অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

GST तील मूल्यांकन (Valuation in GST)

GST तील मूल्यांकन (Valuation in GST)

  1. GST आकारणीसाठी करयोग्य पुरवठ्याचे कोणते मूल्य स्वीकारावे
  2. व्यवहार मूल्य म्हणजे काय?
  3. CGST, SGST आणि IGST तसेच वस्तू/माल आणि सेवा यांच्यासाठी वेगवेगळया मूल्यांकनाच्या तरतूदी आहेत का?
  4. करार किंमत पुरवठ्याचे मूल्यांकन निश्चित करण्यास पुरेशी नाही का?
  5. सर्व बाबतीत GST मूल्यांकन नियमांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे का?
  6. कलम 15(1) अंतर्गत घोषित करण्यात आलेले व्यवहार मूल्य स्वीकृत करता येईल का?
  7. पुरवठ्यानंतर देण्यात आलेली सूट किंवा लाभ (incentives) यांचा व्यवहार मूल्यात समावेश करावा का?
  8. पुरवठ्याच्या पूर्वी किंवा पुरवठ्याच्या वेळी देण्यात आलेली पुरवठापूर्व सूट व्यवहार मूल्यात समाविष्ट करता येते का?
  9. मूल्यांकन नियमाच्या तरतूदी केव्हा लागू होतात?
  10. कलम 15(2) मध्ये कोणत्या समावेशयोग्य बाबी विहित केलेल्या आहेत, ज्या व्यवहार मूल्यामध्ये समाविष्ट करता येतील?

GST आकारणीसाठी करयोग्य पुरवठ्याचे कोणते मूल्य स्वीकारावे

वस्तू/माल आणि सेवांच्या करयोग्य पुरवठयाचे मूल्य सर्वसाधारणपणे "व्यवहार मूल्य" असेल, जी प्रत्यक्ष अदा केलेली किंवा देय किंमत असते, जेव्हा व्यापारी मंडळी (Parties) संबंधित नसतात आणि "किंमत" हा एकमेव निर्णायक  घटक असतो. CGST/SGSTअधिनियम कलम 15 मध्ये व्यवहार मूल्याच्या कक्षेत समावेश करण्यात आलेल्या आणि वगळण्यात आलेल्या विविध बाबींची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.   उदाहरणार्थ, व्यवहार मूल्यामध्ये, परतफेड करावी लागणारी ठेव, काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून अगोदर देण्यात आलेली किंवा पुरवठ्याच्या वेळी देण्यात आलेली सूट इत्यादींचा समावेश नसेल.

व्यवहार मूल्य म्हणजे काय?

व्यवहार मूल्य म्हणजे वस्तू/मालाच्या आणि/किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी प्रत्यक्षात अदा केलेली किंमत किंवा देय किंमत, जेव्हा पुरवठाकर्ता आणि प्राप्तकर्ता (ग्राहक) यांचा संबंध नसतो आणि पुरवठ्याकरिता "किंमत" हाच एकमेव निर्णायक  घटक असतो. जी कोणतीही रक्‍कम  पुरवठाकर्ता अदा करण्यास जबाबदार असतो, परंतु पुरवठा प्राप्तकर्त्याने सदर रकमेची जबाबदारी (incurred) स्वीकारली आहे अशा कोणत्याही रकमेचा त्यामध्ये समावेश असतो.

CGST, SGST आणि IGST तसेच वस्तू/माल आणि सेवा यांच्यासाठी वेगवेगळया मूल्यांकनाच्या तरतूदी आहेत का?

नाही. कलम 15 सर्व तीन करांसाठी सामाईक आहे आणि  वस्तू/माल व सेवांसाठीही समान आहे.

करार किंमत पुरवठ्याचे मूल्यांकन निश्चित करण्यास पुरेशी नाही का?

करार किंमतीचा अधिकतर विशेषत्वाने "व्यवहार मूल्य" असा उल्लेख केला जातो आणि या आधारे कर परिगणित करण्यात येतो. परंतु जेव्हा किंमतीवर कांही घटकांचा प्रभाव असतो, उदाहरणार्थ, व्यवहारात सहभागी असलेले व्यापारी/व्यक्‍ती यांचे संबंध किंवा जेथे कांही विशिष्ट व्यवहार ज्यांना पुरवठा असे मानले जाते, परंतु ज्यामध्ये किंमत दर्शविलेली नसते, अशा वेळी GST मूल्यांकन नियम (GST Valuation Rules) अनुसार मूल्य निश्चित केले पाहिजे.

सर्व बाबतीत GST मूल्यांकन नियमांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे का?

नाही. कलम 15 उपकलम (1) अंतर्गत जेव्हा मूल्याची निश्चिती करता येत नाही, केवळ त्या प्रकरणांत GST मूल्यांकन नियमांचा संदर्भ घेणे आवश्यक असते.

