অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

GST तील इनपूट सेवा वितरकाची संकल्पना

GST तील इनपूट सेवा वितरकाची संकल्पना

  1. इनपूट सेवा वितरक म्हणजे काय (Input Service Distributor - ISD)?
  2. ISD म्हणून नोंदणीप्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे?
  3. ISD व्‍दारे लाभ वितरित करण्यासाठी कोणत्या दस्तऐवजांची आवश्यकता आहे?
  4. ISD सर्व पुरवठाकर्त्यांना इनपूट टॅक्‍स क्रेडिट वितरित करू शकतो का?
  5. पुरवठाकर्त्याने व्यवसायाच्या दरम्यान वापरलेल्या इनपूट सेवांचे परिमाण किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरलेल्या इनपूट सेवांचे परिमाण, यामध्ये परस्परांशी असलेला संबंध प्रस्थापित करणे अनेक वेळा शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत, ISD व्‍दारे इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे वितरण कसे केले जाईल?
  6. ISD च्या उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या "उलाढाल" संज्ञेत कोणत्या बाबींचा समावेश आहे?
  7. ISDला विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे का?
  8. एका कंपनीला अनेक ISD घेता येतील का?
  9. ISDनी अतिरिक्‍त/चुकीचा लाभ वितरित केल्यास वसुलीसाठी तरतुदी काय आहेत?
  10. विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थीना (receipients) IGST क्रेडिट म्हणून CGST आणि IGST चे लाभ ISD व्‍दारे वितरित करता येतील का?
  11. विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थींना (receipients) IGST क्रेडिट म्हणून SGST/UTGST चे लाभ ISD व्‍दारे वितरित करता येतील का?
  12. ISDला CGST आणि IGSTचे क्रेडिट CGSTचे लाभ म्हणून वितरित करता येईल का?
  13. एका ISDच्या सर्व लाभार्थींमध्ये सामाईक लाभ (ITC) कसा वितरित करता येईल?
  14. ISDला राज्याबाहेरील लाभार्थीला CGST आणि IGST यांचा लाभ (ITC) वितरित कसा करता येईल?  (क) IGST म्हणून, (ख) CGST म्‍हणून, (ग) SGST म्हणून.
  15. ISDला राज्यांतर्गत CGSTचा लाभ (ITC) वितरित कसा करता येईल? (क) IGST म्हणून,(ख) CGST म्‍हणून,(ग) SGST म्हणून किंवा (घ) वरीलपैकी कोणत्याही प्रकारे.
  16. एकापेक्षा अधिक पुरवठाकर्त्यानी वापरलेल्या इनपूट सेवेवर अदा करण्यात आलेल्या कराचा लाभ (ITC) कसा वितरित करता येईल?  (क) ज्या राज्यात पुरवठाकर्ते अशाप्रकारच्या इनपूट सेवांचा वापर उलाढालीच्या प्रमाणात करतात, त्या पुरवठाकर्त्यांमध्ये लाभ उलाढालीच्या प्रमाणात वितरित केला जाईल. (ख) सर्व पुरवठाकर्त्यांमध्ये समप्रमाणात लाभ वितरित केला जाईल.(ग) फक्‍त एका पुरवठाकर्त्याला लाभ वितरित केला जाईल.(घ) लाभ वितरित करता येणार नाही.
  17. वितरित करण्यात आलेल्या अतिरिक्‍त लाभाची (ITC) विभागाला ISD कडून वसुली करता येते का?
  18. अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून वितरित करण्यात  आलेल्या लाभाचे (ITC) परिणाम काय होतात?

इनपूट सेवा वितरक म्हणजे काय (Input Service Distributor - ISD)?

ISD म्हणजे वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दोन्‍ही यांचा पुरवठा करणा-या पुरवठाकर्त्याचे कार्यालय, जे इनपूट सेवांच्या प्राप्तीच्या संबंधात निर्गमित  करण्यात येणारी बीजके प्राप्त करते, आणि उपरोक्‍त कार्यालयसमान PAN असणा-या, करयोग्य वस्तू/माल आणि/किंवा सेवा किंवा दोन्‍ही यांचा पुरवठा करणा-या पुरवठाकर्त्याला, सदर सेवेबद्दल अदा करण्यात आलेल्या, केंद्रीय कर (CGST), राज्य कर (SGST)/केंद्रशासित प्रदेश कर (UTGST) किंवा एकात्मिक कर (IGST) यांचा करदेयतेचा लाभ (ITC) वितरित करण्याच्या उद्देशाने विहित दस्तऐवज निर्गमित  करते.

ISD म्हणून नोंदणीप्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे?

उत्तर :- वेगळयाप्रकारे नोंदणीकृत असले तरीही, ISDला "सेवांचा मान्‍यताप्राप्त पुरवठाकर्ता" म्हणून स्वतंत्र नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ISDला नोंदणीसाठी सीमित मर्यादा लागू नाहीत. ISDची सध्या अस्तित्वात असलेल्या करप्रणालीतील नोंदणी (म्हणजे सेवा कर अंतर्गत) GST करप्रणालीत स्थानांतरित केली जाणार नाही. अस्तित्वात असलेल्या सर्व ISDना, जर "ISD" म्हणून व्यवसाय करायचे असल्यास, नवीन करप्रणालीत त्यांना नव्याने नोंदणी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल.

ISD व्‍दारे लाभ वितरित करण्यासाठी कोणत्या दस्तऐवजांची आवश्यकता आहे?

विशेषत: या उद्देशासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजाच्या व्‍दारे लाभाचे वितरण करावे लागेल. या कथित दस्तऐवजामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटच्या रकमेचा समावेश असेल.

ISD सर्व पुरवठाकर्त्यांना इनपूट टॅक्‍स क्रेडिट वितरित करू शकतो का?

उत्तर :- नाही. ज्या नोंदणीकृत व्यक्‍तीनी व्यवसायाच्या दरम्यान किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी इनपूट सेवांचा वापर केला आहे, फक्‍त त्या व्‍यक्‍तींमध्ये इनपूट सेवांचे इनपूट टॅक्‍स क्रेडिट वितरित केले जाईल.

पुरवठाकर्त्याने व्यवसायाच्या दरम्यान वापरलेल्या इनपूट सेवांचे परिमाण किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरलेल्या इनपूट सेवांचे परिमाण, यामध्ये परस्परांशी असलेला संबंध प्रस्थापित करणे अनेक वेळा शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत, ISD व्‍दारे इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे वितरण कसे केले जाईल?

अशा परिस्थितीत, सूत्राच्या (formula) आधारे वितरण केले जाईल. प्रथम, इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे वितरण फक्‍त त्या इनपूट टॅक्‍स क्रेडिटच्या लाभार्थ्यांमध्ये केले जाईल, ज्यांचा वितरित केल्या जाणाऱ्या इनपूट सेवांशी संबंध आहे. दुसरे म्हणजे, कार्यरत लाभार्थी गटांमध्येच (units) वितरण केले जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे, वितरित केल्या जाणाऱ्या इनपूट सेवांशी संबंधित असणाऱ्या लाभार्थ्याची सदर कालावधीतील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील उलाढाल व सर्व लाभार्थ्यांच्या एकूण उलाढाल, यांच्या गुणोत्तर प्रमाणात (ratio) इनपूट टॅक्‍स क्रेडिटचे वितरण केले जाईल. अंतिमत:, वितरित केलेला लाभ वितरणासाठी उपलब्ध असलेल्या लाभापेक्षा जास्त नसावा.

ISD च्या उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या "उलाढाल" संज्ञेत कोणत्या बाबींचा समावेश आहे?

उत्तर :- भारतीय संविधानाचे परिशिष्ट-7 च्या यादी-I मधील अनुक्रमांक  84 आणि यादी-II मधील अनुक्रमांक 51 व 54 अंतर्गत आकारण्यात येणारे कोणतेही शुल्क किंवा कर यांचा ISD च्या उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या "उलाढाल" संज्ञेत समावेश होत नाही.

ISDला विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे का?

होय, ISDला आगामी महिन्‍याच्या 13 तारखेपर्यंत मासिक विवरण दाखल करणे आवश्यक आहे.

एका कंपनीला अनेक ISD घेता येतील का?

उत्तर :- होय. कंपनीची विविध कार्यालये उदाहरणार्थ पणन विभाग, सुरक्षा विभाग इत्यादीना स्वतंत्र ISDसाठी अर्ज करता येईल.

ISDनी अतिरिक्‍त/चुकीचा लाभ वितरित केल्यास वसुलीसाठी तरतुदी काय आहेत?

उत्तर :- कलम 73 किंवा 74 अंतर्गत कारवाई व्‍दारे वितरित करण्यात आलेला अतिरिक्‍त/चुकीचा लाभ लाभार्थी कडून व्याजासह वसूल करता येतो.

विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थीना (receipients) IGST क्रेडिट म्हणून CGST आणि IGST चे लाभ ISD व्‍दारे वितरित करता येतील का?

उत्तर :- होय. CGSTचा लाभ IGST म्हणून आणि IGSTचा लाभ CGST म्‍हणून विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थीना ISD व्‍दारे लाभ वितरित करता येतील.

विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थींना (receipients) IGST क्रेडिट म्हणून SGST/UTGST चे लाभ ISD व्‍दारे वितरित करता येतील का?

उत्तर :- होय. ISDला SGST/UTGSTचे लाभ IGST क्रेडिट म्हणून विविध राज्यांत स्थित असलेल्या लाभार्थींना वितरित करता येईल.

ISDला CGST आणि IGSTचे क्रेडिट CGSTचे लाभ म्हणून वितरित करता येईल का?

उत्तर :- होय. एकाच राज्यातील लाभार्थींना ISDला CGST आणि IGSTचे क्रेडिट CGSTचे लाभ म्हणून वितरित करता येईल.

प्र.13. :- SGST/UTGST आणि IGST चे क्रेडिट SGST/UTGSTचे लाभ (ITC) म्हणून वितरित करता येईल का?

उत्तर :- होय. एकाच राज्यातील लाभार्थींना ISDला SGST/UTGST आणि IGSTचे क्रेडिट (ITC) SGST/UTGSTचे लाभ म्हणून वितरित करता येतील.

एका ISDच्या सर्व लाभार्थींमध्ये सामाईक लाभ (ITC) कसा वितरित करता येईल?

उत्तर :- सर्व लाभार्थींव्‍दारे वापरण्यात येणा-या लाभाचे (ITC) वितरण ISDला त्या सर्व लाभार्थींच्या एकूण उलाढालीत असलेल्या प्रत्येक लाभार्थीच्या उलाढालीच्या प्रमाणाच्या आधारे करता येईल.

ISDला राज्याबाहेरील लाभार्थीला CGST आणि IGST यांचा लाभ (ITC) वितरित कसा करता येईल?  (क) IGST म्हणून, (ख) CGST म्‍हणून, (ग) SGST म्हणून.

उत्तर :- (क) IGST.

ISDला राज्यांतर्गत CGSTचा लाभ (ITC) वितरित कसा करता येईल? (क) IGST म्हणून,(ख) CGST म्‍हणून,(ग) SGST म्हणून किंवा (घ) वरीलपैकी कोणत्याही प्रकारे.

उत्तर :- (ख) CGST

एकापेक्षा अधिक पुरवठाकर्त्यानी वापरलेल्या इनपूट सेवेवर अदा करण्यात आलेल्या कराचा लाभ (ITC) कसा वितरित करता येईल?  (क) ज्या राज्यात पुरवठाकर्ते अशाप्रकारच्या इनपूट सेवांचा वापर उलाढालीच्या प्रमाणात करतात, त्या पुरवठाकर्त्यांमध्ये लाभ उलाढालीच्या प्रमाणात वितरित केला जाईल. (ख) सर्व पुरवठाकर्त्यांमध्ये समप्रमाणात लाभ वितरित केला जाईल.(ग) फक्‍त एका पुरवठाकर्त्याला लाभ वितरित केला जाईल.(घ) लाभ वितरित करता येणार नाही.

उत्तर :- (क) ज्या राज्यात पुरवठाकर्ते अशाप्रकारच्या इनपूट सेवांचा वापर करतात, त्या पुरवठाकर्त्यांमध्ये उलाढालीच्या प्रमाणात लाभ (ITC) वितरित केला जातो.

वितरित करण्यात आलेल्या अतिरिक्‍त लाभाची (ITC) विभागाला ISD कडून वसुली करता येते का?

उत्तर :- नाही. वितरित करण्यात आलेल्या अतिरिक्‍त लाभाची (ITC) व्याजासह विभागाला फक्‍त लाभार्थीकडून वसुली करता येईल आणि ISD कडून नाही. लाभाची वसुली करण्यासाठी कलम 73 किंवा कलम 74 मधील तरतुदी लागू होतील.

अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून वितरित करण्यात  आलेल्या लाभाचे (ITC) परिणाम काय होतात?

उत्तर :- अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून ज्या लाभार्थीला लाभ (ITC) वितरित करण्यात आलेला असेल, त्या लाभार्थीकडून वितरित करण्यात आलेला लाभ (ITC) व्याजासह वसूल केला जाईल.

स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate