GST करप्रणालीत कोणत्याही राज्यांतर्गत पुरवठ्यासाठी केंद्रीय GST (CGST, केंद्र शासनाच्या खाती जमा होतो) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश GST (SGST/UTGST संबंधित राज्य शासनांच्या खाती जमा होतो) असे दो-ही कर भरावे लागतात. आंतर-राज्य पुरवठ्यासाठी एकात्मिक GST (IGST) भरावा लागतो, यामध्ये CGST आणि SGST या करांचे घटक समाविष्ट असतात. या खेरीज, विशिष्ट प्रवर्गातील नोंदणीकृत व्यक्तींना स्रोतातून कराची वजावट (Tax deducted at source-TDS) आणि स्रोतावर आकारलेला कर (Tax collected at source-TCS) या रकमांचा भरणा शासन खाती जमा करावा लागतो. तसेच जेथे लागू असेल तेथे, व्याज, दंड, शुल्क आणि अन्य कोणतेही प्रदान यांचा भरणा करावा लागतो.
सर्वसाधारणपणे, GST भरण्याची जबाबदारी वस्तू/माल किंवा सेवांच्या पुरवठ्याकर्त्याची असते. तथापि, कांही विशिष्ट बाबींमध्ये जसे आयात आणि इतर अधिसूचित केलेल्या पुरवठ्यांबाबत, रिव्हर्स चार्ज यंत्रणेंतर्गत प्राप्तकर्त्यावर जबाबदारी सोपविली जाते. तसेच काही आंतर-राज्य सेवांच्या पुरवठ्याच्या अधिसूचित केलेल्या प्रकरणांत, GST अदा करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स ऑपरेटर्सवर सोपविली जाते, ज्यांच्याव्दारे अशा सेवा पुरविल्या जातात. तसेच जे शासकीय विभाग किरकोळ विक्रेत्याना विहित मर्यादेपेक्षा जास्त (कलम 51 (1)(डी) अनुसार एका करारांतर्गत 2.5 लाख) अधिदाने अदा करतात, त्यांनी कराची वजात (TDS) करणे आवश्यक आहे आणि ई-कॉमर्स ऑपरेटर्सनी त्यांच्या व्दारे करण्यात आलेल्या पुरवठ्यांच्या निव्वळ किंमतीवर (म्हणजे वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा करयोग्य पुरवठ्यांची एकूण मूल्य/किंमत, परंतु अशा सेवांचे मूल्य/किंमत वगळून, ज्यावर CGST अधिनियम, 2017 कलम 9(5) अंतर्गत GST अदा करण्यास ऑपरेटर जबाबदार असतो) कर संकलित (TCS) करणे आवश्यक असते आणि शासन खाती जमा करणे आवश्यक असते.
कलम 12 मध्ये स्पष्ट केल्यानुसार वस्तू/मालाच्या पुरवठ्याच्या वेळी आणि कलम 13 मध्ये स्पष्ट केल्यानुसार सेवांच्या पुरवठ्याच्या वेळी गस्त अदा करण्याची जबाबदारी उद्भवते. सर्वसाधारणपणे कर अदायगीची वेळ पुढील तीनपैकी जी घटना सर्वात अगोदर घडेल ती असेल, ती म्हणजे, अधिदान प्राप्त झाल्यानंतर, बीजक निर्गमित केल्यानंतर, किंवा पुरवठा पूर्ण केल्यानंतर. उपरोक्त कलमांमध्ये वेगवेगळया परिस्थितींचा आढावा घेऊन, कर देयतेच्या विभिन्न कर बिंदूंचे (tax points) स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
GST करप्रणाली अंतर्गत अधिदान प्रकियेची प्रमुख वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत : अधिदानाच्या सर्व पध्दतीत GSTN सामाईक पोर्टल व्दारे इलेक्ट्रॉनिक प्रणालीने निर्गमित चलनांचा वापर करण्यात येईल आणि हस्तलिखित चलनांचा वापर केला जाणार नाही;
- करदात्यांना सुलभतेने कधीही कोठेही कर अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल;खालील पध्दतीने अधिदान करता येईल :- (i) सामाईक पोर्टलवर राखण्यात आलेल्या करदात्याच्या जमा खात्यातून वर्ग करून फक्त कर अदा करता येईल. व्याज, दंडाची रक्कम आणि शुल्क करदात्याच्या जमा खात्यातून वर्ग करून अदा करता येणार नाही. करदात्यास कच्च्या मालावर अदा करण्यात आलेल्या कराचा लाभ घेता येईल (Input Tax Credit-ITC) आणि उत्पादित मालावरील करापोटी वापरता येईल. तथापि CGST प्रदानावर मिळालेला ITC, SGST अदा करण्यासाठी वापरता येणार नाही आणि तसेच उलटपक्षी. IGST प्रदानावर मिळालेले इनपूट टॅक्स क्रेडिट अनुक्रमे IGST, CGST आणि SGST अदा करताना वापरण्याची अनुमती असेल. (ii) सामाईक पोर्टलवर राखण्यात आलेल्या करदात्याच्या कॅश खातेवहीतून डेबिट व्दारे नगद कर भरता येईल. विविध पध्दतीने कॅश खातेवहीत नगद जमा करता येईल, त्या म्हणजे ई-पेमेंट (अधिदान) (इंटरनेट बँकींग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड); रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)/न्ॉशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT); GST जमा करून घेण्यास अधिकृत केलेल्या बँकांच्या शाखामध्ये कर भरणा करता येईल.
सर्वसाधारण करदात्याने दरमहा पुढील महिन्याच्या 20 तारखेपर्यंत कर अधिदान केले पाहिजे. नगद अधिदान प्रथम कॅश खातेवहीत जमा केले जाईल आणि मासिक विवरणाच्याव्दारे अधिदान करीत असतांना, करदात्याने नगद खातेवहीत सदर रक्कम डेबिट खाती वर्ग करावी आणि संबंधित डेबिट नोंद क्रमांक (Debit entry number) त्याच्या विवरणात दर्शविला पाहिजे. अगोदर नमूद केल्याप्रमाणे, क्रेडिट खातेवहीतून वजातीने अधिदान करता येईल. मार्च महिन्याचे कर अधिदान 20 एप्रिलपर्यंत अदा केले पाहिजे. संयुक्त करदात्यांना त्रैमासिक पध्दतीने कर भरावा लागेल.
नाही. स्वयं-निर्धारित कर दायित्वाच्या बाबतीत याला अनुमती नाही. इतर बाबतीत, सक्षम अधिकाऱ्यास कालावधी वाढविण्याचे किंवा अधिदान मासिक हप्त्याने करण्यास अनुमती देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. (CGST/SGST अधिनियम कलम 80)
अशा बाबतीत विवरण वैध मानले जाणार नाही. कलम 2(117) मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की "वैध विवरण" याचा अर्थ कलम ३९ उपकलम (1) अंतर्गत सादर केलेले विवरण, ज्याव्दारे स्वयं-निर्धारित कर पूर्णपणे अदा केला आहे. ते केवळ वैध विवरण आहे, जे प्राप्तकर्त्याला इनपूट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेण्याची अनुमती देण्यासाठी आधारभूत असेल. दुस-या शब्दांत, जोपर्यंत पुरवठाकर्ता संपूर्ण स्वयं-निर्धारित कर अदा करत नाही आणि विवरण दाखल करत नाही आणि प्राप्तकर्ता त्याचे विवरण दाखल करत नाही, तोपर्यंत प्राप्तकर्त्याचा इनपूट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ निश्चित केला जाणार नाही.
शासन खाती रक्कम जमा झालेल्या तारखेला "देय कर जमा केल्याची तारीख" मानली जाईल.
इलेक्ट्रॉनिक लेजर किंवा ई-लेजर म्हणजे प्रत्येक नोंदणीकृत करदात्याचा नगद आणि इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) बाबतचा आर्थिक वृतांत असतो. या खेरीज प्रत्येक करदात्याकडे इलेक्ट्रॉनिक कर दायित्व नोंदवही (Electronic tax Liability Register) असेल. एकदा सामाईक पोर्टलवर (GSTN) करदात्याची नोंदणी झाली की दोन ई-लेजर्स (नगद आणि इनपूट टॅक्स क्रेडिट) आणि एक इलेक्ट्रॉनिक कर दायित्व नोंदवही स्वयंचलनाने तयार केली जातील आणि करदात्याच्या संगणकावरती (dashboard) नेहमी प्रदर्शित होत राहतील.
कर दायित्व नोंदवही करदात्याचे विशिष्ट महिन्याचे एकूण कर दायित्व (निव्वळ ) दर्शविणार.
नगद खातेवही (कॅश लेजर) करदात्याच्या खाती असलेल्या नगद सर्व जमा रक्कमा आणि TDS/TCS दर्शविणार. माहिती Real Time बेसिस आधारे प्रतिबिंबित झालेली असेल. GST च्या कोणत्याही अधिदानासाठी या खातेवही वापर करता येईल.
मासिक विवरणात स्वयं-निर्धारित केल्यानुसार इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) आयटीसी लेजर मध्ये प्रतिबिंबित होईल. या लेजरमधील जमा रकमेचा केवळ कर अदा करण्यासाठी वापर करता येईल आणि इतर रक्कमा जसे व्याज, दंड, शुल्क इत्यादींसाठी वापर करता येणार नाही.
GSTN आणि बँकेचे कोअर बँकींग सोल्युशन (CBS) यांच्यात रिअल टाईम टू-वे संबध्द असेल."CPIN" स्वयंचलनाने इलेक्ट्रॉनिक दुव्याव्दारे तपासणीसाठी आणि अधिदान प्राप्तीसाठी बँकेकडे मार्गस्थ केले जाते आणि अधिदान प्राप्तीच्या पुराव्यादाखल Challan Identification Number (CIN) स्वयंचलनाने बँकेकडून सामाईक पोर्टलवर पाठविला जातो. या प्रक्रियेत बँकेतील रोखपाल किंवा टेलर (teller) किंवा करदाता यांच्यासह कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.
होय. करदात्यास चलन फॉर्म अंशत: भरता येईल आणि नंतरच्या टप्प्यावर पूर्ण करण्यासाठी चलन तात्पुरते "save" करता येईल. अशा प्रकारे "सुरक्षित" (save) केलेल्या चलनास अंतिम स्वरूप देण्यापूर्वी "edit" करता येईल. करदात्याने चलनास अंतिम स्वरूप दिल्यानंतर, कर अदा करण्यासाठी करदाता चलन निर्माण करील. करदात्याला त्याच्या रेकॉर्डसाठी चलनाचे प्रिंट आऊट घेता येईल.
नाही. चलन निर्मितीसाठी GSTN मध्ये "लॉगिंग" (logging) केल्यानंतर, करदाता किंवा त्याच्या प्राधिकृत व्यक्तीने अधिदानाचे तपशील चलनात भरले पाहिजेत. भविष्यकाळात चलन अद्ययावत करण्यासाठी करदाता चलन अर्ध्यावर "सुरक्षित" (save) करू शकतो. तथापि एकदा चलनास अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि CPIN निर्माण झाल्यावर, करदात्याला चलनात पुढे कोणतेही बदल करता येणार नाहीत.
होय. निर्मितीनंतर चलन पंधरा दिवसांसाठी वैध असेल आणि त्यानंतर चलन सिस्टम मधून काढले जाईल. तथापि, करदाता त्याच्या सोयीनुसार दुसऱ्या चलनाची निर्मिती करू शकतो.
CPIN म्हणजे सामाईक पोर्टल ओळख क्रमांक (Common Portal Identification Number) जो चलन निर्मितीच्या वेळी निर्माण होतो. CPIN हा चलनाची ओळख पटविणारा चौदा अंकीय विशिष्ट क्रमांक आहे. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे, CPIN 15 दिवसांसाठी वैध असतो.
CIN म्हणजे चलन ओळखक्रमांक (Challan Identification Number). CIN हा 17 अंकीय क्रमांक असतो, म्हणजे 14 अंकीय कपीं अधिक 3 अंकीय बँक कोड. जेव्हा अधिदान (Payment) अधिकृत बँका किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना प्राप्त होते आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या संबंधित शासन खाती जमा होते, तेव्हा अधिकृत बँका / रिझर्व बँक ऑफ इंडिया व्दारे CIN ची निर्मिती करण्यात येते. हा क्रमांक अधिदान (Payment) प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे आणि योग्य शासनाच्या खाती जमा झाल्याचे निर्देशित करतो. अधिकृत बँकेच्या व्दारे करदात्याला तसेच GSTN ला सीआयएन (CIN) कळविला जातो.
जेव्हा चालू विवरण कालावधीनंतर करदात्याचे कर दायित्व शेष असेल तर अधिदानाचा क्रम कलम 49 (8) मध्ये विहित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अधिदान अदा करण्याचा क्रम आहे : प्रथम मागील कालावधीचे स्वयं-निर्धारित कर आणि इतर देय रक्कमा; त्यानंतर चालू कालावधीचे स्वयं- निर्धारित कर आणि इतर देय रक्कमा; आणि त्यानंतर कलम 73 किंवा कलम 74 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मागण्यांसह (Confirmed demands) कोणत्याही इतर देय रक्कमा. या घटनाक्रमाचे पालन करणे बंधनकारक आहे.
"इतर देय रक्कमा" (Other dues) या शब्दांचा अर्थ व्याज, दंडाची रक्कम , शुल्क किंवा अधिनियमांतर्गत किंवा त्या खाली अस्तित्वात आलेल्या नियमांतर्गत देय असणारी कोणतीही रक्कम असा आहे.
E-FPB म्हणजे इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँच (Electronic Focal Point Branch). या अधिकृत बँकांच्या शाखा आहेत, ज्यांना GST चे अधिदान जमा करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. प्रत्येक अधिकृत बँक केवळ एका शाखेला त्यांची E-FPB म्हणजे इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँच म्हणून अखिल भारतीय पातळीवर व्यवहारासाठी नामनिर्देशित करेल. इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँचने मुख्य लेखाशीर्षांतर्गत सर्व शासनांसाठी खाती उघडणे आवश्यक आहे. एकूण 38 खाती (CGST व IGST साठी प्रत्येकी एक आणि प्रत्येक राज्य शासनासाठी / केंद्रशासित प्रदेश शासनासाठी प्रत्येकी एक SGST) उघडणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँचकडे GST पोटी प्राप्त होणारी कोणतीही रक्कम इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँचच्या अखत्यारीतील योग्य खाती जमा करण्यात येईल. NEFT / RTGS व्यवहारांकरीता, रिझर्व बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँच म्हणून कार्य करेल.
TDS म्हणजे स्रोतातून कराची वजावट (Tax deducted at source). कलम 51 अनुसार, शासन आणि शासकीय अंगिकृत व्यवसाय आणि इतर नोंदणीकृत स्वंतत्र व्यापार/व्यवसाय, जे करारानुसार पुरवठाकर्त्यास रक्कम अदा करतात, जेथे करारांतर्गत अशा पुरवठ्याची एकूण किंमत/मूल्य रु. 2.५ लाखापेक्षा जास्त असते, त्यांच्यासाठी केलेली ही तरतूद आहे. अशा प्रकारचे अधिदान (Payment) करतांना, संबंधित शासन / प्राधिकरण एकूण देय रक्कमेच्या 1% रक्कम वजा करेल आणि योग्य GST खात्यात सदर रक्कम जमा करेल. पुरवठाकर्ता विवरणपत्र दाखल करताना सदर TDS च्या हिशोबाचे विवरण कसे दर्शविणार? TDS म्हणून दर्शविण्यात आलेली कोणतीही रक्कम संबंधित पुरवठाकर्त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये परावर्तित होईल. पुरवठाकर्ता सदर रक्कम , कर, व्याज, शुल्क आणि इतर कोणतीही रक्कम यांचे दायित्व पूर्ण करण्यासाठी वापरू शकेल. TDS वजातीकर्ता सदर TDS हिशोबाचे विवरण कसे दर्शविणार? TDS वजातीकर्ता (deductor) सदर TDS हिशेाबाचे विवरण खालील पध्दतीने दर्शवणार :- 1) CGST/SGST अधिनियम कलम 24 अंतर्गत वजातीकर्त्याला नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. 2) वजातीकर्त्याने संकलित केलेला TDS, त्याची वजावट ज्या महिन्यात करण्यात आली, त्याच्या पुढील महिन्यात 10 तारखेच्या आत भरला पाहिजे आणि जीएसटीआर-7 मध्ये या बद्दल माहिती दिली पाहिजे. 3) जमा केलेला TDS पुरवठाकर्त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये परावर्तित होईल. 4) TDS कपात केल्यापासून पाच दिवसाच्या आंत वजातीकर्त्याने करदात्याला प्रमाणपत्र निर्गमित करणे आवश्यक आहे, यामध्ये कसूर झाल्यास वजातीकर्त्याला कमाल रु. 5000/- च्या अधीन राहून प्रतिदिन रु. 100/- शुल्क अदा करावे लागेल.
CGST/SGST अधिनियम कलम 52 अंतर्गत ही तरतूद केवळ ई- कॉमर्स ऑपरेटरला लागू आहे. प्रत्येक ई-कॉमर्स ऑपरेटरला, प्रतिनिधी म्हणून नाही, त्याच्याव्दारे करण्यात आलेल्या करयोग्य पुरवठ्यांच्या बाबतीत "करयोग्य पुरवठ्यांच्या निव्वळ किंमत/मूल्याच्या" 1% पेक्षा जास्त नसलेल्या दराने परिगणित केलेली रक्कम रोखून ठेवणे आवश्यक आहे, जेथे सदर पुरवठा संबंधित लाभ ऑपरेटरद्वारा संकलित करण्यात येतो. प्रत्येक ई-कॉमर्स ऑपरेटरला सदर रोखून ठेवलेली रक्कम योग्य GST खात्यात पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा करावी लागेल. जमा केलेला TCS पुरवठाकर्त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये परावर्तित होईल.
"करयोग्य पुरवठ्यांची निव्वळ किंमत/मूल्य" याचा अर्थ कोणत्याही महिन्यात सर्व नोंदणीकृत करपात्र व्यक्तींनी ऑपरेटर मार्फत, कलम 9(5) अंतर्गत अधिसूचित सेवांखेरीज, केलेल्या वस्तू/माल किंवा सेवांच्या करयोग्य पुरवठ्यांची एकूण किंमत/मूल्य, ज्यातून संबंधित महिन्यात पुरवठाकर्त्यास परत करण्यात आलेल्या करयोग्य पुरवठ्यांची एकूण किंमत/मूल्य कमी केलेले असते.
होय. GSTN वरच्या सामाईक पोर्टलच्या माध्यमाव्दारे क्रेडिट कार्डने कर अधिदान करण्याचा उद्देश असलेल्या करदात्याला त्या क्रेडिट कार्डची आधी नोंदणी करणे आावश्यक आहे. क्रेडिट कार्ड सेवा प्रदात्यांव्दारे याबाबत खात्री घेऊन क्रेडिट कार्डच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी GSTN बँकांमध्ये सम-वय प्रणाली कार्यानिवत करू शकते. त्यामुळे व्यापार/व्यवसाय करणे सहज सुलभ होण्यासाठी कोणत्याही आर्थिक मर्यादेशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून अधिदान करण्यास अनुमती देता येईल.
अंतिम सुधारित : 8/15/2020
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (e-commerce) म्हणजे काय तसेच...
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...
अग्रिम अधिनिर्णय (Advance Ruling) विषयी असलेले प्र...
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...