कलम 15(1) अंतर्गत घोषित करण्यात आलेले व्यवहार मूल्य स्वीकृत करता येईल का?

होय. कलम 15 (2) मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाबींचे परीक्षण केल्यानंतर त्या आधारे स्वीकृत करता येईल. या व्यतिरिक्‍त जेथे पुरवठाकर्ता आणि प्राप्तकर्ता एकमेकांशी संबंधीत असले तरी त्या संबंधामुळे किंमत प्रभावित झालेली नसली तर व्यवहार मूल्य स्वीकृत करता येईल.

पुरवठ्यानंतर देण्यात आलेली सूट किंवा लाभ (incentives) यांचा व्यवहार मूल्यात समावेश करावा का?

होय. जेथे पुरवठ्यानंतर देण्यात आलेली सूट करारानुसार प्रस्थापित झाली आहे आणि पुरवठ्याच्या वेळी किंवा आधी याबाबत माहिती आहे आणि सदर सूट विशिष्टपणे संबंधित बीजकाशी संबध्द आहे आणि प्राप्तकर्त्याने सदर सूटीशी संबंधित इनपूट टॅक्‍स क्रेडिट परत फिरविलेले आहे, तेव्हा मॉडेल GST कायदा कलम 15 अंतर्गत "ग्राह्य वजात" (admissible deduction) म्हणून सदर सूट मान्‍य करण्यात येते.

पुरवठ्याच्या पूर्वी किंवा पुरवठ्याच्या वेळी देण्यात आलेली पुरवठापूर्व सूट व्यवहार मूल्यात समाविष्ट करता येते का?

नाही. परंतू या अटीवर की सर्वसाधारण व्यापार पध्दतींनुसार सूट देण्याची अनुमती आहे आणि बीजकात सूटीची योग्य नोंद घेण्यात आली आहे.

मूल्यांकन नियमाच्या तरतूदी केव्हा लागू होतात?

मूल्यांकनाचे नियम लागू होतात जेव्हा (1) मोबदला पूर्णत: किंवा अंशत: पैशाच्या स्वरूपात नसतो; (2) व्यापारी/पार्टी एकमेकांशी संबंधित असतात किंवा विशिष्ट प्रवर्गातील पुरवठाकर्त्याव्दारे पुरवठा करण्यात आलेला आहे; आणि (3) घोषित केलेले व्यवहार मूल्य विश्वासार्ह नाही.

कलम 15(2) मध्ये कोणत्या समावेशयोग्य बाबी विहित केलेल्या आहेत, ज्या व्यवहार मूल्यामध्ये समाविष्ट करता येतील?

कलम 15 (2) मध्ये विहित केलेल्या समावेशयोग्य बाबी, ज्या व्यवहार मूल्यामध्ये समाविष्ट करता येतील, त्या खालीलप्रमाणे आहेत :-

(क) SGST/CGST अधिनियम व वस्तू आणि सेवाकर ( Compensation to States for Loss of Revenue) अधिनियम,2016 या खेरीज, पुरवठाकर्त्याने स्वतंत्रपणे प्राप्तकर्त्याला आकारलेले असल्यास, कोणत्याही कायद्यांतर्गत आकारले जाणारे कोणतेही कर, जकात (duties), उपकर, शुल्क आणि आकार;

(ख) अशा पुरवठ्याबाबत जी कोणतीही रक्‍कम  पुरवठाकर्ता अदा करण्यास जबाबदार असतो, परंतु पुरवठा प्राप्तकर्त्याने सदर रकमेची जबाबदारी (incurred) स्वीकारली आहे, आणि वस्तू/माल आणि/किंवा सेवांच्या प्रत्यक्ष अदा केलेल्या किंवा देय किंमतीत समावेश नसलेली सदर रक्‍कम ;

(ग) आनुषंगिक खर्च (Incidental expenses), उदाहरणार्थ दलाली आणि बांधणी (packing) इत्यादी पुरवठाकर्त्याने पुरवठा प्राप्तकर्त्याकडून आकारलेले आहे, यात अंतर्भूत जी कोणतीही रक्‍कम  पुरवठाकर्त्याने वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा पुरवठा करतेवेळी किंवा वस्तूंची पोचवणी करण्यापूर्वी किंवा परिस्थितीनुरूप सेवांचा पुरवठा करतेवेळी किंवा पोचवणी करण्यापूर्वी आकारलेली आहे;

(घ) कोणत्याही पुरवठ्यासाठी, कोणत्याही लाभाच्या विलंबित अधिदानासाठी आकारण्यात आलेले व्याज किंवा विलंब शुल्क किंवा दंडाची रक्‍कम ;

(ङ) केंद्र आणि राज्य सरकार/शासन यांनी दिलेले अनुदान (subsidy) वगळून, किंमतीशी थेट जोडलेले अनुदान.

 

स्रोत : केंद्रीय उत्पाद आणि सीमा शुल्क बोर्ड, भारत सरकार

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate