोटस्) बदल करता येतो. सदर व्यवहार कोणत्याही भविष्यकालीन GSTR-1/2 मधील पूर्व-घोषित तपशीलात सुधारणा करण्याच्या उद्देशासाठी विशेषत्वाने उपलब्ध करण्यात आलेल्या तक्त्यात पुनरिक्षित करता येतात.
करदात्यांना विवरण व तक्ते दाखल करण्यासाठी विविध साधने उपलब्ध असतील. प्रथमत: करदात्यांना त्यांचे तक्ते आणि विवरणे ऑनलाईन सामाईक पोर्टलवर थेट दाखल करणे शक्य होईल. मात्र संख्येने जास्त बीजके असलेल्या करदात्यांना ही पध्दत कंटाळवाणी आणि कालापव्यय करणारी होऊ शकते. अशा करदात्यांसाठी, ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यायोगे स्वयंचलनाने भरण्यात आलेले तपशील डाउनलोड करून ऑफलाईन तक्ते तयार करता येतील आणि सामाईक पोर्टलवर अपलोड करता येतील. GST नेटवर्कने "जीएसटी सुविधा प्रोव्हायर्ड्स (जीएसपी)" अशी एक इकोसिस् टम विकसित केली आहे, ती सामाईक पोर्टलमध्ये एकत्रित केली जाईल.
GST अंतर्गत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आगामी महिन्याच्या 10 तारखेच्या आत जावक पुरवठयाचा तपशील GSTR-1 तक्त्यात अपलोड केला पाहिजे. हे चांगल्या रितीने करता येणे करदात्याने निर्गमित केलेल्या B2B बीजकांच्या संख्येवर अवलंबून असेल. जर संख्या कमी असेल तर करदाता एकाच वेळी सर्व माहिती अपलोड करू शकेल. जर बीजकांची संख्या जास्त असेल, तर बीजके (किंवा डेबिट/क्रेडिट नोट्स) नियमितपणे अपलोड केली पाहिजेत. GSTN "वास्तविक वेळ आधारावर (रिअल टाईम बेसिस)" बीजके नियमितपणे अपलोड करण्याची अनुमती देईल. आर्थिक तक्त्ते प्रत्यक्षपणे सादर होईपर्यंत, सदर प्रणाली करदात्यास अपलोड केलेली बीजके यांच्यात बदल करण्याचीही अनुमती देईल. या कारणास्तव, नियमितपणे बीजके अपलोड करणे करदात्यास नेहमी फायद्याचे असेल. शेवटच्या क्षणी घाई केल्यास अपलोड करणे अवघड होईल आणि संभाव्य अपयश आणि कसूर याबाबतची जोखीम जास्त असेल. दुसरी गोष्ट म्हणजे करदात्यांना त्यांच्या पुरवठाकर्त्यांनी केलेल्या आवक पुरवठ्यांची चलन/बीजके अपलोड केल्याची खात्री करता येईल. कोणत्याही त्रासाविना आणि विनाविलंब इनपूट टॅक्स क्रेडिट उपलब्ध असल्याची निश्चिती करण्यासाठी हे उपयुक्त होईल. देय दिनांकाच्या दिवशी किंवा देय दिनांकाच्या निकटतम दिवशी बीजके अपलोड करण्याऐवजी, प्राप्तकर्ते त्यांच्या पुरवठाकर्त्याना त्यांची बीजके नियमितपणे अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. सदर प्रणालीमुळे प्राप्तकर्त्याना त्यांच्याशी संबंधित बीजके त्यांच्या पुरवठाकर्त्यानी अपलोड केली आहेत किंवा नाही हे पाहता येईल. GSTN प्रणाली करदात्याच्या अनुपालन स्तराबाबत पूर्वीच्या कामगिरीची माहिती उपलब्ध करून देईल; विशेषत: योग्य वेळी अपलोड करण्यात आलेल्या त्याच्या पुरवठा बीजके याव्दारे पुरवठाकर्त्याने निर्गमित केलेल्या बीजकांच्या बाबतीत स्वयंचलनाने परत फिरविण्यात आलेल्या बीजकांचा तपशीलाबाबत पूर्वीच्या कामगिरीची माहिती उपलब्ध करून देईल. GSTच्या सामाईक पोर्टल मध्ये एका ठिकाणी अखिल भारत माहिती (data) असेल, त्यायोगे करदात्यांना उपयुक्त सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल. बीजके नियमितपणे अपलोड करणे सहजसुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि या उद्दिष्टपूर्तीच्या अनुरोधाने समर्थ असलेली इको-सिस्टम विकसित होत जाईल अशी अपेक्षा आहे. GST अंतर्गत सहजसोप्या आणि त्रासमुक्त अनुपालनासाठी करदात्यांनी या इको-सिस्टमचा कार्यक्षमतेने वापर करावा.
नाही. नोंदणीकृत करदात्या व्यक्तीला, केंद्र किंवा राज्य कर व्यवस्थापनाव्दारे अधिकृत केलेल्या "कर विवरण कर्ता" (Tax Return Preparer) व्दारे त्याचे विवरण दाखल करता येते.
नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने विहित तारखेनंतर विवरण दाखल केल्यास, विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी `.100/-, कमाल `.5000/- विलंब शुल्क अदा करावे लागेल. देय तारखेपर्यंत वार्षिक विवरण सादर करण्यात अपयशी ठरल्यास, विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी `.100/-, वार्षिक विवरण सादर करण्याबाबतची निष्क्रियता चालू राहिल्यास, राज्यातील त्याच्या उलाढालीच्या 0.25%ने परिगणित केलेली कमाल रक्कम , आकारण्यात येईल.
एकाच दस्तऐवजाच्या आधारे एकापेक्षा जास्त वेळा (दुप्पट लाभ - duplication of claim) इनपूट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे प्रणालीव्दारे उघडकीस आले तर प्राप्तकर्त्याच्या विवरणातील उत्पादन कर दायित्वात सदर लाभाची रक्कम जोडली जाईल. (कलम 42(6))
होय, पुरवठाकर्त्याने यथास्थिती ज्या महिन्यात/त्रैमासिक विवरणात चूक उघडकीस आली त्या महिन्याच्या त्याच्या वैध विवरणात बीजके किंवा डेबिट नोट्सचे तपशील घोषित करून एकदा विसंगति दुरूस्त केल्यावर. नंतरच्या कर कालावधीत उत्पादन कर दायित्व कमी करून सदर रक्कम पुन:प्राप्त करता येईल. (कलम 42(7)). पुरवठाकर्त्याने निर्गमित केलेल्या क्रेडिट नोट्सच्या बाबतीत अधिनियमाच्या कलम 43 मध्ये देखील समान तरतूद करण्यात आलेली आहे.
अंतिम सुधारित : 8/21/2020
इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि या विषयी असले...
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (e-commerce) म्हणजे काय तसेच...
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...